Bigg Boss OTT | शमिता शेट्टीच्या प्रेमात पडलाय राकेश बापट, प्रेम व्यक्त करतानाचा व्हिडीओ चर्चेत!

चाहत्यांना आणि प्रेक्षकांना ‘बिग बॉस ओटीटी’ (Bigg Boss OTT) खूप आवडले आहे. आता बिग बॉस ओटीटी अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. शोच्या महाअंतिम सोहळ्याला आता काहीच वेळ शिल्लक आहे. अशा परिस्थितीत, शोचे उर्वरित सर्व स्पर्धक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहेत.

Bigg Boss OTT | शमिता शेट्टीच्या प्रेमात पडलाय राकेश बापट, प्रेम व्यक्त करतानाचा व्हिडीओ चर्चेत!
Shamita-Raquesh

मुंबई : चाहत्यांना आणि प्रेक्षकांना ‘बिग बॉस ओटीटी’ (Bigg Boss OTT) खूप आवडले आहे. आता बिग बॉस ओटीटी अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. शोच्या महाअंतिम सोहळ्याला आता काहीच वेळ शिल्लक आहे. अशा परिस्थितीत, शोचे उर्वरित सर्व स्पर्धक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहेत. यावेळी राकेश बापट (Rauesh Bapat) आणि शमिता शेट्टीच्या (Shamita Shetty) जोडीने शोमध्ये बऱ्याच चाहत्यांना आकर्षित केले आहे.

शोच्या या सीझनमध्ये स्पर्धकांचे संबंध घरात सतत बिघडताना दिसत आहेत. पण शोच्या पहिल्या दिवसापासूनच चाहत्यांना बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांची जोडी पसंत पडत आहे.

राकेशने व्यक्त केली ‘दिल की बात’

शमिता आणि राकेश दोघांचा घरात प्रवेश कनेक्शनद्वारे झाला. दोघेही नेहमी एकमेकांसोबत उभे राहिलेले दिसले, पण अनेकदा चाहत्यांनी दोघांमधील भांडणही पाहिले आहे. आता शो संपण्यापूर्वी दोघांमधील वाढती जवळीकही लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. आजकाल सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात राकेश शमितासमोर आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहे.

सध्या, सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. ज्यामध्ये राकेश आणि शमिता दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये राकेश शमिताला ‘आय लव्ह यू’ म्हणताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये शमिता राकेशला स्वतःबद्दल काहीतरी छान सांगण्यास सांगते, त्यावर राकेश बापट काहीतरी विचार करतो आणि मग त्याला ‘जे टेम’ म्हणतो.

‘जे टेम’चा अर्थ काय आहे

‘जे टेम’ हा एक फ्रेंच शब्द आहे आणि याचा अर्थ ‘मी तुझ्यावर प्रेम करतो.’ राकेशच्या तोंडून हे शब्द ऐकल्यावर शमिता हसताना दिसते. हा व्हिडीओ एका चाहत्याने ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओवर शमिता आणि राकेश या दोघांच्या चाहत्यांनी भरपूर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आता नेहा भसीन शोमधून बाहेर पडली आहे. नेहा गेल्यानंतर आता फक्त अंतिम पाच स्पर्धक, अंतिम फेरीच्या शर्यतीत शिल्लक आहेत. म्हणजेच, अंतिम फेरीच्या या शर्यतीत आता राकेश बापट, शमिता शेट्टी, प्रतीक सेहजपाल, दिव्या अग्रवाल आणि निशांत भट्ट यांचा समावेश आहे. ‘बिग बॉस ओटीटी’चा अंतिम सोहळा 18 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल.

उरलेयत केवळ पाच स्पर्धक

नेहा भसीन बेघर झाल्यानंतर अंतिम फेरीत आता केवळ पाच कॅन्टेस्टेंट शो उरले आहेत. ज्यामध्ये घरात सुरक्षित राहणारे पहिले स्पर्धक दिव्या अग्रवाल, त्यानंतर निशांत भट्ट, शमिता शेट्टी, प्रतीक सहजपाल आणि राकेश बापट आहेत. घरातील हे उर्वरित पाच सदस्य आता अंतिम फेरीत एकमेकांशी स्पर्धा करताना दिसतील. तीन दिवसानंतर, प्रेक्षक त्यांच्या मतांच्या आधारे बिग बॉस ओटीटीचा विजेता निवडतील.

नेहाच्या जाण्यामुळे प्रतीक सहजपाल धक्का

‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात, जिथे बाकीचे चार स्पर्धक त्यांच्या सुरक्षेने खूप आनंदी दिसत होते, दुसरीकडे नेहा भसीनच्या जाण्याने प्रतीक सहजपाल पूर्णपणे तुटला होता आणि अश्रू ढाळत होता. ‘बिग बॉस’ने स्पर्धकांना त्यांचे कनेक्शन तोडण्याची आणि घरातील इतरांशी संबंध जोडण्याची संधी दिली, तेव्हापासून नेहा आणि प्रतीकने आपापले कनेक्शन अक्षरा आणि मिलिंदशी सोडून एकमेकांशी कनेक्शन केले होते.

नेहा भसीन आणि प्रतीक सहजपाल या कनेक्शनपासून ते प्रवासात एकत्र होते ते दोघेही गेममध्ये एकत्र होते. बिग बॉसने कनेक्शनमधील बंध तोडले, परंतु काळाच्या ओघात त्यांची मैत्री घट्ट होत गेली. प्रेम असो किंवा भांडण, ते प्रत्येक वेळी एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले आणि एकमेकांना साथ दिली.

हेही वाचा :

Raj Kundra Case | मुंबई गुन्हे शाखेने राज कुंद्राविरोधात दाखल केले आरोपपत्र, शिल्पा शेट्टी होणार साक्षीदार, 1500 पानांत लेखाजोखा…

आमीर खानच्या बॉडीगार्डचा तगडा पगार, आमदार-खासदार ते IAS-IPS पेक्षाही बक्कळ कमाई

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI