Samantha New Film : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान समंथाने स्वीकारला नवा चित्रपट, ब्रेक घेण्याचा निर्णय केला रद्द?

समंथा अक्किनेनी (Samantha Akkineni) दक्षिण चित्रपट विश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. समंथा अक्किनेनी गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैवाहिक जीवनात आलेल्या वादळामुळे सतत चर्चेत आहे आणि आता पुन्हा एकदा तिच्याबद्दल नवी चर्चा सुरू झाली आहे.

Samantha New Film : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान समंथाने स्वीकारला नवा चित्रपट, ब्रेक घेण्याचा निर्णय केला रद्द?
Samantha Akkineni

मुंबई : समंथा अक्किनेनी (Samantha Akkineni) दक्षिण चित्रपट विश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. समंथा अक्किनेनी गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैवाहिक जीवनात आलेल्या वादळामुळे सतत चर्चेत आहे आणि आता पुन्हा एकदा तिच्याबद्दल नवी चर्चा सुरू झाली आहे. पण ही चर्चा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नाही, तर तिने नवा चित्रपट साईन करण्याबद्दल आहे.

नवीन चित्रपट केला साईन

अहवालांनुसार, तिने श्रीदेवी प्रॉडक्शनच्या एका विशेष प्रोजेक्टवर स्वाक्षरी केली आहे. असे सांगितले जात आहे की, जेव्हा या चित्रपटाच्या निर्मात्याने समंथाला आशादायक भूमिका आणि मजबूत स्क्रिप्टबद्दल सांगितले, तेव्हा सामंथा भूमिका आणि कथा या दोन्ही गोष्टींनी खूप प्रभावित झाली.

Pinkvillaच्या बातमीनुसार, तिने या चित्रपटाला ‘हो’ म्हटले आहे आणि एक नवीन कलाकार तिच्यासोबत या चित्रपटात स्क्रीन शेअर करेल. ज्यासाठी समंथाला कोणतीही अडचण नाही. तथापि, या चित्रपटाशी संबंधित कोणत्याही व्यक्तीने किंवा समंथा यांनी कोणतीही अधिकृत घोषणा किंवा विधान केलेले नाही.

स्त्री केंद्रित असेल हा चित्रपट

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा चित्रपट स्त्रीभिमुख असणार आहे. यात समंथा मुख्य भूमिका साकारणार आहे. ज्यासाठी समंथा खूप उत्साहित असल्याचे सांगितले जाते. निर्मात्यांनीही समंथा ‘हो’ म्हणताच चित्रपटाचे प्री-प्रोडक्शन काम सुरू केले आहे.

त्याचबरोबर, सामंथाने तिच्या उर्वरित चित्रपटांची शूटिंग नोव्हेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे वचन दिले आहे. त्यानंतर असे म्हटले जात आहे की, या चित्रपटाचे शूटिंग नोव्हेंबरमध्ये सुरू होईल. चित्रपट आणि इतर सर्व काही या संदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे.

अभिनेत्रीच्या घटस्फोटाची चर्चा

प्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्कीनेनी आणि नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य यांनी 2017मध्ये लग्न केले. दोघेही दक्षिण भारतीय मनोरंजन विश्वाची क्यूट जोडी मानली जाते. परंतु, त्यांचे वैवाहिक आयुष्य चांगले जात नसल्याच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. नुकतेच दोघांनी विवाह समुपदेशकाची भेटही घेतली होती. यामागे त्यांचा घटस्फोट हेच कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. असेही म्हटले जाते की, नागा चैतन्य कुटुंब नियोजनाचा विचार करत आहेत आणि त्यासाठी त्यांनी समंथा यांनी काही काळ चित्रपट करणे थांबवावे आणि कुटुंबाला पुढे न्यावे अशी इच्छा आहे.

दुसरीकडे, सामंथा तिच्या कारकिर्दीत उत्तम कामगिरी करत आहे आणि या क्षणी ती काम सोडायला तयार नाही आणि आता ज्या प्रकारे तिने नवीन चित्रपट साईन केला आहे, असे दिसते की तिला खरोखरच तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे.

हेही वाचा :

New Name | आत ‘रावणलीला’ नव्हे! प्रतीक गांधीच्या आगामी चित्रपटाचे नाव बदलले, पाहा ‘हे’ असणार नवे नाव!

Thipkyanchi Rangoli : स्टार प्रवाहवर नवी मालिका ‘ठिपक्यांची रांगोळी’, अभिनेते शरद पोंक्षे येणार भेटीला

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI