राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शताब्दी महोत्सवाबद्दल बॉलिवूड कलाकारांकडून शुभेच्छा

आरएसएस आपला शताब्दी महोत्सव साजरा करत आहे.देशभरात हा महोत्सव विविध उपक्रमातून साजरा केला जात आहे. बॉलीवूडच्या ताऱ्यांनी देखील संघाच्या वाटचालीला शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शताब्दी महोत्सवाबद्दल बॉलिवूड कलाकारांकडून शुभेच्छा
| Updated on: Oct 02, 2025 | 10:19 PM

विजयादशमीच्या मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देशभरात आजपासून शताब्दी महोत्सवाला सुरुवात झाली आहे. या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याला समाजातील विविध घटकांमधून शुभेच्छा देण्यात येत आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्यांनी देखील संघाला आपल्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता विक्रम मेसी याच्यासह अर्जून रामपाल, तमन्ना भाटिया, मनिषा कोईराला आदी संघाच्या या गौरवशाली प्रवासाबद्दल शुभेच्छा दिल्या आहे.

बॉलीवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया हीनेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संघाचे अभिनंदन केले आहे. आरएसएसला आपला गौरवशाली १०० वर्षांचा प्रवास पूर्ण केल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. राष्ट्रनिर्माण आणि समाजसेवेचा हा प्रेरक प्रवास असाच सुरु राहो ही इच्छा व्यक्त करते असे तमन्ना हिने आरएसएसला शुभेच्छा देताना म्हटले आहे.

आरएसएसचे शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मला अभिमान वाटत आहे.कारण मी नेहमी मानतो की एकता, अनुशासन आणि मेहनत देशाला मजबूत बनवू शकते. आणि आरएसएस शंभर वर्षे न थांबता देशाची सेवा केलेली आहे आणि पुढेही ते सेवा करत राहतील.या शुभसमयी माझ्या वतीने संघाच्या सर्व सदस्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असे अभिनेते विक्रांत मेसी यांनी संघाला शुभेच्छा देताना म्हटले आहे.

देशभक्ती आणि निस्वार्थ सेवेचे प्रतिक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याची शंभर वर्षे पूर्ण करत आहे. विजयादशमी १९२५ रोजी सुरु झालेला हा संघ जगातील सर्वात मोठा स्वयंसेवकांची संघटना बनून आपल्या सर्वांना प्रेरित करत आहे. स्वयंशिस्त, देशभक्ती , निस्वार्थ सेवेच्या माध्यमातून करोडो स्वयंसेवक सातत्याने भारतमातेच्या सेवेसाठी मेहनत घेत आहेत.मी या शतकोमहोत्सव वर्षासाठी आरएसएस बंधूंना शुभेच्छा देतो. आम्ही सर्व तुमच्या सोबत असून मिळून माँ भारतीच्या सेवेसाठी काम करुया,भारत माता की जय जयहिंद असे अभिनेता अर्जून रामपाल यांनी संघाला शुभेच्छा देताना म्हटले आहे.

राष्ट्रवाद, निस्वार्थ सेवा, आणि समावेशकतेची प्रेरणा देणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा अशा शब्दात अभिनेत्री मनिषा कोईराला हीने आरएसएसच्या शताब्दीबद्दल संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत.