Revealed : ऐश्वर्या नाही की कॅटरिना, ‘या’ अभिनेत्रीमुळे सलमान खान अजूनही सिंगल!

Revealed : ऐश्वर्या नाही की कॅटरिना, 'या' अभिनेत्रीमुळे सलमान खान अजूनही सिंगल!
Salman Khan

सलमान खान (Salman Khan)आज त्याचा 56वा वाढदिवस (Salman Khan 56th Birthday) साजरा करत आहे. हा 56 वर्षीय बॉलिवूड स्टार अजूनही सिंगल आहे, याचा खुलासा खुद्द सलमान खाननं त्याच्या रिअॅलिटी शो बिग बॉस(Bigg Boss)च्या मंचावर केला होता.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्रदीप गरड

Dec 27, 2021 | 7:30 PM

सलमान खान (Salman Khan)आज त्याचा 56वा वाढदिवस (Salman Khan 56th Birthday) साजरा करत आहे. हा 56 वर्षीय बॉलिवूड स्टार अजूनही सिंगल आहे आणि याचं कारण कोणालाच माहीत नाही. संगीता बिजलानी(Sangeeta Bijlani), ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan), कॅटरिना कैफ (Katrina Kaif) यांसारख्या नावांसह अनेक बॉलिवूड अभिनेत्रीं(Bollywood Actress)सोबत सलमान खानचं नाव आतापर्यंत जोडलं गेलं आहे. मात्र, सलमान खान सिंगल असण्यामागं यापैकी एकही अभिनेत्री नाही. होय, हे खरं आहे.

बिग बॉसच्या मंचावर केलेला खुलासा
मेगास्टार सलमान खाननं स्वतः एकदा खुलासा केला होता, की तो अजूनही सिंगल का आहे. एवढंच नाही तर त्यानं या खुलाशात अभिनेत्रीचं नावदेखील दिलं होतं. तिच्यामुळेच अजूनही तो सिंगल आहे. सलमान खान सिंगल असण्यामागचं कारण दुसरं-तिसरं कोणी नसून बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री रेखा (Actress Rekha) आहे. हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल, पण हो हे खरं आहे. कारण याचा खुलासा खुद्द सलमान खाननं त्याच्या रिअॅलिटी शो बिग बॉस(Bigg Boss)च्या मंचावर केला होता.

‘घराच्या छतावर झोपायचो, कारण…’
जेव्हा रेखा त्यांच्या सुपर नानी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमान खानच्या बिग बॉस शोच्या मंचावर पोहोचल्या होत्या, त्यावेळची ही गोष्ट आहे. रेखा यांना त्याच्यासोबत स्टेज शेअर करताना पाहून सलमान खाननं खुलासा केला, की तो किशोरवयीन असल्यापासून रेखा यांचा खूप मोठा चाहता आहे. ते तेव्हा शेजारी राहायचे. त्यावेळी मी टेरेसवर झोपत होतो, जेणेकरून रेखा यांना मॉर्निंग वॉकला जाताना पहाण्यासाठी तो पहाटे 5.30 वाजता उठू शकेल.

योगा क्लासही जॉईन केला!
इतकंच नाही, तर सलमान खाननं रेखासाठी तेच योगा क्लासेस जॉईन केले होते, ज्यामध्ये रेखा जात असत. सलमान त्याच्या मैत्रिणींसोबत रेखाच्या त्या योगा क्लासला जात असे. सलमान खाननं त्यावेळी ‘बिग बॉस’च्या स्पर्धकांसमोर आपल्या मनाची गोष्ट सांगताना, त्याला रेखा यांच्यासोबत लग्न करायचं होतं, असा खुलासा केला होता. यादरम्यान सलमान हसला आणि म्हणाला की हेच कारण आहे, लग्न न करण्याचं.
सलमान खाननं रविवारी रात्री त्याच्या पनवेल फार्म हाऊसवर वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती, ज्यामध्ये बॉबी देओल, संगीता बिजलानी, युलिया वंटोर आणि इब्राहिम खान यांच्यासह त्याच्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश होता.

Salman Khan Birthday Celebration : पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानचं ग्रँड बर्थडे सेलिब्रेशन, चिमुकल्या आयतसोबत कापला केक!

Happy Birthday Salman Khan | ‘दबंग खान’चं वयाच्या 56व्या वर्षात पदार्पण, अनेकांचा ‘गॉडफादर’ ठरलेल्या सलमानची जीवनशैली माहितेय का?

Bigg Boss Marathi 3 |लोकांची गर्दी, फटाक्यांची आतषबाजी! ‘बिग बॉस मराठी 3’ची ट्रॉफी घेऊन विशाल घरी परतला  

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें