Happy Birthday Isha Koppikar | अनेक बड्या कलाकारांसोबत चित्रपटात झळकली ईशा कोप्पीकर, राजकारणातही आजमावले नशीब!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 19, 2021 | 9:06 AM

बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकर 19 सप्टेंबर रोजी तिचा वाढदिवस साजरा करत आहे. तिने बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. ईशा कोप्पीकरने (Isha Koppikar ) दाक्षिणात्य चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले.

Happy Birthday Isha Koppikar | अनेक बड्या कलाकारांसोबत चित्रपटात झळकली ईशा कोप्पीकर, राजकारणातही आजमावले नशीब!
Isha Koppikar
Follow us

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकर 19 सप्टेंबर रोजी तिचा वाढदिवस साजरा करत आहे. तिने बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. ईशा कोप्पीकरने (Isha Koppikar ) दाक्षिणात्य चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. ईशा कोप्पीकरने अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. चला तर, आज तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला तिच्याशी संबंधित खास गोष्टी सांगणार आहोत….

अभिनेत्री ईशा कोप्पीकर हिचा जन्म 19 सप्टेंबर 1976 रोजी माहीम, मुंबई येथे झाला. तिने आपले संपूर्ण शिक्षण मुंबईतूनच केले. ईशा कोप्पीकर जीवनशास्त्रात पदवीधर आहे. ईशाने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होते. फोटोशूटवरून प्रसिद्धीझोतात आल्यानंतर, ईशा कोप्पीकरने 1995 मध्ये ‘मिस इंडिया’ या चर्चित स्पर्धेमध्ये भाग घेतला होता, जिथे तिने ‘मिस टॅलेंट’ हा किताब जिंकला. यानंतर 1998 मध्ये तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

तामिळ चित्रपटातून डेब्यू

ईशा कोप्पीकरने ‘चंद्रलेखा’ या तामिळ चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केले. यानंतर त्यांनी तमिळ, तेलगू, कन्नड आणि मराठी चित्रपटांमध्ये बराच काळ काम केले. ईशा कोप्पीकरचा बॉलिवूड डेब्यू चित्रपट ‘फिझा’ होता. हा चित्रपट 2000 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेत्री करिश्मा कपूर आणि अभिनेता  हृतिक रोशन यांनी देखील काम केले होते. यानंतर प्रकाश झांच्या ‘राहुल’ या चित्रपटात ईशा कोप्पीकरचा आयटम नंबर दिसला होता. तिने ‘डरना मना है’, ‘कयामत’, ‘दिल का रिश्ता’, ‘पिंजर’, ‘मैने प्यार क्यों किया’, ‘डॉन’ आणि ‘कृष्णा कॉटेज’ यासह अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.

‘खल्लास गर्ल’ म्हणून ओळख

बराच काळ संघर्ष केल्यानंतरही ईशा कोप्पीकर बॉलिवूडमध्ये विशेष स्थान मिळवू शकली नाही. चित्रपटांमध्ये काही खास जादू न दाखवू शकल्याने तिने स्टेज शो आणि व्हिडीओ अल्बममध्येही काम केले. तसेच अनेक आयटम नंबर केले, ज्यात ‘खल्लास’ हे गाणे अजूनही हिट आहे. या गाण्यापासून तिला प्रेक्षक ‘खल्लास गर्ल’ म्हणून ओळखू लागले. चित्रपटांव्यतिरिक्त ईशा कोप्पीकर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिली आहे.

राजकारणातही सक्रिय

ईशा कोप्पीकरने दिवंगत अभिनेता इंदर कुमारला काही काळ डेट केले. या दोघांच्या नात्याने बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या, पण काही कारणांमुळे दोघांचे ब्रेकअप झाले. यानंतर ईशा कोप्पीकरने बॉलिवूड अभिनेता टीमी नारंगशी लग्न केले. आता ईशा एका मुलीची आई आहे. ईशाने बॉलिवूडमध्ये फारसे नाव कमावले नसेल, पण आता ती कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे. एवढेच नाही तर, ईशा कोप्पीकर राजकारणातही सक्रिय आहे. भारतीय जनता पक्षाच्या महिला वाहतूक शाखेची ती कार्यकारी अध्यक्ष आहे.

हेही वाचा :

Tamasha Live : ‘तमाशा लाईव्ह’च्या चित्रिकरणाचा श्रीगणेशा, सचित पाटील आणि सोनाली कुलकर्णी झळकणार मुख्य भूमिकेत

Annabelle Sethupathi Review | भूत, पुनर्जन्म आणि बदल्याची कथा, वाचा कसा आहे तापसी पन्नू-विजय सेतुपतीचा नवा चित्रपट…


Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI