‘तूच माझा खरा मानव…’, ‘पवित्र रिश्ता’चे गाणे गात अंकिता लोखंडेने विकी जैनसोबत कापला केक!

‘पवित्र रिश्ता’ (Pavitra Rishta) मालिकेतून ‘अर्चना’ आणि ‘मानव’ पुन्हा एकदा त्यांच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहेत. तब्बल 12 वर्षांनंतर अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) पुन्हा एकदा ‘पवित्र रिश्ता 2’सह प्रेक्षकांसमोर हजर होणार आहेत.

‘तूच माझा खरा मानव...’, ‘पवित्र रिश्ता’चे गाणे गात अंकिता लोखंडेने विकी जैनसोबत कापला केक!
Ankita Lokhande

मुंबई : ‘पवित्र रिश्ता’ (Pavitra Rishta) मालिकेतून ‘अर्चना’ आणि ‘मानव’ पुन्हा एकदा त्यांच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहेत. तब्बल 12 वर्षांनंतर अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) पुन्हा एकदा ‘पवित्र रिश्ता 2’सह प्रेक्षकांसमोर हजर होणार आहेत. मात्र यावेळी लोकांचा आवडता सुपरस्टार सुशांत सिंह राजपूतची आठवण नेहमीप्रमाणे येत राहणार आहे. अंकिता लोखंडेने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ती तिच्या आवाजात ‘पवित्र रिश्ता’ चे शीर्षक गीत गाताना दिसत आहे आणि तिच्या रिअल लाईफ बॉयफ्रेंडला वास्तविक जीवनातील ‘मानव’ म्हणत आहे.

‘पवित्र रिश्ता 2’ अखेर 15 सप्टेंबर रोजी OTT वर रिलीज झाला आहे. अंकिता लोखंडे यांनी ‘पवित्र रिश्ता 2’च्या थीमवर केक कापला. दरम्यान, केक कापताना अंकिता म्हणते, ‘हा माझा मानव.’ तेव्हा समोर उभे असलेले लोक विचारतात की, या खास प्रसंगी त्यांना काय गावे असे वाटत आहे? यावेळी अंकिताने ‘पवित्र रिश्ता’ चे थीम सॉंग गाणे सुरू केले, ज्यात सुशांतसोबत तिच्या जोडीने लाखो आणि करोडो लोकांच्या हृदयाला स्पर्श केला. यानंतर, अंकिता तिचा बॉयफ्रेंड विकी जैनला केक खायला देते आणि म्हणत आहे की, ‘माझ्या खऱ्या आयुष्यातील मानवला शुभेच्छा.’

पाहा व्हिडीओ :

यावेळी ‘पवित्र रिश्ता 2’ ही मालिका एकता कपूरने वेब सीरीज म्हणून लॉन्च केली आहे. यावेळी शाहीर शेख ‘मानव’च्या भूमिकेत सुशांतच्या जागी अंकिता लोखंडे म्हणजेच अर्चनासोबत दिसत आहे. अलीकडेच अंकिताने सांगितले होते की, शोमध्ये सुशांतची जागा कोणीही घेऊ शकत नाही, किंवा घेतही नाहीय आणि शोमध्ये सुशांतची नव्हे तर ‘मानव’ची जागा शाहीरने घेतली आहे.

शाहीरसोबत हिट जोडी

या शोच्या सेटवर काय मिस करते विचारले असता यावर अंकिताने म्हटले की, ‘जेव्हा मी पवित्र रिश्ताच्या सेटवर गेले, तेव्हा मला बाकीच्या गोष्टींची तितकीशी काळजी नाही, जितकी ती शीर्षकगीतामुळे मला दुःख होते, कारण हे गाणं माझा आत्मा आहे, त्याचे शब्द माझ्या आत्म्यात स्थिरावले आहेत. मला त्याच्यामुळे खूप वेदना होतात.’

आता प्रेक्षकांना ओटीटीवरील हा नवीन ‘पवित्र रिश्ता’ किती आवडतो, हे लवकरच कळेल. सध्या शाहीरसोबत अंकिताची जोडी सोशल मीडियावर खूप हिट होत आहे.

अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात!

अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) बऱ्याच दिवसांपासून विकी जैनला (Vicky Jain) डेट करत आहे. ती विकीसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत राहते. चाहत्यांना या दोघांची जोडी आवडते आणि दोघांनीही लवकरच लग्न करावे, अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. दरम्यान, अलीकडेच अंकिताचा सहकलाकार शाहीर शेखने (Shaheer Sheikh) अंकिताच्या लग्नाबद्दल अशी कमेंट केली की ऐकून चाहतेही खूश होतील.

वास्तविक, शाहीर आणि अंकिता त्यांच्या आगामी शो ‘पवित्र रिश्ता 2’चे प्रमोशन करत आहेत. तर, अलीकडेच बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत शाहीरने अंकिताच्या लग्नाबद्दल एक कमेंट केली होती. त्यानंतर अभिनेत्रीने त्याला सर्वांसमोर शट अप म्हटले. असे काहीतरी घडले की, पवित्र रिश्ता 2 नंतर अंकिताला तिच्या पुढील योजनांबद्दल विचारण्यात आले. अंकिता म्हणते की, सध्या तिच्याकडे या शो नंतर काहीच काम हातात नाहीय. नेमकं तेव्हाच शाहीर मधेच म्हणाला की, राहू दे यार, तू लग्न करत आहेस.

अंकिताने शाहीरला केले गप्प

हे ऐकून अंकिता हैराण झाली आणि म्हणाली, ‘तू वेडा आहेस का? गप्प बस… नाही नाही असे काही नाही.’ यानंतर, शाहीर आपला मुद्दा स्पष्ट करताना म्हणतो की, ‘अरे मला काही माहित नाही… मी जे सांगितले ते विसरून जा.’

यानंतर अंकिता म्हणते की, ‘मी सध्या काहीच करत नाहीय. होय, पण फेब्रुवारीपासून मी काहीतरी नवीन सुरू करू शकते.’ अंकिता आणि विकी 3 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत आणि लवकरच ते लग्न बंधनात अडकणार आहेत.

हेही वाचा :

Jiah Khan | जिया खान मृत्यू प्रकरणात सीबीआयची याचिका फेटाळली, सूरज पांचोलीला मोठा दिलासा

Happy Birthday Nia Sharma | अतिशय कमी वयात टीव्ही जगतात नाव कमावणारी अभिनेत्री निया शर्मा, जाणून घ्या अभिनेत्रीबद्दलच्या काही खास गोष्टी

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI