AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IT Survey On Sonu Sood : सलग तिसऱ्या दिवशीही आयकर विभागाचा सर्व्हे सुरूच, सोनू सूदच्या बेहिशेबी मालमत्तेची होतेय चौकशी

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याच्या घरी सलग तिसऱ्या दिवशीही आयकर विभागाचा सर्व्हे सुरू आहे. आयकर विभागाचे अधिकारी (Income Tax Survey) बुधवारपासून (15 सप्टेंबर) सातत्याने सोनूच्या घराची आणि कार्यालयाची चौकशी करत आहेत.

IT Survey On Sonu Sood : सलग तिसऱ्या दिवशीही आयकर विभागाचा सर्व्हे सुरूच, सोनू सूदच्या बेहिशेबी मालमत्तेची होतेय चौकशी
Sonu Sood
| Edited By: | Updated on: Sep 17, 2021 | 1:51 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याच्या घरी सलग तिसऱ्या दिवशीही आयकर विभागाचा सर्व्हे सुरू आहे. आयकर विभागाचे अधिकारी (Income Tax Survey) बुधवारपासून (15 सप्टेंबर) सातत्याने सोनूच्या घराची आणि कार्यालयाची चौकशी करत आहेत. बुधवारनंतर, अभिनेत्याच्या घरी गुरुवारी देखील तपास करण्यात आला, आता ही तपासणी आज म्हणजेच शुक्रवारीही जारी आहे.

‘नेटवर्क 18’च्या बातमीनुसार, आयटी अधिकाऱ्यांना हिशोबात मोठ्या प्रमाणात हेरफेर सापडला आहे. हा व्यवहार बॉलिवूड आणि सोनू सूदच्या वैयक्तिक आर्थिक पेमेंटशी संबंधित आहे. ‘सूद चॅरिटी फाउंडेशन’च्या खात्यांचीही आता चौकशी केली जाणार आहे. अहवालानुसार, आयटी विभाग आज संध्याकाळी प्रेसद्वारे या संदर्भात निवेदन देईल.

तिसऱ्या दिवशीही तपास सुरूच!

सोनू सूदचे घर आणि कार्यालयासह त्याच्याशी संबंधित 6 ठिकाणी आयकर विभागाची कारवाई अजूनही सुरूच आहे. आयकर विभागाची ही कारवाई सलग तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. बातमीनुसार, आयकर विभागाला या छाप्यात अभिनेत्याविरोधात कर चुकवल्याचे सबळ पुरावे सापडले आहेत.

असे म्हटले जात आहे की, सोनूला चित्रपटांमधून मिळालेल्या शुल्कामध्ये कर अनियमितता पाहायला मिळाली आहे. या अनियमिततांनंतर आता आयकर विभाग सोनू सूदच्या चॅरिटी फाउंडेशनच्या खात्यांचीही चौकशी करेल. आज अर्थात 17 सप्टेंबर रोजी या संपूर्ण प्रकरणावर आयकर विभागाकडून निवेदन जारी केले जाऊ शकते. सोनूवर ज्याप्रकारे सातत्याने कारवाई केली जात आहे, त्यावरून हे स्पष्ट होते की सोनूच्या अडचणी खूप वाढणार आहेत.

आयकर विभागाला हिशोबात गडबडीची शंका

हा छापा नाही, किंवा आयकर विभागाने सोनू सूदच्या कोणत्याही ठिकाणाहून काहीही जप्त केलेले नाही. बातमीनुसार, आयकर विभागाने बुधवारी अभिनेत्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी पाहिनी केली होती, कारण अभिनेत्याशी संबंधित अकाऊंट बुकमध्ये गडबड झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. आयकर विभागाने अभिनेत्याशी संबंधित सहा ठिकाणी सर्वेक्षण केले होते. पण, आज ज्या प्रकारे अधिकारी पुन्हा अभिनेत्याच्या घरी पोहोचले आहेत, त्यावरून हे स्पष्ट होते की, हे प्रकरण काही मोठे रूप धारण करणार आहे.

गरिबांचा मसिहा

गेल्यावर्षी देशात कोरोनाच्या साथीमुळे लॉकडाऊन लागले तेव्हा सोनू सूद गरिबांचा मसिहा म्हणून उदयाला आला होता. लॉकडाऊनमुळे रेल्वे आणि प्रवासाची इतर सार्वजनिक साधने बंद झाल्याने अनेक मजूर मुंबईत अडकून पडले होते. त्यावेळी सोनू सूद याने स्वखर्चाने या सर्व मजूरांसाठी विशेष बसची सोय केली होती. त्यामुळे सोनू सूद प्रचंड चर्चेत आला होता.

सोनूची संपत्ती किती?

caknowledge.com नुसार सोनू सूदकडे एकूण 130 कोटींची संपत्ती आहे. सोनू सूद गेल्या 2 दशकांपासून बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करत आहे. ज्यामुळे त्याची फॅन फॉलोईंग खूप जबरदस्त आहे. ब्रँड अ‍ॅन्डॉर्समेंट ही त्याच्या उत्पन्नाचा एक प्रमुख स्त्रोत आहे. त्याने सलमान खानसोबत ‘दबंग’ या चित्रपटामध्येही काम केले आहे. त्याचवेळी शाहरुख खानसोबत ‘हॅपी न्यू इयर’ मध्ये काम केले होते.

घर, हॉटेल आणि कॅफेचा मालक!

सोनू सूद मुंबईतील लोखंडवाला भागात 2600 चौरस फुटांच्या घरात राहतो. सोनूचे हे घर जवळपास 4 बीएचके आहे. यासह सोनूचे मुंबईत आणखी दोन फ्लॅट आहेत. त्याच वेळी, त्याचे जुहूमध्ये एक हॉटेल देखील आहे. याशिवाय सोनूचे मुंबईतही काही कॉफी पॉईंट्स आहेत. जिथे बसून लोक कॉफी पीत संध्याकाळचा आनंद घेतात.

गाड्यांचीही आवड

सोनू सूदकडे एक मर्सिडीज बेंझ एमएल क्लास 350 सीडीआय कार आहे. या कारची किंमत 66 लाख रुपये आहे. त्याच वेळी, त्याच्याकडे ऑडी क्यू 7 ही कार देखील आहे. या गाडीची किंमत 80 लाख रुपये आहे. इतकेच नाही, तर त्याच्याकडे पोर्शची पनामा कार देखील आहे, ज्याची किंमत 2 कोटी आहे. सोनू सूदला इशांत आणि अयान नावाचे दोन मुलगे आहेत, ते कधीकधी वडिलांसोबत फिरताना दिसतात.

हेही वाचा :

Bigg Boss Marathi 3 |  कर्करोगावर यशस्वी मात, वेदना होत असतानाही ‘शो मस्ट गो ऑन’, ‘बिग बॉस मराठी 3’ धुरा सांभाळण्यास महेश मांजरेकर सज्ज!

Priyanka Chopra | प्रियांका चोप्राच्या ‘द अ‍ॅक्टिव्हिस्ट’वर गदारोळ, पोस्ट शेअर करत अभिनेत्री म्हणाली ‘मला माफ करा…’

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.