Happy Birthday Mandakini | पहिल्याच चित्रपटातील बोल्ड सीनमुळे मंदाकिनी चर्चेत, अंडरवर्ल्ड डॉनसोबतही जुळलेले सूर!  

| Updated on: Jul 30, 2021 | 11:17 AM

80च्या दशकात आपल्या सौंदर्याने चाहत्यांच्या हृदयाला घायाळ करणाऱ्या अभिनेत्री मंदाकिनीचा (Mandakini) आज वाढदिवस आहे. 30 जुलै 1963 रोजी जन्मलेल्या मंदाकिनीने आपल्या काळात अनेक बड्या अभिनेत्रींना तगडी टक्कर दिली होती.

Happy Birthday Mandakini | पहिल्याच चित्रपटातील बोल्ड सीनमुळे मंदाकिनी चर्चेत, अंडरवर्ल्ड डॉनसोबतही जुळलेले सूर!  
मंदाकिनी
Follow us on

मुंबई : 80च्या दशकात आपल्या सौंदर्याने चाहत्यांच्या हृदयाला घायाळ करणाऱ्या अभिनेत्री मंदाकिनीचा (Mandakini) आज वाढदिवस आहे. 30 जुलै 1963 रोजी जन्मलेल्या मंदाकिनीने आपल्या काळात अनेक बड्या अभिनेत्रींना तगडी टक्कर दिली होती. मंदाकिनीने तिच्या कारकीर्दीत अनेक बोल्ड सीन केले. एक काळ असा होता की मंदाकिनीची क्रेझ चाहत्यांच्या मनावर पसरली होती.

मंदाकिनाने राज कपूरच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मंदाकिनीचे खरे नाव यास्मिन जोसेफ होते. यास्मीन जोसेफ उत्तर प्रदेशमधील मेरठची रहिवासी होती आणि चित्रपटांमध्ये झळकल्यानंतर तिने आपले नाव मंदाकिनी असे करून घेतले होते.

पहिल्याच चित्रपटाने उडवली खळबळ

मंदाकिनीने तरुण वयातच सिनेसृष्टीत पदार्पण केले. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी राज कपूरच्या चित्रपटातून अभिनेत्रीने मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते. मंदाकिनीच्या या चित्रपटाचे नाव ‘राम तेरी गंगा मैली’ असे होते. तिच्या पहिल्या चित्रपटापासूनच मंदाकिनी सुपरस्टार बनली. पहिल्याच चित्रपटात मंदाकिनीने जबरदस्त बोल्ड सीन दिले होते. मंदाकिनींनी त्यावेळी दिलेली दृश्ये इतर अभिनेत्रींसाठी सहसा सोपी नव्हती.

मंदाकिनीचे दाऊदशी नाते

मंदाकिनी जेव्हा आपले करिअर बनवण्यात गर्क होती, तेव्हा या सुंदर अभिनेत्रीचे नाव दाऊद इब्राहिमशी जोडले गेले. यावेळी सर्वत्र मंदाकिनीचे दाऊदबरोबर असलेल्या संबंधावर चर्चा झाली. असं म्हणतात की, अभिनेत्रीने दाऊदबरोबर दुबईमध्ये राहण्यास सुरुवात केली होती.

फोटो आला चर्चेत

1994 मध्ये एक फोटो समोर आला होता, त्यात मंदाकिनी दाऊदसोबत दिसली होती. ज्यानंतर तिच्या आणि दाऊदच्या नात्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले. पण एका मुलाखतीत मंदाकिनी म्हणाली होती की, मला माहित नाही की माझे नाव किती काळ दाऊदशी जोडले जाईल. मी अनेक वेळा सांगितले आहे की, मी दाऊदसोबत कधीच रोमँटिक रिलेशनशिपमध्ये राहिलेले नाही.

करिअर यशस्वी झालेच नाही!

पहिल्या चित्रपटातून स्टार झाल्यानंतरही मंदाकिनीला चित्रपट जगात फारसे यश मिळू शकले नाही. तिच्या कारकिर्दीत सुमारे 42 चित्रपट केल्यानंतर अचानक मंदाकिनीला चित्रपट मिळणे बंद झाले. मंदाकिनीला दाऊदमुळे अनेक चित्रपटांमध्ये काम मिळाले असले, तरी ती फार काही कमाल करू शकली नाही.

1990 मध्ये बांधली लग्नगाठ

मंदाकिनीने अत्यंत सोप्या पद्धतीने सात फेरे घेतल्या. अभिनेत्रीने 1990मध्ये डॉ.काग्यूर टी रिन्पोचे ठाकूर यांच्याशी लग्न केले. अभिनेत्रीचा पती 70 ते 80 च्या दशकात मर्फी रेडिओच्या प्रिंट जाहिरातींमध्ये दिसला होता. अभिनेत्रीचा नवरा मुंबईत तिबेटियन हर्बल सेंटर चालवतो. तर मंदाकिनी आता तिबेटमध्येच योगा शिकवते. त्यांना दोन मुलेही आहेत.

(Happy Birthday Mandakini Bold scenes from the very first film make Mandakini the talk of the town)

हेही वाचा :

Khushi Kapoor : खुशी कपूरच्या फोटोशूटवर खिळल्या नेटकऱ्यांच्या नजरा, सोशल मीडियावर कल्ला

 ‘टॅलेंटची खाण’ सोनू सूद, अभिनयाव्यतिरिक्त ‘या’ गोष्टींमध्येही तज्ज्ञ!