Disha Patani | FIRच्या वृत्तादरम्यानच दिशा पाटणीने शेअर केला बोल्ड फोटो, सोशल मीडियावर रंगली चर्चा!

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटणी चाहत्यांमध्ये आपल्या खास ग्लॅमरस स्टाईलसाठी ओळखली जाते. दिशाची फॅन फॉलोइंगही खूप जोरदार आहे. अभिनेत्री दिशा पाटणी (Disha Patani) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे आणि आपल्या बोल्ड स्टाईलने ती नेहमीच चाहत्यांना घायाळ करत असते.

Disha Patani | FIRच्या वृत्तादरम्यानच दिशा पाटणीने शेअर केला बोल्ड फोटो, सोशल मीडियावर रंगली चर्चा!
दिशा पाटणी
Follow us
| Updated on: Jun 03, 2021 | 4:05 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटणी चाहत्यांमध्ये आपल्या खास ग्लॅमरस स्टाईलसाठी ओळखली जाते. दिशाची फॅन फॉलोइंगही खूप जोरदार आहे. अभिनेत्री दिशा पाटणी (Disha Patani) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे आणि आपल्या बोल्ड स्टाईलने ती नेहमीच चाहत्यांना घायाळ करत असते. नुकताच दिशाने पुन्हा एकदा आपला बोल्डनेसने परिपूर्ण असा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे (Disha Patani Share throwback bold photo on social media).

नुकतीच अशी बातमी आली होती की, लॉकडाऊन दरम्यान रस्त्यावर फिरणाऱ्या अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशाने कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या बातम्यांची चर्चा सुरु असतानाच दिशाने सोशल मीडियावर एक थ्रोबॅक हॉट फोटो शेअर केला आहे.

दिशाचा फोटो चर्चेत

दिशा पाटणीने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, जो उगवत्या सूर्यासह घेण्यात आला आहे. या फोटोमध्ये दिशा पाण्यातून तिचे केस हटके स्टाईलने उडवताना दिसत आहे. हा फोटो सावलीच्या शैलीत क्लिक केला गेला आहे. फोटोमध्ये दिशा बिकिनी अवतारामध्ये दिसली आहे. फोटोमध्ये अभिनेत्रीचा चेहरा स्पष्ट दिसत नसला तरी, तिच्या या फोटोने सोशल मीडियाचा पार चांगलाच वाढवला आहे.

पाहा दिशाचा फोटो

 (Disha Patani Share throwback bold photo on social media)

हा फोटो शेअर करताना दिशाने लिहिले की, हा तिचा जुना फोटो आहे. मात्र, पुन्हा एकदा दिशा पाटणीचा आणखी एक नवीन फोटो चाहत्यांमध्ये व्हायरल झाला आहे. दिशाच्या या फोटोवर तिचे फॅन्स बऱ्याच कमेंट करत आहेत. इंस्टाग्रामवर दिशा पटानीचे 44.1 मिलिअन फॉलोअर्स आहेत, म्हणूनच दिशाचा प्रत्येक फोटो चाहत्यांमध्ये अधिक लोकप्रिय होतो. मात्र, दिशा स्वतः केवळ 189 लोकांना फॉलो करते.

‘धोनी’मधून मिळाली प्रसिद्धी

‘एम. एस. धोनी’ या चित्रपटात ती अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या सोबत दिसली होती. या चित्रपटात ती धोनीच्या मैत्रिणीच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात दिशाची भूमिका छोटी होती, पण या चित्रपटानेच तिला खरी ओळख मिळाली होती. या चित्रपटानंतर दिशाने तिच्या करिअरमध्ये कधीही मागे वळून पाहिले नाही. अलीकडेच दिशा पाटणी ‘राधे’ चित्रपटामध्ये सलमान खानसोबत दिसली होती. ‘राधे’ला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला असला, तरी या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अनेक विक्रम केले आहेत. दिशा सलमान सोबत ‘राधे’ आधी ‘भारत’ या चित्रपटातही दिसली होती. टायगर श्रॉफसोबत डेटिंगच्या वृत्तामुळे दिशा सध्या खूप चर्चेत आहे.

(Disha Patani Share throwback bold photo on social media)

हेही वाचा :

डॉ. बाबर खरंच डॉक्टर आहेत का? वडिलांच्या निधनानंतर अभिनेत्रीचा संताप, राजेश टोपेंनाही सवाल

PHOTO | थोडंसं शूटिंग आणि धमाल मस्ती, ‘माझा होशील ना’च्या सेटवर ‘आमरस’ अन् ‘मिसळ’ पार्टी!

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.