Annabelle Sethupathi Review | भूत, पुनर्जन्म आणि बदल्याची कथा, वाचा कसा आहे तापसी पन्नू-विजय सेतुपतीचा नवा चित्रपट…

तापसी पन्नू अभिनित Annabelle Sethupati  या चित्रपटामध्ये एका पात्राचा संवाद आहे, ‘नई कहानी कौन बनाता है आजकल, पुरानी कहानियों को री-साइकल करके परोसते हैं. व्हॉट कॅन आय डू.’ आजकाल चित्रपटांमध्ये हाच ट्रेंड सुरु आहे.

Annabelle Sethupathi Review | भूत, पुनर्जन्म आणि बदल्याची कथा, वाचा कसा आहे तापसी पन्नू-विजय सेतुपतीचा नवा चित्रपट...
Annabelle Sethupati
Follow us
| Updated on: Sep 18, 2021 | 4:44 PM

मुंबई : तापसी पन्नू अभिनित Annabelle Sethupati  या चित्रपटामध्ये एका पात्राचा संवाद आहे, ‘नई कहानी कौन बनाता है आजकल, पुरानी कहानियों को री-साइकल करके परोसते हैं. व्हॉट कॅन आय डू.’ आजकाल चित्रपटांमध्ये हाच ट्रेंड सुरु आहे. ओटीटीच्या मदतीने करमणुकीच्या युगात, मूळ आशयाचा शोध शिगेला पोहोचला आहे, तर निर्माते-दिग्दर्शक जुन्याच कथा नवीन बनवून सादर करण्याचा प्रयत्न करत आहेत. कंगना रनौतशी स्पर्धा करणारी तापसी पन्नूची या कथेची निवड प्रेक्षकांना आणि चाहत्यांना आश्चर्यचकित करते.

अलीकडच्या काळात यशस्वी नायिकांची एक समस्या म्हणजे ते स्क्रिप्ट कमी आणि स्क्रीनवर जास्त वेळ घालवतात. त्या विसरतात की, पात्रांचा समतोल चित्रपट मजबूत बनवण्यात महत्वाची भूमिका बजावतो.

सुमारे अडीच तासांच्या ‘अॅनाबेल सेतुपती’मध्ये तापसी मुख्य कथेत दोन तास राहते, परंतु कोणत्याही प्रकारे ती प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवू शकत नाही. दाक्षिणात्य निर्माता-दिग्दर्शक यांनी बनवलेला हा चित्रपट डिस्ने हॉटस्टारवर तामिळ, तेलगू आणि हिंदी भाषेत प्रदर्शित झाला आहे. तमिळ-तेलगू भाषेत या चित्रपटाचे नाव ‘अॅनाबेले सेतुपती’ असे आहे तर इतर भाषेत ‘अॅनाबेले राठोड’ असे नाव आहे. चित्रपट एक संपूर्ण मसालापट आणि मनोरंजन करणारा आहे. मात्र, यातील पात्र तुम्हाला वेळोवेळी आठवण करून देत राहतात की, इथे तर्क शोधू नका. म्हणून भूत, पुनर्जन्म आणि सूड या कॉमिक स्टोरीवर तुम्ही लक्ष केंद्रित केले नाहीत तर चांगलेच आहे.

काय आहे चित्रपटाची कथा?

हा चित्रपट एका जुन्या काळात सुरू होतो, ज्यात इथे- तिथे चोरी करणाऱ्या एका कुटुंबाला पोलीस पकडतात. या कुटुंबाची लीडर रुद्रा (तापसी पन्नू) आहे. रुद्रा, जी तिच्या आई-वडिल आणि भावाबरोबर चोरी करते, ती इन्स्पेक्टरला प्रभावित करण्याचा प्रयत्न करते. तो देखील त्यांना तुरुंगात टाकण्याऐवजी, तिला त्याच्या वडिलोपार्जित मालमत्ता/राजवाडा साफ करण्याचे आदेश देतो. हा राजवाडा झपाटलेला आहे आणि त्यात डझनभर भूत राहतात. त्यामुळे त्याला एकही खरेदीदार सापडत नाही.

रुद्राचे कुटुंब राजवाड्यातील मौल्यवान वस्तू काढून घेण्याची योजना बनवतात, पण भुतांची योजना वेगळी असते. ही कथा देशाच्या स्वातंत्र्याच्या काळापर्यंत पोहोचते, जेव्हा तेथे रियासत होती. राजे आणि राजपुत्र होते. राजा देवेंद्रसिंह राठोड (विजय सेतुपती) इंग्लिश वंशाच्या अॅनाबेलला (तापसी पन्नू) भेटतात आणि तिच्या प्रेमात पडतात. देवेंद्र तिच्याशी लग्न करून प्रेमाचे प्रतिक म्हणून एक भव्य महाल बांधतात, पण जमीदार चंद्रभान (जगपती बाबू) याची देखील त्याच्यावर नजर असते.

आजची रुद्रा ही आधीच्या अॅनाबेलचा पुनर्जन्म आहे. पुनर्जन्म का होतो, तिची कथा काय होती, रुद्राचे राजवाड्याशी काय संबंध असतील, राजा देवेंद्र आणि जमीनदार चंद्रभान यांचे काय झाले, जे राजवाड्यात राहणारे भूत आहेत, ते भूत का बनले, याचे अंतिम ध्येय भूत ही या वेदनादायक योनीतून मुक्ती आहे का? जर, तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे मिळवायची असतील. तर हा चित्रपट पाहावा लागेल.

प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात अपयशी

दीपक सुंदर राजन यांनी बराच ड्रामा तयार करण्याचा प्रयत्न केला आहे, पण त्यांची कल्पनाशक्ती इथे पंख पसरू शकली नाही. म्हणूनच सर्व पात्र एका वर्तुळात फिरतात आणि एकामागून एक दृश्यात नवीन असे काहीच येत नाही. प्रत्येक दृश्यात, भूत जवळजवळ त्यांचे तेचतेच शब्द पुनरावृत्ती करतात आणि मागील शब्दांसारखेच हावभाव दर्शवतात. सुंदर राजनने त्यांच्या या कथेवर काम केलेले नाही. यामुळे चित्रपट निस्तेज होतो.

चित्रपटात तापसी पन्नू आणि विजय सेतुपती यांच्या मुख्य भूमिका आहेत. सेतुपती आणि तापसीमध्ये प्रणय प्रसंगाची दृश्ये आहेत आणि दोघांनीही यात चांगले काम केले आहे. सेतुपतीची एंट्री दुसऱ्या भागात होते. पहिल्या भागात तो बेपत्ता आहे. रुद्र आणि अॅनाबेल म्हणून तापसी ठीकठाक वाटली आहे. जगपती बाबू आणि योगी बाबूंचा अभिनय चांगला आहे. त्याची पात्रंही उत्तम लिहिली आहेत. योगी बाबू चित्रपटाला बऱ्याच अंशी बांधून ठेवतात. राजवाडा आणि पात्रांचे पोशाख पीरियड ड्रामानुसार आहेत. दाक्षिणात्य चित्रपटांना हिंदीमध्ये मोठा प्रेक्षकवर्ग आहे. त्यांना हे सिनेमे खूप आवडतात.

हेही वाचा :

Rajeshwari Kharat: लाल परी…. चाहत्यांना वेडापिसा करणारा राजेश्वरी खरातचा बोल्ड लूक पाहिलाय का?

Shilpa Shetty | राज कुंद्रासोबतच्या नात्यावर शिल्पा शेट्टी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? सोशल मीडियावर पोस्ट करत दिला संकेत…

Non Stop LIVE Update
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.