AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता लवकरच होणार ‘लग्नकल्लोळ’, अभिनेत्री मयुरी देशमुखचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

लग्नसंस्थेवर भाष्य करणारा  'लग्नकल्लोळ' हा थोडासा वेगळ्या धाटणीचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून त्याचा टिझर सोशल मिडियावर प्रदर्शित झाला आहे. मयूर तिरमखे फिल्म्स प्रस्तुत आणि मोहम्मद बर्मावाला दिग्दर्शित 'लग्नकल्लोळ' (Lagnakallol) हा चित्रपट लग्नाच्या एका वेगळ्या पैलूवर प्रकाशझोत टाकणारा आहे.

आता लवकरच होणार 'लग्नकल्लोळ', अभिनेत्री मयुरी देशमुखचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!
लग्नकल्लोळ
| Edited By: | Updated on: Sep 18, 2021 | 11:18 AM
Share

मुंबई : असे म्हणतात, ‘लग्न पहावे करून’. लग्न ही बाब एकच असली तरी त्याची प्रत्येकाची कहाणी वेगवेगळी असते. याच लग्नसंस्थेवर भाष्य करणारा  ‘लग्नकल्लोळ’ हा थोडासा वेगळ्या धाटणीचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून त्याचा टिझर सोशल मिडियावर प्रदर्शित झाला आहे. मयूर तिरमखे फिल्म्स प्रस्तुत आणि मोहम्मद बर्मावाला दिग्दर्शित ‘लग्नकल्लोळ’ (Lagnakallol) हा चित्रपट लग्नाच्या एका वेगळ्या पैलूवर प्रकाशझोत टाकणारा आहे.

या चित्रपटात सिद्धार्थ जाधव (Sidharth Jadhav), भूषण प्रधान (Bhushan Pradhan), मयुरी देशमुख (Mayuri Deshmukh) यांच्या मुख्य भूमिका असून डॉ. मयूर तिरमखे, अण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल अण्णासाहेब तिरमखे हे या चित्रपटाचे निर्माता आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांना लग्नसंस्थेच्या एका वेगळ्या बाजूची ओळख करून देईल हे नक्की.

दुःख सावरत मयुरीचे पुरागमन

अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीने जवळपास दहा महिन्यांपूर्वी नांदेडमध्ये आत्महत्या केली होती. उदयोन्मुख अभिनेता आशुतोष भाकरे याने वयाच्या 32 व्या वर्षी नांदेडमध्ये राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवले होते. नैराश्यामुळे आशुतोषने आत्महत्या केली, असे म्हटले गेले होते. या घटनेने मयुरी देशमुखसह तिच्याच्या चाहत्यांनादेखील मोठा धक्का बसला होता. यानंतर दुःख सावरत मयुरीने हिंदी मालिका ‘इमली’द्वारे आपले काम सुरु केले.

आई घरात असतानाच अभिनेत्याने घेतला गळफास

नांदेडमधील गणेश नगर इथल्या घरी मयुरी आणि आशुतोषची आई घरात गप्पा मारत बसल्या होत्या. त्यावेळी आशुतोष वरच्या खोलीत होता. बराचवेळ झाला आशुतोष खाली आला नाही. त्यावेळी त्याचा दरवाजा ठोठावल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने, दुसऱ्या बाजूने खोलीत डोकावून पाहिले. त्यावेळी आशुतोष लटकलेल्या अवस्थेत दिसला आणि एकच थरकाप उडाला.

आशुतोष नैराश्यात होता

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर आशुतोषने फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओतील व्यक्ती, माणूस आत्महत्या का करतो? याबाबत विश्लेषण करताना दिसत होती. मात्र, तरीही आशुतोष इतका टोकाचा निर्णय घेईल, अशी कुणाला कल्पना नव्हती. आशुतोष गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होता, अशी माहिती त्याच्या कुटुंबियांनी दिली होती.

मूल दत्तक घेण्याचा विचार

दुसरं लग्न करणार का?, असा प्रश्न अभिनेत्रीला एकदा विचारण्यात आला होत. यावर उत्तर देताना ती म्हणाली, “माझं आजही आशुतोषवर मनापासून प्रेम आहे. आजही तो माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. त्याच्या प्रेमासह मी एकटी आयुष्य घालवू शकते. आशुतोषला त्याच्या भाचीचा खूप लळा होता. त्याला लहान मुलं खूप आवडायची. त्यामुळेच मी मूल दत्तक घेण्याचा विचार करत आहे. अनेक जण मला दुसऱ्या लग्नाबद्दल आडून-आडून सुचवू पाहतात. मात्र मुलांसाठी दुसरं लग्न करण्याची काय आवश्यकता आहे?” असा प्रश्नच तिने विचारला.

मयुरी देशमुख सध्या स्टार प्लस (Star Plus) वाहिनीवर ‘इमली’ (Imli) या मालिकेत अभिनेता गश्मीर महाजनीसह (Gashmir Mahajani) मुख्य भूमिकेत दिसते आहे. तिने खुलता कळी खुलेना या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. तर डिअर आजो या नाटकाचे लेखन करण्यासोबतच तिने अभिनयही केला होता.

हेही वाचा :

Samantha New Film : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान समंथाने स्वीकारला नवा चित्रपट, ब्रेक घेण्याचा निर्णय केला रद्द?

New Name | आत ‘रावणलीला’ नव्हे! प्रतीक गांधीच्या आगामी चित्रपटाचे नाव बदलले, पाहा ‘हे’ असणार नवे नाव!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.