AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss OTT Grand Finale : ‘बिग बॉस ओटीटी’ची सांगता होणार, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहू शकता महाअंतिम सोहळा…

बिग बॉसचे ओटीटी व्हर्जन अर्थात ‘बिग बॉस ओटीटी’ (Bigg Boss OTT) आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. बिग बॉस ओटीटीचा ग्रँड फिनाले आज म्हणजेच शनिवारी होणार आहे. करण जोहरने होस्ट केलेल्या या शोची ट्रॉफी आज शमिता शेट्टी, राकेश बापट, दिव्या अग्रवाल, निशांत भट्ट आणि प्रतीक सहजपाल यांच्यापैकी एक पटकावणार आहे.

Bigg Boss OTT Grand Finale : ‘बिग बॉस ओटीटी’ची सांगता होणार, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहू शकता महाअंतिम सोहळा...
Bigg Boss OTT
| Edited By: | Updated on: Sep 18, 2021 | 11:41 AM
Share

मुंबई : बिग बॉसचे ओटीटी व्हर्जन अर्थात ‘बिग बॉस ओटीटी’ (Bigg Boss OTT) आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. बिग बॉस ओटीटीचा ग्रँड फिनाले आज म्हणजेच शनिवारी होणार आहे. करण जोहरने होस्ट केलेल्या या शोची ट्रॉफी आज शमिता शेट्टी, राकेश बापट, दिव्या अग्रवाल, निशांत भट्ट आणि प्रतीक सहजपाल यांच्यापैकी एक पटकावणार आहे. बॉलिवूडची स्टार जोडी जिनीलिया आणि रितेश देशमुख बिग बॉस ओटीटीच्या या ग्रँड फिनालेमध्ये दिसणार आहेत.

ग्रँड फिनालेच्या एक दिवस आधी, कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया शोमध्ये बिग बॉस ओटीटी घरात दाखल झाले आहेत. त्यांनी बीबी ओटीटी पुरस्कारांचे आयोजन केले. फायनलिस्टना टास्क दरम्यान त्यांच्या बिग बॉस ओटीटी आठवणी पुन्हा पाहण्याची संधी मिळाली. या टास्क दरम्यान त्याला एक फोटो सुरक्षित ठेवावा लागला, तर दुसरा कट करावा लागला. त्यांच्या सुंदर आठवणी पाहून स्पर्धक खूप भावूक झाले होते.

बिग बॉस ओटीटीचा ग्रँड फिनाले तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

बिग बॉस ओटीटी ग्रँड फिनालेची वेळ काय आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. ‘बिग बॉस ओटीटी’ ग्रँड फिनालेची वेळ संध्याकाळी 7 वाजता आहे. बिग बॉसचे दर्शक या शोचे थेट प्रक्षेपण वूट अॅपवर पाहू शकतात. हा शो फक्त Viacom च्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार आहे.

फिनाले नाईटमध्ये पहिले पाच स्पर्धक आपले सर्वोत्तम सादरीकरण करणार आहेत. एवढेच नाही तर माजी स्पर्धक देखील या शोमध्ये दिसतील, ज्यामुळे ही संध्याकाळ अधिक रंगीबेरंगी होईल. असे म्हटले जातेय की, बिग बॉस ओटीटीचे माजी स्पर्धक ग्रँड फिनालेच्या स्टेजवर आपले नृत्य कौशल्य दाखवू शकतात. बिग बॉस ओटीटीचा ग्रँड फिनाले पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.

कोण जिंकेल ट्रॉफी?

‘बिग बॉस ओटीटी’चे टॉप 5 स्पर्धक म्हणजे शमिता शेट्टी, राकेश बापट, दिव्या अग्रवाल, प्रतीक सहजपाल आणि निशांत भट्ट आहेत. आता प्रश्न हा आहे की, या पाच स्पर्धकांपैकी कोण आज बिग बॉस ओटीटी ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाणार आहे? जर, तुम्ही सुरुवातीपासूनच शो बघितला तर शमिता शेट्टी आणि प्रतीक सहजपाल या ट्रॉफीचे मुख्य दावेदार म्हणून पाहिले जात आहेत. मात्र, दिव्या अग्रवालची फॅन फॉलोइंगही खूप जास्त आहे, त्यामुळे दिव्या अग्रवालच्या जिंकण्याची अनेक शक्यता आहे. दुसरीकडे, जर आपण राकेश बापट आणि निशांत भट्ट यांच्याबद्दल बोललो, तर असे वाटते की ते ही ट्रॉफी मिळवण्यापासून वंचित राहू शकतात. मात्र, आता ठोस असे काही सांगता येणार नाही.

हेही वाचा :

आता लवकरच होणार ‘लग्नकल्लोळ’, अभिनेत्री मयुरी देशमुखचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

Samantha New Film : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान समंथाने स्वीकारला नवा चित्रपट, ब्रेक घेण्याचा निर्णय केला रद्द?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.