Dia Mirza: कार अपघातात दिया मिर्झाच्या भाचीचं निधन; सोशल मीडियावर पोस्ट लिहित व्यक्त केलं दु:ख

तान्या काकडे ही सोमवारी सकाळी तिच्या मित्रांसह राजीव गांधी विमानतळावरून हैदराबादला जात होती. यावेळी त्यांची कार डिव्हायडरला धडकली आणि या अपघातात तान्याचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती समोर येत आहे.

Dia Mirza: कार अपघातात दिया मिर्झाच्या भाचीचं निधन; सोशल मीडियावर पोस्ट लिहित व्यक्त केलं दु:ख
Dia Mirza: कार अपघातात दिया मिर्झाच्या भाचीचं निधन
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Aug 02, 2022 | 10:34 AM

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाची (Dia Mirza) भाची तान्या काकडे (Tanya Kakde) हिचं निधन झालं आहे. यासंदर्भात दियाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित शोक व्यक्त केला आहे. तान्याचं निधन कोणत्या कारणामुळे झालं, याबाबत दियाने पोस्टमध्ये काही स्पष्ट केलं नाही. दियाच्या या पोस्टवर बॉलिवूड इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी आणि सर्वसामान्य नेटकऱ्यांनीही कमेंट्स करत शोक व्यक्त केला आहे. दियाने भाची (neice) तान्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती हसताना दिसत आहे. यासोबतच तिने अतिशय भावनिक पोस्ट लिहिली आहे. दियाने लिहिलं, ‘माझी भाची, माझा जीव की प्राण, माझी मुलगी आता या जगात नाही. तू जिथे कुठे असशील तिथे तुला नेहमी शांती आणि प्रेम मिळो. तू सदैव माझ्या हृदयात राहशील. ओम शांती.’

सेलिब्रिटींनी वाहिली श्रद्धांजली

दियाच्या या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटी कमेंट करून तान्याला श्रद्धांजली अर्पण करत आहेत. गौहर खान, ईशा गुप्ता आणि भावना पांडे यांनीही कमेंट्स केल्या आहेत. तर सुझान खानची बहीण फराहने लिहिलं, ‘ही अत्यंत दुःखद बातमी आहे, तू जिथे असशील तिथे चमकत राहा.’ याशिवाय सुनील शेट्टी, श्रेया धन्वंतरी, गुल पनाग यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करून श्रद्धांजली वाहिली आहे.

दियाची पोस्ट-

तान्याचा कार अपघात

तान्या काकडे ही सोमवारी सकाळी तिच्या मित्रांसह राजीव गांधी विमानतळावरून हैदराबादला जात होती. यावेळी त्यांची कार डिव्हायडरला धडकली आणि या अपघातात तान्याचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती समोर येत आहे.