Tamasha Live : ‘तमाशा लाईव्ह’च्या चित्रिकरणाचा श्रीगणेशा, सचित पाटील आणि सोनाली कुलकर्णी झळकणार मुख्य भूमिकेत

संजय जाधव दिग्दर्शित आणि सचित पाटील, सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या चित्रिकरणाचा मुहूर्त सोहळा नुकतंच मुंबईत संपन्न झाला. (Tamasha Live : Sachit Patil and Sonalee Kulkarni to star in 'Tamasha Live')

Tamasha Live : ‘तमाशा लाईव्ह'च्या चित्रिकरणाचा श्रीगणेशा, सचित पाटील आणि सोनाली कुलकर्णी झळकणार मुख्य भूमिकेत
Follow us
| Updated on: Sep 18, 2021 | 5:00 PM

मुंबई : हळूहळू आता सर्वत्र सुरळीत होत असतानाच सिनेसृष्टीही पूर्वपदावर येऊ लागली आहे. अनेक मोठमोठ्या चित्रपटाच्या घोषणा होत असतानाच काही दिवसांपूर्वीच प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित आणि एस. एन. प्रॉडक्शन सहनिर्मित ‘तमाशा लाईव्ह’ (Tamasha Live) या बिग बॅनर चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली होती. पोस्टरवरूनच या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली होती. आता या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात झाली आहे.

चित्रपटात सचित पाटील आणि सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका

संजय जाधव दिग्दर्शित आणि सचित पाटील, सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या चित्रिकरणाचा मुहूर्त सोहळा नुकतंच मुंबईत संपन्न झाला. संजय जाधव यांची पटकथा असलेल्या या चित्रपटाची कथा मनीष कदम यांची असून संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. दिवाळी 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘तमाशा लाईव्ह’ची अक्षय बर्दापूरकर, अभयानंद सिंग आणि पियुष सिंग यांनी निर्मिती केली आहे तर सचित पाटील आणि नितीन प्रकाश वैद्य सहनिर्माते आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने सचित पाटील निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. या संगीतमय चित्रपटाला अमितराज, पंकज पडघन यांचे संगीत लाभले असून क्षितिज पटवर्धन यांनी ही गाणी शब्दबद्ध केली आहेत. या चित्रपटात सुमारे तीस गाणी आहेत. मराठीत असा प्रयोग पहिल्यांदाच होत आहे.

दिग्दर्शक संजय जाधव यांची प्रतिक्रिया

‘तमाशा लाईव्ह’विषयी दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले, ” सोनाली आणि माझी सुरुवातीपासूनच मैत्री असल्याने त्याचा फायदा आम्हाला काम करतानाही होत आहे. मुळात सोनाली एक उत्तम अभिनेत्री आहे. त्यामुळे तिच्या कामाबद्दल मला अधिक काही सांगायची गरजच नाही. सचित पाटीलचा अभिनयही आपण सर्वांनीच पाहिला आहे. प्रथमच तो निर्मात्याची धुराही सांभाळणार आहे आणि ‘प्लॅनेट मराठी’सोबत हा माझा दुसरा प्रोजेक्ट आहे. त्यामुळे साहजिकच मी खूप खूष आहे. एकंदरच ‘तमाशा लाईव्ह’साठी मी खूपच उत्सुक आहे.”

निर्मिती क्षेत्रातील पदार्पणाविषयी सचित पाटीलनं व्यक्त केल्या भावना

निर्मिती क्षेत्रातील पदार्पणाविषयी सचित पाटील म्हणतो, ”आजवर मी पडद्यावर अनेक भूमिका केल्या यावेळी पहिल्यांदाच पडद्यासोबतच पडद्यामागची निर्मात्याची भूमिकाही साकारणार आहे. मला खूप आनंद आहे की, ‘तमाशा लाईव्ह’च्या निमित्ताने मी संजय जाधव, अक्षय बर्दापूरकर आणि ‘प्लॅनेट मराठी’च्या परिवाराशी जोडला जाणार आहे आणि या सगळ्यात माझा मित्र नितीन वैद्य मला साथ देत आहे. आमच्यासाठी हे स्वप्नवत आहे. कारण निर्मिती पदार्पणासाठी आम्ही एका चांगल्या चित्रपटाच्या शोधात होतो आणि ‘तमाशा लाईव्ह’ सारखा एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट आम्हाला करायला मिळतोय.मला खात्री आहे हा चित्रपट प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल.”

संबंधित बातम्या

Rajeshwari Kharat: लाल परी…. चाहत्यांना वेडापिसा करणारा राजेश्वरी खरातचा बोल्ड लूक पाहिलाय का?

Janhvi Kapoor : वर्कआऊट मोड ऑन, पाहा जान्हवी कपूरची जिममध्ये कसरत

‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ मालिकेला प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद, तरूणाईला समजतंय एकत्र कुटुंबाचं महत्त्व!

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.