Bigg Boss Marathi 3 |  कर्करोगावर यशस्वी मात, वेदना होत असतानाही ‘शो मस्ट गो ऑन’, ‘बिग बॉस मराठी 3’ धुरा सांभाळण्यास महेश मांजरेकर सज्ज!

बहुचर्चित ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi 3) तिसऱ्या पर्वाची नांदी झाली आहे. 19 सप्टेंबरला ‘बिग बॉस मराठी 3’चा ग्रँड प्रिमिअर होणार आहे. दिग्गज अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकरच यंदाही सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘कलर्स मराठी’वर बिग बॉसचा शानदार प्रोमो रिलीज करण्यात आला आहे.

Bigg Boss Marathi 3 |  कर्करोगावर यशस्वी मात, वेदना होत असतानाही ‘शो मस्ट गो ऑन’, ‘बिग बॉस मराठी 3’ धुरा सांभाळण्यास महेश मांजरेकर सज्ज!
Bigg Boss Marathi 3
Follow us
| Updated on: Sep 17, 2021 | 1:31 PM

मुंबई : बहुचर्चित ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi 3) तिसऱ्या पर्वाची नांदी झाली आहे. 19 सप्टेंबरला ‘बिग बॉस मराठी 3’चा ग्रँड प्रिमिअर होणार आहे. दिग्गज अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकरच यंदाही सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘कलर्स मराठी’वर बिग बॉसचा शानदार प्रोमो रिलीज करण्यात आला आहे.

19 सप्टेंबरला संध्याकाळी सात वाजता ‘बिग बॉस मराठी 3’चा ग्रँड प्रिमिअर होणार आहे. त्यानंतर दररोज रात्री साडेनऊ वाजता प्रेक्षकांना हा शो पाहता येणार आहे. शंभर दिवस वेगवेगळ्या क्षेत्रातील 15 सेलिब्रिटी ‘बिग बॉस’च्या घरात एकत्र बंदिस्त होतील. अनलॉक एंटरटेनमेंट अशी बिग बॉसच्या नव्या सीझनची थीम आहे. महेश मांजरेकर प्रकृतीच्या कारणास्तव बिग बॉसचं सूत्रसंचालन करतील की नाही, अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र प्रोमोमध्ये मांजरेकरांचं दर्शन घडल्याने चाहत्यांनाही दिलासा मिळाला आहे.

कर्करोगावर मात

काही दिवसांपूर्वीच सुप्रसिद्ध कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांना कर्करोग झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांना मूत्राशयाचा कर्करोग झाला होता. यानंतर मुंबईतील एच एन रिलायन्स रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. महेश मांजरेकर यांची प्रकृती पूर्णपणे ठीक असून, ते कर्करोग मुक्त झाले आहेत. महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या लेकीने देखिल त्यांची हेल्थ अपडेट शेअर केली होती. दरम्यान याच काळात त्यांनी ‘बिग बॉस 3’चे शूटिंग सुरु केले होते.

शुटिंग दरम्यान देखील होत होत्या वेदना

नुकतीच या कार्यक्रमाची पत्रकार परिषद पार पडली. यात महेश मांजरेकर यांनी प्रोमो शुटिंग दरम्यानचा अनुभव शेअर केला. या विषयी सांगताना महेश मांजरेकर म्हणाले की, मी नुकताच आजारातून बरा होत होतो आणि याच वेळी ‘बिग बॉस मराठी 3’ची घोषणा झाली. शस्त्रक्रिया झाली असली तरी, त्यावेळी मला कॅथेटर लावला होता. त्याच्या ट्यूब शरीरावर होत्या. अशा परिस्थितही ‘शो मस्ट गो ऑन’ म्हणत मी बिग बॉस मराठी सीझन 3च्या प्रोमो शूटसाठी तयार झालो होतो. शूटिंग वेळी या ट्यूब लपवण्यात आल्या होत्या. शूट दरम्यान वेदनादेखील जाणवत होत्या. शरीरात ऊर्जा कमी होती, पण मनात कामाचा जोश होता. आणि अशा प्रकारे हे शूट आम्ही पूर्ण केलंच!’

नव्या चित्रपटाचीही घोषणा

महेश मांजरेकर यांनी आतापर्यंत मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. मराठीतील अनेक लोकप्रिय आणि दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. आजघडीला मराठीतील एक प्रथितयश दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून महेश मांजरेकर यांचे नाव घेतले जाते. याशिवाय, बॉलीवूडमध्येही महेश मांजरेकर हे नाव सुपरिचित आहे. ‘वॉन्टेड’, ‘रेडी’, ‘दबंग’, ‘जिंदा’, ‘मुसाफिर’ आणि ‘काँटे’ यासारख्या लोकप्रिय बॉलिवूड चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच महेश मांजरेकर यांनी ‘व्हाईट’ या चित्रपटाची घोषणा केली होती.

हेही वाचा :

KBC 13 | ‘केबीसी 13’च्या मंचावर ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा बनला पोलीस, अमिताभ बच्चन यांचा प्रसिद्ध डायलॉग ऐकवला हरयाणवी भाषेत!

Mahesh Kothare | मालिकेच्या सीन दरम्यान घडली चूक, महेश कोठारेंनी मागितली प्रेक्षकांची जाहीर माफी! पाहा नेमकं काय झालं…

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.