“माझा नवरा हॉट दिसतोय सिनेमा बघण्यासाठी मी आणखी वाट पाहू शकत नाही”, करिना कपूरची खास पोस्ट

करिनाने तिचा पती सैफ अली खानचा एक फोटो शेअर केला आहे आणि त्याला दिलेलं कॅप्शनही तितकंच खास आहे

माझा नवरा हॉट दिसतोय सिनेमा बघण्यासाठी मी आणखी वाट पाहू शकत नाही, करिना कपूरची खास पोस्ट
करिना कपूर, सैफ अली खान,
| Edited By: | Updated on: Feb 25, 2022 | 10:55 AM

आयेशा सय्यद, मुंबई : अभिनेत्री करिना कपूर- खानने (Kareena Kapoor Khan) इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्याची सध्या जोरदार चर्चा आहे. करिनाने तिचा पती सैफ अली खानचा (Saif Ali Khan) एक फोटो शेअर केला आहे आणि त्याला दिलेलं कॅप्शनही तितकंच खास आहे. विक्रम वेधा (Vikram Vedha) या सिनेमातील सैफ अली खानचा नवा लूक सध्या समोर आला आहे. सैफचा या नव्या लूकमधला फोटो तिने शेअर केला आहे. याला तिने “माझा नवरा हॉट दिसतोय सिनेमा बघण्यासाठी मी आणखी वाट पाहू शकत नाही”, असं कॅप्शन दिलं आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी या फोटोला पसंती दिली आहे. दीड लाखाहून अधिक लोकांनी हा फोटो लाईक केला आहे.

करिना कपूरची इन्स्टाग्राम पोस्ट

करिनाने तिचा पती सैफ अली खानचा एक फोटो शेअर केला आहे आणि त्याला दिलेलं कॅप्शनही तितकंच खास आहे. विक्रम वेधा या सिनेमातील सैफ अली खानचा नवा लूक सध्या समोर आला आहे. सैफचा या नव्या लूकमधला फोटो तिने शेअर केला आहे. याला तिने “माझा नवरा हॉट दिसतोय सिनेमा बघण्यासाठी मी आणखी वाट पाहू शकत नाही”, असं कॅप्शन दिलं आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी या फोटोला पसंती दिली आहे.

सैफ अली खानचा नवा लूक

विक्रम वेधा या सिनेमातील सैफ अली खानचा नवा लूक सध्या समोर आला आहे. सैफचा या नव्या लूकमधला फोटो करिनाने शेअर केला आहे. यात तो पांढऱ्या रंगाच्या टि-शर्टमध्ये दिसतोय. तसंच त्याने डोळ्यावर चष्मा घातलाय. त्याचा हा अंदाज अनेकांच्या पसंतीला उतरलाय.

विक्रम वेधा चित्रपट

विक्रम वेधा हा चित्रपट या वर्षी प्रदर्शित होणार आहे. 30 सप्टेंबर 2022 ला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात हृतिक रोशनही दिसणार आहे. त्याचाही फर्स्ट लूक समोर आला आहे.

संबंधित बातम्या

निवेदितांनी बनवली लक्ष्मीकांत बेर्डेची सर्वांत आवडती डिश; ‘हा’ पदार्थ कधीही खायची लक्ष्याची होती तयारी

करोडोंचा बंगला, घरासमोर अलिशान गाड्यांची रांग, जाणून घ्या फरहान अख्तरच्या संपत्तीविषयी…

‘पुष्पा’पेक्षा जास्त प्रेम ‘पावनखिंड’वर करणं हे मराठी माणसाचं कर्तव्य; चित्रपट पाहणाऱ्यांना मिसळवर डिस्काऊंट