Priyanka Chopra | प्रियांका चोप्राच्या ‘द अ‍ॅक्टिव्हिस्ट’वर गदारोळ, पोस्ट शेअर करत अभिनेत्री म्हणाली ‘मला माफ करा…’

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राची (Priyanka Chopra) आंतरराष्ट्रीय पदार्पणातील टीव्ही मालिका 'क्वांटिको'ने तिला जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळवून दिली आहे. आजघडीला प्रियांका केवळ बॉलिवूडचीच नाही, तर हॉलीवूडचीही दमदार स्टार आहे.

Priyanka Chopra | प्रियांका चोप्राच्या 'द अ‍ॅक्टिव्हिस्ट'वर गदारोळ, पोस्ट शेअर करत अभिनेत्री म्हणाली ‘मला माफ करा...’
Priyanka Chopra

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राची (Priyanka Chopra) आंतरराष्ट्रीय पदार्पणातील टीव्ही मालिका ‘क्वांटिको’ने तिला जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळवून दिली आहे. आजघडीला प्रियांका केवळ बॉलिवूडचीच नाही, तर हॉलीवूडचीही दमदार स्टार आहे. पण अलीकडेच असे काही तरी घडले आहे की, प्रियांकाचे कौतुक होण्याऐवजी तिच्यावर टीका केली जात आहे.

होय, प्रियांका चोप्राचा रिअॅलिटी शो ‘द अॅक्टिव्हिस्ट’ सध्या खूप चर्चेत आहे, याला कारणीभूत आहेत नकारात्मक कमेंट्स… ती पॉप स्टार अशर आणि अभिनेत्री-नृत्यांगना ज्युलियन हॉफ यांच्यासह शो होस्ट करणार आहे. परंतु, हा शो सुरू होण्यापूर्वीच हा शो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

काय आहे प्रकरण जाणून घ्या…

खरं तर, प्रियांकाचा हा शो अगदी वेगळ्या पद्धतीचा आहे, ज्याचा उद्देश वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना एकमेकांविरुद्ध उभे करणे असा आहे, जेणेकरून ते त्यांच्या धर्मादाय कार्याला प्रोत्साहन देऊ शकतील. हा एक प्रकारचा रिअॅलिटी शो आहे, ज्यामध्ये 6 स्पर्धक सहभागी होतील आणि विविध संघ म्हणून लढतील. या सर्वांचा सक्सेस रेट ऑनलाइन प्रतिबद्धतेद्वारे मोजला जाईल. तथापि, सोशल मीडियावर पैशासाठी सक्रियता इतकी क्षुल्लक केल्याबद्दल टीका केली जात आहे.

प्रियांकाने मागितली माफी…

शोमुळे प्रियंकावर टीका होत असल्याचे दिसताच अभिनेत्रीने क्षणाचाही विलंब न लावता इन्स्टाग्रामवर एक लांब लचक पोस्ट शेअर करून माफी मागितली आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, ‘या शोमध्ये चुक झाली आहे आणि मला याबद्दल खेद वाटतो आहे. शोमध्ये माझ्या सहभागामुळे तुमच्यापैकी अनेकांची निराशा झाली आहे.’

पोस्टमध्ये असेही लिहिले आहे की, ‘माझा हेतू नेहमीच कल्पनांच्या मागे लोकांचे लक्ष वेधून घेणे आणि योग्य कारणे सादर करणे हा असतो. प्रत्येकाचे कार्य खूप महत्वाचे आहे आणि ते मान्यता आणि आदर पात्र देखील आहेत. तुम्ही जे काही करता, त्याबद्दल तुमच्या प्रत्येकाचे आभार.’

पाहा पोस्ट :

जरी पोस्टद्वारे प्रियांकाने हा गोंधळ शांत करण्याचा प्रयत्न केला असला तरी, तिचे चाहते देसी गर्लच्या या शैलीने अजिबात खूश नाहीत. त्याचा राग अजूनही कमी होताना दिसत नाहीय.

प्रियांकाच्या ‘The Activist’ च्या सहभागींचे लक्ष्य G20 शिखर परिषदेत सहभागी होणे असणार आहे. येथे ते रक्कम मिळवण्याच्या त्यांच्या इच्छेनुसार जगभरातील नेत्यांनाही भेटतील. यासह, सर्वोच्च प्रतिबद्धता असलेल्या संघाला अंतिम फेरीत विजेत्याचा मुकुट दिला जाईल. जगातील सर्व बड्या सेलेब्स या शोच्या अंतिम फेरीत सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा :

Bigg Boss OTT | शमिता शेट्टीच्या प्रेमात पडलाय राकेश बापट, प्रेम व्यक्त करतानाचा व्हिडीओ चर्चेत!

‘तूच माझा खरा मानव…’, ‘पवित्र रिश्ता’चे गाणे गात अंकिता लोखंडेने विकी जैनसोबत कापला केक!

Jiah Khan | जिया खान मृत्यू प्रकरणात सीबीआयची याचिका फेटाळली, सूरज पांचोलीला मोठा दिलासा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI