Happy Birthday Nia Sharma | अतिशय कमी वयात टीव्ही जगतात नाव कमावणारी अभिनेत्री निया शर्मा, जाणून घ्या अभिनेत्रीबद्दलच्या काही खास गोष्टी

टेलिव्हिजनची सुंदर आणि बोल्ड अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) आज म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी तिचा 31वा वाढदिवस साजरा करणार आहे. 17 सप्टेंबर 1990 रोजी जन्मलेल्या निया शर्माने 2010 मध्ये स्टार प्लस मालिका 'काली-एक अग्निपरीक्षा' द्वारे आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली.

1/5
टेलिव्हिजनची सुंदर आणि बोल्ड अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) आज म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी तिचा 31वा वाढदिवस साजरा करणार आहे. 17 सप्टेंबर 1990 रोजी जन्मलेल्या निया शर्माने 2010 मध्ये स्टार प्लस मालिका 'काली-एक अग्निपरीक्षा' द्वारे आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर ती अनेक दूरदर्शन मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत दिसली आणि तिच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.

2/5
नियाच्या काही प्रमुख शोमध्ये ‘एक हजारों में मेरी बेहना है’, ‘इस प्यार को क्या नाम दू’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘जमाई राजा’, ‘नागिन 3’, ‘नागिन 5’ इत्यादीं मालिकांचा समावेश आहे. नियाने गेल्या वर्षी कलर्स टीव्हीच्या रिअॅलिटी शोमध्ये 'फीअर फॅक्टर - खतरों के खिलाडी - मेड इन इंडिया' या शोचे विजेतेपदही पटकावले आहे. अलीकडेच नियाची वेब सीरीज ‘जमाई राजा 2.0’ सीझन 2 झी 5 वर रिलीज झाली आहे. रवी दुबेसोबत नियाची जबरदस्त केमिस्ट्री या मालिकेत दाखवण्यात आली आहे.

3/5
याशिवाय, अलीकडेच निया करण जोहरचा शो ‘बिग बॉस ओटीटी’मध्येही दिसली होती. या सगळ्याशिवाय, निया अनेक म्युझिक व्हिडीओमध्ये देखील दिसली. निया सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करते. सोशल मीडियावर नियाची फॅन फॉलोइंग बरीच मोठी आहे. निया तिच्या बोल्ड लूकमुळे अनेकदा चर्चेत असते.

4/5
छोट्या पडद्यावरील चर्चित अभिनेत्री निया शर्मा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. तिचा प्रत्येक व्हिडीओ आणि फोटो पोस्ट होताच खूप चर्चेत येतो. निया शर्माचा बिनधास्त अंदाज प्रसिद्ध असून, तिच्या चाहत्यांना ही तिचा हा अंदाज फार आवडतो. याशिवाय तिचा बोल्ड अवतार देखील चाहत्यांमध्ये खूप चर्चेत असतो.

5/5
रिपोर्ट्सनुसार निया लवकरच वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. तथापि, तिने अद्याप आपला नवा प्रोजेक्ट जाहीर केलेला नाही. निया शर्माला तिच्या या स्टाईलसाठी आशियातील तिसऱ्या क्रमांकाची ‘मादक महिला’ ही पदवीही मिळाली आहे. नियाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ट्विस्टेड’ या वेब सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांना चांगलाच आवडला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI