Sonu Sood | सोनू सूदवर पहिल्यांदाच इनकम टॅक्स डिपार्टमेंटं अधिकृत वक्तव्य, 20 कोटीच्या टॅक्स चोरीचा आरोप

आयटी अधिकाऱ्यांना हिशोबात मोठ्या प्रमाणात हेरफेर सापडला आहे. हा व्यवहार बॉलिवूड आणि सोनू सूदच्या वैयक्तिक आर्थिक पेमेंटशी संबंधित आहे.

Sonu Sood | सोनू सूदवर पहिल्यांदाच इनकम टॅक्स डिपार्टमेंटं अधिकृत वक्तव्य, 20 कोटीच्या टॅक्स चोरीचा आरोप
Sonu Sood


मुंबई : आयटी अधिकाऱ्यांना हिशोबात मोठ्या प्रमाणात हेरफेर सापडला आहे. हा व्यवहार बॉलिवूड आणि सोनू सूदच्या वैयक्तिक आर्थिक पेमेंटशी संबंधित आहे. ‘सूद चॅरिटी फाउंडेशन’च्या खात्यांचीही आता चौकशी केली जाणार आहे. आज (18 सप्टेंबर) इनकम टॅक्स डिपार्टमेंटंने यावर अधिकृत वक्तव्य दिले आहे.

सोनू सूदचे घर आणि कार्यालयासह त्याच्याशी संबंधित 6 ठिकाणी आयकर विभागाने कारवाई केली होती. आयकर विभागाची ही कारवाई सलग तीन दिवस चालली. बातमीनुसार, आयकर विभागाला या छाप्यात अभिनेत्याविरोधात कर चुकवल्याचे सबळ पुरावे सापडले आहेत.

अभिनेता सोनू सूदवर आयकर विभागाने छापे घातल्यानंतर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) म्हटले आहे की, त्याच्याविरोधात 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर चोरीचे प्रकरण समोर आले आहे. सीबीडीटीने म्हटले आहे की, अभिनेता आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या इतर परिसरात शोध घेताना, करचुकवेगिरीचे पुरावे सापडले आहेत. सीबीडीटीने म्हटले आहे की, अभिनेत्याने बोगस आणि असुरक्षित कर्जाच्या स्वरूपात बेहिशेबी पैसे जमा केले आहेत.

पाहा अधिकृत ट्वीट

सोनू सूद कर वाचवण्यासाठी काय करायचा?

प्राप्तिकर विभागाने सोनू सूद कर वाचवण्यासाठी काय करायचा याची मोडस ऑपरेंडी स्पष्ट केली आहे. सोनू सूद हा बोगस कंपन्यांच्या माध्यमातून कर्ज घेतल्याचे दाखवून बेहिशेबी पैसे आपल्या बँक खात्यात वळते करायचा. आयकर विभागाने सोनू सूदच्या घरी आणि संबंधित ठिकाणी टाकलेल्या धाडींमध्ये यासंबंधीची कागदपत्रे मिळाली आहेत. यावरुन सोनू सूदने तब्बल 20 कोटी रुपयांची कर बुडवेगिरी केल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होत असल्याचे आयकर विभागाने म्हटले आहे.

आयकर विभागाने सोनू सूदच्या कोणत्याही ठिकाणाहून काहीही जप्त केलेले नाही. बातमीनुसार, आयकर विभागाने बुधवारी अभिनेत्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी पाहिणी केली होती, कारण अभिनेत्याशी संबंधित अकाऊंट बुकमध्ये गडबड झाल्याचा आरोप करण्यात आला होता. आयकर विभागाने अभिनेत्याशी संबंधित सहा ठिकाणी सर्वेक्षण केले होते. आत इनकम टॅक्स डिपार्टमेंटं अधिकृत वक्तव्यावरून हे स्पष्ट होते की, हे प्रकरण काही मोठे रूप धारण करणार आहे.

गरिबांचा मसिहा

गेल्यावर्षी देशात कोरोनाच्या साथीमुळे लॉकडाऊन लागले तेव्हा सोनू सूद गरिबांचा मसिहा म्हणून उदयाला आला होता. लॉकडाऊनमुळे रेल्वे आणि प्रवासाची इतर सार्वजनिक साधने बंद झाल्याने अनेक मजूर मुंबईत अडकून पडले होते. त्यावेळी सोनू सूद याने स्वखर्चाने या सर्व मजूरांसाठी विशेष बसची सोय केली होती. त्यामुळे सोनू सूद प्रचंड चर्चेत आला होता.

सोनूची संपत्ती किती?

caknowledge.com नुसार सोनू सूदकडे एकूण 130 कोटींची संपत्ती आहे. सोनू सूद गेल्या 2 दशकांपासून बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करत आहे. ज्यामुळे त्याची फॅन फॉलोईंग खूप जबरदस्त आहे. ब्रँड अ‍ॅन्डॉर्समेंट ही त्याच्या उत्पन्नाचा एक प्रमुख स्त्रोत आहे. त्याने सलमान खानसोबत ‘दबंग’ या चित्रपटामध्येही काम केले आहे. त्याचवेळी शाहरुख खानसोबत ‘हॅपी न्यू इयर’ मध्ये काम केले होते.

घर, हॉटेल आणि कॅफेचा मालक!

सोनू सूद मुंबईतील लोखंडवाला भागात 2600 चौरस फुटांच्या घरात राहतो. सोनूचे हे घर जवळपास 4 बीएचके आहे. यासह सोनूचे मुंबईत आणखी दोन फ्लॅट आहेत. त्याच वेळी, त्याचे जुहूमध्ये एक हॉटेल देखील आहे. याशिवाय सोनूचे मुंबईतही काही कॉफी पॉईंट्स आहेत. जिथे बसून लोक कॉफी पीत संध्याकाळचा आनंद घेतात.

गाड्यांचीही आवड

सोनू सूदकडे एक मर्सिडीज बेंझ एमएल क्लास 350 सीडीआय कार आहे. या कारची किंमत 66 लाख रुपये आहे. त्याच वेळी, त्याच्याकडे ऑडी क्यू 7 ही कार देखील आहे. या गाडीची किंमत 80 लाख रुपये आहे. इतकेच नाही, तर त्याच्याकडे पोर्शची पनामा कार देखील आहे, ज्याची किंमत 2 कोटी आहे. सोनू सूदला इशांत आणि अयान नावाचे दोन मुलगे आहेत, ते कधीकधी वडिलांसोबत फिरताना दिसतात.

हेही वाचा :

IT Survey On Sonu Sood : सलग तिसऱ्या दिवशीही आयकर विभागाचा सर्व्हे सुरूच, सोनू सूदच्या बेहिशेबी मालमत्तेची होतेय चौकशी

Samantha New Film : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान समंथाने स्वीकारला नवा चित्रपट, ब्रेक घेण्याचा निर्णय केला रद्द?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI