AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : लखनऊ संघात सर्वात मोठा बदल, तयारी अशी केली की…बदल पाहून चकित व्हाल!

लखनौ सुपर जायंट्स या संघाने खूप मोठा आणि महत्त्वाचा बदल केला आहे. त्यामुळे यावेळी हा संघ ट्रॉफीवर आपले नाव कोरणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या संघाकडे यावेळी चांगले खेळाडू आहेत.

IPL 2026 : लखनऊ संघात सर्वात मोठा बदल, तयारी अशी केली की...बदल पाहून चकित व्हाल!
lucknow super giantsImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 24, 2026 | 9:47 PM
Share

IPL 2026 : टी-20 विश्वचषक स्पर्धा संपताच भारतात आयपीएल या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्यामुळेच या स्पर्धेच्या आयोजनाची तयारी केली जात आहे. सर्वच संघ खेळाडूंसाठी सराव, इतर सोई-सुविधा तसेच सपोर्टिंग स्टाफचे नियोजन करत आहे. यावेळी आपण कसे जिंकू शकतो, त्यासाठी प्रत्येक संघ स्ट्रॅटेजी आखत आहे.

लखनऊ संघाने नेमका काय बदल केला?

असे असतानाच लखनऊ सुपर जायंट्स या संघासाठी खूप चांगली बातमी मिळाली आहे. लखनऊ सुपर जायंट्स या संघाने आपल्या संघाचा लोगो जारी केला आहे. लखनऊ संघाचा हा लोगो खूपच विशेष आहे. त्यामुळे यावेळी हा संघ ट्रॉफी जिंकणारच, असा विश्वास या संघाच्या चाहत्यांकडून व्यक्त केला जात आहे. लखनऊ सुपर जायंट्स या संघाने आपल्या संघाचा नवा लोगो खूपच विशेष पद्धतीने तयार केला आहे. या लोगोमध्ये भवनान श्री गणेश आहेत. तीन शक्तिशाली प्रतिकांचा वापर करून लखनऊ या संघाने उत्तर प्रदेश या राज्याच्या संस्कृतीचा परिचय करून देण्याचा प्रयत्न या लोगोच्या माध्यमातून केला आहे.

लखनऊ संघाच्या लोगोत नेमकं काय?

लखनऊ संघाच्या नव्या लोगोमध्ये डाव्या आणि उजव्या बाजूला पंख आहेत. हे गरुडाचे पंख आहेत. त्यानंतर या लोगोंमध्ये मुकूट आहे. हा मुकूट राजेशाही आणि शक्तीचे प्रतिक आहे. लोगोच्या मध्ये हत्ती आहे. म्हणजेच लखनऊच्या संघात साक्षात भगवान श्री गणेश आहेत. लखनऊ सुपर जायंट्स हा संघ 2022 साली आयपीएलमध्ये आला. त्यावेळी या संघाचे कर्णधारपद के एल राहुलकडे होते. हा संघा पहिल्याच वर्षी प्लेऑफपर्यंत पोहोचला होता.

संघाची आतापर्यंतची कामगिरी कशी?

लखनऊ सुपर जायंट्स हा संघ 2024 सालीदेखील चांगली कामगिरी करू शकला नव्हता. हा संघ पॉइंट्स टेबलवर सातव्या स्थानी होता. 2025 साली या संघाचे कर्णधारपद ऋषभ पंतकडे देण्यात आले होते. हा सघं 2025 सालीदेखील सातव्या स्थानी होता. आता यावेळी ट्रॉफ जिंकण्यासाठी या संघाने पूर्ण ताकद लावली आहे. संघाचा लोगोही बदलला आहे. सोबतच यावेळी संघाकडे चांगले खेळाडू आहे. त्यामुळे यावळी हा संघ काय कामगिरी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...