AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लॉकडाऊनदरम्यान बाहेर फिरणं महागात, अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पाटणीविरोधात गुन्हा दाखल

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पाटणी या दोघांविरुद्ध वांद्रे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( FIR Case Against Tiger Shroff And Disha Patani)

लॉकडाऊनदरम्यान बाहेर फिरणं महागात, अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पाटणीविरोधात गुन्हा दाखल
tiger shroff disha patni
| Edited By: | Updated on: Jun 03, 2021 | 7:25 AM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि अभिनेत्री दिशा पाटणी (Disha Patani) या दोघांविरुद्ध वांद्रे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणत्याही वैध कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरून साथीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांविरुद्ध भारतीय दंड विधानसभा कलम 188, 34 IPC दिनांक 2.6.2021 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Case Against Bollywood Actor Tiger Shroff And  Actress Disha Patani In Mumbai For Violating Covid-19 restrictions)

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण कमी होत असून अनेक शहर कोरोनामुक्त होताना दिसत आहे. त्यामुळे काही ठिकाणी निर्बंध हटवण्यात आले आहे. याचा फायदा घेऊन काही जण घराबाहेर पडताना दिसत आहे.

नुकतंच बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ, अभिनेत्री दिशा पाटणी आणि त्यांचा ड्रायव्हर या तिघांविरुद्ध वांद्रे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टायगर श्रॉफ आणि दिशा पाटणी हे वांद्र्यात जिमनंतर ड्राईव्हसाठी गेले होते. त्याचवेळी वांद्र्यातील बँडस्टँड पोलिसांनी त्यांना अडवले. त्यानंतर पोलिसांनी त्याचे आधार कार्ड, लायसन्स आणि इतर कागदपत्रांची तपासणी केली. यानंतर त्या तिघांवर गुन्हा नोंदवण्यात आला.

लॉकडाऊन असतानाही फेरफटका मारणं महागात

कोणत्याही वैध कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरणे, तसेच साथीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांविरुद्ध भारतीय दंड विधानसभा कलम 188, 34 IPC दिनांक 2.6.2021 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे टायगर श्रॉफ आणि दिशा पाटणी या दोघांना लॉकडाऊन असतानाही फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडणे चांगलेच महागात पडले आहे.

टायगर श्रॉफ आणि दिशाचं मालदीव व्हेकेशन

दरम्यान दिशा गेल्या बर्‍याच वर्षांपासून टायगर श्रॉफला डेट करत आहे. ती लॉकडाऊनच्या आधी ते दोघे दर आठवड्याला नियमित लंच आणि डिनर डेटला जात होते. गेल्या महिन्यात दिशा टायगरबरोबर मालदीवमध्ये सुट्टीसाठी गेली होती. तिथून तिने बिकिनी फोटो पोस्ट केले होते जे खूप व्हायरल झाले. टायगरचे कुटुंब आणि दिशा फिटनेसच्या बाबतीत कोणतीही कसर सोडत नाहीत. प्रत्येकाचे लक्ष तंदुरुस्तीवर आहे, यामुळे या कुटुंबाला आता अव्वल सेलिब्रिटींच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. दिशाला कुटुंबीयांनी टायगरची ‘खास मैत्रीण’ म्हणून स्वीकारले आहे. (Case Against Bollywood Actor Tiger Shroff And  Actress Disha Patani In Mumbai For Violating Covid Rules)

संबंधित बातम्या :

‘राधे’मध्ये दिशा पाटणीला पाहून खुश झाली टायगर श्रॉफची आई, फोटोवर कमेंट करत म्हणाली…

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.