आमीर खानच्या बॉडीगार्डचा तगडा पगार, आमदार-खासदार ते IAS-IPS पेक्षाही बक्कळ कमाई

चित्रपट कलाकारांच्या सुरक्षेसाठी बॉडीगार्ड महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्याबद्दल त्यांना मोठा पगारही मिळत असतो. सध्या मीडिया रिपोर्टनुसार आमिरच्या बॉडीगार्डचा पगार चर्चेत आहे जो एखाद्या आमदार-खासदारालाही लाजवेल.

आमीर खानच्या बॉडीगार्डचा तगडा पगार, आमदार-खासदार ते IAS-IPS पेक्षाही बक्कळ कमाई
आमिर खान बॉडीगार्ड Photo : Viral Bhayani

मुंबई :  मिस्टर आमिर खान……. बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट…. देशभरातच नाही तर जगभरात लाखो फॉलोवर्स असलेला स्टार…. आपल्या आवडत्या स्टारची एक झलक मिळवण्यासाठी चाहते काहीही करायला तयार असतात. त्यांच्या आवडत्या अभिनेत्याला पाहताच त्यांच्यासोबत चाहते फोटो घेण्यासाठी आणि त्यांचा ऑटोग्राफ घेण्यासाठी गर्दी करतात. यामुळे अनेक वेळा स्टार्सना खूप त्रास सहन करावा लागतो. अशा वेळी त्यांचे बॉडीगार्ड (अंगरक्षक) त्याला गर्दीपासून वाचवतात आणि त्याला गर्दीतून बाहेर काढतात. आपण आज बोलणार आहोत आमिरच्या बॉडीगार्डबद्दल, त्याचं नाव आहे युवराज घोरपडे….

आमिरच्या रक्षणाचे 2 कोटी!

चित्रपट कलाकारांच्या सुरक्षेसाठी बॉडीगार्ड महत्त्वाची भूमिका बजावत असतात. चित्रपटाच्या प्रमोशनपासून ते सार्वजनिक ठिकाणांपर्यंत बॉडीगार्ड युवराज आमिर खानला सावलीप्रमाणे सर्वत्र संरक्षण देत असतो. आमिरसारख्या सुपरस्टारला गर्दीतून वाचवणं, हे काही सोपं काम नाही. या कामाच्या बदल्यात, आमिर त्याच्या बॉडीगार्डला किती पगार देतो, माहितीय…? बॉडीगार्ड युवराजचं वार्षिक उत्पन्न किती असेल…? ऐकल्यावर तुम्ही चक्रावून जाल… मीडिया रिपोर्टनुसार, युवराज घोरपडे यांना वर्षाला या कामाचे 2 कोटी रुपये मिळतात…!

शाळा सोडली पुढे आमिरच्या सुरक्षा टीमचा भाग

मीडिया रिपोर्टनुसार, युवराजला बॉडीबिल्डर बनण्याची इच्छा होती, पण त्याने आमिर खानसोबत काम करण्यास सुरुवात केली. वयाच्या 16 व्या वर्षी त्याने शाळा सोडली आणि एका सिक्युरिटी कंपनीत रुजू झाला, नंतर तो आमिरच्या सुरक्षा टीमचा भाग बनला.

आज माझ्या मित्रांना हेवा वाटतो

एका रिपोर्टनुसार, युवराजने माध्यमांशी बोलताना सांगितलं की, शाळा सोडल्यानंतर तो आपला उदरनिर्वाह करण्यासाठी नोकरी करत होता. युवराजच्या मते, त्याच्या मित्रांना आता हेवा वाटतो की तू नेहमी आमिर खानसोबत हिंडतो, फिरतो, खातो, आमिरच्या आसपास असतो…

बॉलिवूड स्टार्सचे बॉडीगार्ड

केवळ युवराजच नाही तर शाहरुख खानचा बॉडीगार्ड रवी सिंगलाही मोठा पगार मिळतो. अनुष्का शर्माचा बॉडीगार्ड सोनू, दीपका पदुकोणचा बॉडीगार्ड जलाल आणि सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा यांनाही प्रचंड पगार मिळतो. सलमानचा बॉडीगार्ड शेरा कोणत्याही सेलिब्रिटीपेक्षा कमी प्रसिद्ध नाहीय. त्यालाही मोठं प्रसिद्धीचं वलय आहे.

(bollywood Actor aamir khan boduguard yearly salary package know this)

हे ही वाचा :

सोनू सूदच्या घरात आयकर विभागाची 20 तास झाडाझडती; पहाटेच्या सुमारास अधिकारी फाईल्स घेऊन बाहेर पडले

‘तमंचे पे व्हिडीओ करणं’ महिला पोलिसाला भोवलं, राजीनामा दिल्यानंतर पोलिसांकडून 1 लाख 82 हजाराच्या भरपाईची नोटीस

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI