Shilpa Shetty | राज कुंद्रासोबतच्या नात्यावर शिल्पा शेट्टी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? सोशल मीडियावर पोस्ट करत दिला संकेत…

'सुपर डान्सर चॅप्टर 4' या डान्सिंग रिअॅलिटी शोची परीक्षक आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) तिच्या शनिवारची सुरुवात एका सकारात्मक विचाराने केली आहे. शिल्पाने तिच्या इन्स्टाग्रामवर अमेरिकन लेखक कार्ल बार्ड यांच्या पुस्तकाचे एक पान शेअर करून तिच्या भविष्यातील नियोजनाबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

Shilpa Shetty | राज कुंद्रासोबतच्या नात्यावर शिल्पा शेट्टी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? सोशल मीडियावर पोस्ट करत दिला संकेत...
Raj-shilpa


मुंबई : ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’ या डान्सिंग रिअॅलिटी शोची परीक्षक आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) तिच्या शनिवारची सुरुवात एका सकारात्मक विचाराने केली आहे. शिल्पाने तिच्या इन्स्टाग्रामवर अमेरिकन लेखक कार्ल बार्ड यांच्या पुस्तकाचे एक पान शेअर करून तिच्या भविष्यातील नियोजनाबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पती राज कुंद्राच्या (Raj Kundra) अश्लील चित्रपट प्रकरणामुळे शिल्पा काही काळासाठी खूप चर्चेमध्ये होती.

शिल्पा शेट्टीचा व्यापारी पती राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट प्रकरणी जुलै महिन्यात अटक करण्यात आली होती. राज प्रकरणातील सर्व अडचणींच्या दरम्यान, शिल्पाने एक प्रेरणादायी पुस्तकाचे पान शेअर करून तिच्या विकेंडची छान सुरुवात केली आहे. शिल्पाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केलेल्या पेजमध्ये लिहिले आहे, ‘जरी कोणीही मागे जाऊ शकत नाही, पण एक नवीन सुरुवात करू शकते. आता सुरू करून कोणीही अगदी नवीन शेवट देखील करू शकतो.’

पाहा पोस्ट :

Post

Post

मी पूर्वी काय केले त्यावरून माझी ओळख बनू नये!

या पानावर पुढे स्पष्ट केले आहे की, एखादी व्यक्ती आपला बराच वेळ त्याच्या वाईट निर्णय आणि चुकांबद्दल विचार करण्यात घालवते. ‘आम्ही चुकीचा निर्णय का घेतला याचे विश्लेषण करण्यात आपला बराच वेळ वाया जातो. माझी इच्छा आहे की, आपण हुशार किंवा खूप चांगले असू शकतो. आपण कितीही विचार केला तरी आपण आपला भूतकाळ बदलू शकत नाही. पण योग्य निर्णय घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. जुन्या चुकांची पुनरावृत्ती न करता आपल्या सभोवतालच्या लोकांशी चांगले रहा. आपल्याकडे स्वतःला बदलण्यासाठी किंवा नव्याने घडवण्याच्या अनेक संधी आहेत.’ या पानाचा शेवटी असे लिहिले आहे की, ‘मी पूर्वी काय केले त्यावरून माझी ओळख असू नये. मला जसे वाटते, तसे मी माझे भविष्य बनवू शकते.’

शिल्पा शेट्टी वैष्णो देवीच्या मंदिरात

शिल्पा शेट्टी नुकतीच माता वैष्णो देवीच्या दरबारात नतमस्तक होण्यासाठी पोहोचली होती. याशिवाय, राज कुंद्रा प्रकरणात, मुंबई पोलिसांनी 43 साक्षीदारांचे जबाब चार्टशीटमध्ये नोंदवले आहेत. या 43 साक्षीदारांमध्ये शिल्पा शेट्टीचाही समावेश आहे. इंडियन एक्स्प्रेसमधील बातमीनुसार, शिल्पा शेट्टीने मुंबई पोलिसांना सांगितले की, ती तिच्या कामात खूप व्यस्त होती, त्यावेळी राज कुंद्रा काय करत होता, हे तिला माहित नव्हते.

स्वकमाईतून मुलांचं संगोपन करणार!

रिपोर्ट्सनुसार, शिल्पाला तिच्या मुलांना राजने चुकीच्या पद्धतीने कमावलेल्या पैशांपासून दूर ठेवायचे आहे. तिला राजची कमाई वापरायची नाही. रिअॅलिटी शो जज करून तिने स्वतः कमावलेल्या पैशातून ती मुलांचे संगोपन करणार आहे आणि आता ती आणखी चित्रपटांमध्ये देखील काम करणार आहे. चित्रपट निर्माते अनुराग बासू आणि प्रियदर्शन यांनी शिल्पाला वचन दिले आहे की, ते तिला चित्रपटात काम देतील. जरी, राज बराच काळ पोलीस कोठडीत राहिला, तरी अभिनेत्रीला अधिक समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही.

हेही वाचा :

Bharti Singh Channel : ‘कॉमेडी क्वीन’ भारती सिंह चाहत्यांच्या भेटीला आणणार नवे चॅनेल, पाहा काय असणार नाव?

सोनू सूद कर वाचवण्यासाठी काय करायचा; CBDT ने सांगितली मोडस ऑपरेंडी

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI