Bigg Boss 16 | सलमान खानच्या बिग बॉस 16 मध्ये मोठा धमाका होणार, पाहा व्हायरल झालेले सेटवरील काही फोटो

बिग बॉस 16 चा होस्ट सलमान खानच असणार आहे. ऑक्टोबरपासून हा शो टीव्हीवर सुरू होणार आहे, या शोचे प्री-प्रॉडक्शन काम जोरात सुरू आहे, शोचे सेट बनवण्याची तयारीही जवळपास पूर्ण झाली आहे. या वर्षी बिग बॉस स्पर्धकाच्या घरातील काही फोटो सोशल मीडियावर लीक झाले आहेत.

Bigg Boss 16 | सलमान खानच्या बिग बॉस 16 मध्ये मोठा धमाका होणार, पाहा व्हायरल झालेले सेटवरील काही फोटो
| Updated on: Jul 28, 2022 | 9:32 AM

मुंबई : टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वांचा खास आणि आवडता शो बिग बॉस (Bigg Boss) लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉस 16 प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचे मोठे पॅकेज घेऊन येत आहेत. शोचे आतापर्यंत 15 सीझन झाले आहेत, दरवर्षी नवीन स्पर्धक बिग बॉसमध्ये सहभागी होतात आणि प्रेक्षकांचे मनोरंजन (Entertainment) करतात. बऱ्याच दिवसांपासून प्रेक्षक बिग बॉस 16 चा वाट पाहत होते. बिग बॉसमध्ये मनोरंजनाचा मोठा तडका बघायला मिळतो. यामुळेच चाहत्यांना कायमच बिग बॉसची प्रतिक्षा असते. आता बिग बॉस 16 (Bigg Boss 16) बद्दल खूप महत्वाची बातमी पुढे येते आहे.

इथे पाहा बिग बाॅस 16 चे व्हायरल झालेले फोटो

प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी बिग बॉस 16 चा होस्ट सलमान खानच असणार

बिग बॉस 16 चा होस्ट सलमान खानच असणार आहे. ऑक्टोबरपासून हा शो टीव्हीवर सुरू होणार आहे, या शोचे प्री-प्रॉडक्शन काम जोरात सुरू आहे, शोचे सेट बनवण्याची तयारीही जवळपास पूर्ण झाली आहे. या वर्षी बिग बॉस स्पर्धकाच्या घरातील काही फोटो सोशल मीडियावर लीक झाले आहेत, बिग बॉस 16 च्या घरातील हे लीक झालेले फोटो इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहेत. जर हे फोटो खरे असतील तर बिग बॉस 16 च्या घराची थीम ‘एक्वेरियम’ असू शकते. मात्र, याबद्दल अजून बिग बॉसकडून कोणत्याही प्रकारचा खुलासा करण्यात आला नाहीयं.

बिग बॉस 16 च्या सीझनमध्ये हे स्पर्धक सहभागी होण्याची शक्यता

बिग बॉस 16 च्या या नवीन सीझनमध्ये नागिन फेम अर्जुन बिजलानी, स्टँडअप कॉमेडियन मुनावर फारुकी, ये है मोहब्बते फेम दिव्यांका त्रिपाठी, ये रिश्ता क्या कहलाता है फेम शिवांगी जोशी, टीना दत्ता, अजमा फलाह, शिवम शर्मा, दुधाने, मुनमुम दत्ता, कॅट ख्रिश्चन, जन्नत जुबेर, फैसल शेख, केविन, आरुषी दत्ता, पूनम पांडे, बसीर अली हे दिसण्याची शक्यता आहे. बिग बॉस 15 सुरू असताना बिग बॉस शोवर अनेक प्रकारचे आरोप करण्यात आले होते. शोमध्ये शमिता शेट्टीला इतर स्पर्धकांपेक्षा वेगळी वागणूक दिलाचा आरोप करण्यात आला होता.