Bharti Singh Channel : ‘कॉमेडी क्वीन’ भारती सिंह चाहत्यांच्या भेटीला आणणार नवे चॅनेल, पाहा काय असणार नाव?

आतापर्यंत टीव्हीवर आपल्या कॉमेडीने सर्वांना गुदगुल्या करणारी कॉमेडियन-अभिनेत्री भारती सिंह (Bharti Singh) आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील तिच्या चाहत्यांची मने जिंकण्याची तयारी करत आहेत. भारतीने व तिचा पती हर्ष लिंबाचियासोबत (Harsh Limbachiyaa) एक यूट्यूब चॅनेल लाँच केले आहे.

Bharti Singh Channel : ‘कॉमेडी क्वीन’ भारती सिंह चाहत्यांच्या भेटीला आणणार नवे चॅनेल, पाहा काय असणार नाव?
Bharti Singh

मुंबई : आतापर्यंत टीव्हीवर आपल्या कॉमेडीने सर्वांना गुदगुल्या करणारी कॉमेडियन-अभिनेत्री भारती सिंह (Bharti Singh) आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील तिच्या चाहत्यांची मने जिंकण्याची तयारी करत आहेत. भारतीने व तिचा पती हर्ष लिंबाचियासोबत (Harsh Limbachiyaa) एक यूट्यूब चॅनेल लाँच केले आहे. ज्याला ‘भारती टीव्ही’ असे नाव देण्यात आले आहे. असे सांगितले जात आहे की, भारतीचे हे नवीन चॅनेल अनेक कॉमेडी शो होस्ट करण्यासाठी सज्ज आहे. या वाहिनीवर अनेक दशकांपासून टीव्ही शोसारखे मनोरंजन देण्याची पूर्ण तयारी आहे. ज्यामध्ये ‘द ग्रेट इंडियन गेम शो’ नावाने पहिला शो यूट्यूबवर प्रसारित होईल.

इन्स्टाग्रामवर केले जाहीर

भारतीने तिच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाऊल ठेवल्याचा आनंद इन्स्टाग्रामवर तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. तिने एक मजेदार क्लिप पोस्ट केली आहे. टेलिव्हिजन आणि मनोरंजन क्षेत्रात काम केल्यानंतर, हर्ष आणि मला आमच्या निष्ठावंत प्रेक्षकांशी थेट संपर्क साधायचा होता, जे चाहते आम्हाला दररोज पाहण्यास उत्सुक असतात. पण, टीव्हीच्या बाबतीत असे काही वेळ बंधन आहे की, तुम्ही फक्त विशिष्ट वेळेवर शो दाखवू शकता. पण आता यूट्यूबद्वारे आमचे दर्शक आम्हाला कधीही आणि कुठेही पाहू शकतात. चॅनेलच्या आशयाबद्दल, तिने म्हटले आहे की, टीव्हीवरील अनेक निर्बंधांमुळे अनेक वेळा सामग्रीबद्दल काळजी घ्यावी लागते, परंतु आमच्या चॅनेलमध्ये दररोज मनोरंजनाची भर पडेल.

पाहा पोस्ट :

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen)

भारती सिंहने वजन केले कमी!

भारती सध्या तिच्या वजन कमी करण्याच्या प्रवासामुळे प्रसिद्धीच्या झोतात आहे. तिच्या या आश्चर्यकारक बदलासाठी प्रत्येकजण तिचे कौतुक करत आहे. तिच्या वजन कमी करण्याच्या प्रवासात तिने कोणत्याही विशेष आहाराऐवजी आठवड्याच्या काही दिवसांमध्ये उपवास करण्याचा पर्याय निवडला. सुप्रसिद्ध विनोदी अभिनेत्रीने अधूनमधून उपवास करून स्वतःला बदलले आहे. पूर्वी 91 किलो असलेली भारती आता 76 किलो झाली आहे. भारती तिच्या परिवर्तनाबद्दल खूप आनंदी आहे आणि तिला स्वतःदेखील खूप चांगले वाटत आहे.

अभिनेत्री भारती सिंह सध्या टीव्ही शो ‘डान्स दीवाने 3’ होस्ट करत आहेत. त्याचबरोबर ‘द कपिल शर्मा शो’ तिच्या कॉमेडीने लोकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. भारती सिंह सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव्ह असतात आणि ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते.

हेही वाचा :

Sonu Sood | सोनू सूदवर पहिल्यांदाच इनकम टॅक्स डिपार्टमेंटं अधिकृत वक्तव्य, 20 कोटीच्या टॅक्स चोरीचा आरोप

Bigg Boss OTT Grand Finale : ‘बिग बॉस ओटीटी’ची सांगता होणार, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहू शकता महाअंतिम सोहळा…

आता लवकरच होणार ‘लग्नकल्लोळ’, अभिनेत्री मयुरी देशमुखचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI