
सलमान खान (Salman Khan)आज म्हणजेच 27 डिसेंबरला त्याचा 56वा वाढदिवस साजरा करत आहे. पनवेल फार्महाऊसवर त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सलमानच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही व्हिडिओ सलमानच्या फॅन पेजवर व्हायरल होत आहेत. फॅन्ससोबतच त्याचे इंडस्ट्रीतले सहकारी, मित्र यांच्या सोशल अकाऊंटवरूनही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झालाय. तो आहे जेनेलिया देशमुख(Genelia Deshmukh)चा..
जेनेलियाचा सलमानसोबत डान्स
जेनेलिया देशमुखनं सलमान खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. सर्वात मोठ्या हृदयाच्या माणसाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. देव तुला खूप आनंद, प्रेम आणि उत्तम आरोग्य देवो. आम्ही तुझ्यावर प्रेम करतो – आज भाई का बर्थ डे है. @beingsalmankhan अशी पोस्टच तिनं इन्स्टाग्रामवर केलीय. यासोबतच तिनं सलमानसोबत डान्स केल्याचा व्हिडिओही टाकलाय. तो आता तुफान व्हायरल होतोय.
सलमान खान दरवर्षी त्याचा वाढदिवस पनवेल फार्म हाऊसवर त्याचे कुटुंब आणि मित्रांसोबत साजरा करतो. यावेळीही त्यानं तसेच केले. सलमाननं फार्म हाऊसच्या बाहेर येऊन मीडियाशी संवाद साधला
वाढदिवसाच्या आधी शनिवारी रात्री घडलेल्या साप चावल्याच्या घटनेनंतर सलमानला तातडीनं एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं होतं. तिथून रविवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सलमाननं पुढं सांगितलं, की त्यानंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. त्या सापाला देखील आम्ही सोबत घेऊन गेलो होतो, तिथं आम्हाला समजलं, की तो विषारी नाही. तरीही मी 6 तास हॉस्पिटलमध्ये राहिलो आणि मला अँटी व्हेनमचं इंजेक्शन देण्यात आलं. मी आता पूर्ण ठीक आहे.