Happy Birthday Sonu Sood | ‘टॅलेंटची खाण’ सोनू सूद, अभिनयाव्यतिरिक्त ‘या’ गोष्टींमध्येही तज्ज्ञ!

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) कदाचित चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका सकारात असेल, परंतु कोरोना काळात त्याने ज्या प्रकारे लोकांना मदत केली, तो त्यांचा ‘मसीहा’ बनला आहे.

Happy Birthday Sonu Sood | ‘टॅलेंटची खाण’ सोनू सूद, अभिनयाव्यतिरिक्त ‘या’ गोष्टींमध्येही तज्ज्ञ!
सोनू सूद
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Jul 30, 2021 | 10:21 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) कदाचित चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका सकारात असेल, परंतु कोरोना काळात त्याने ज्या प्रकारे लोकांना मदत केली, तो त्यांचा ‘मसीहा’ बनला आहे. नि:स्वार्थपणे लोकांना मदत करून, तो देशातील लोकांसाठी त्यांचा खऱ्या आयुष्यातील नायक बनला आहे. एवढेच नाही तर तो एक उत्कृष्ट अभिनेता आहे आणि त्याने हिंदी, इंग्रजी, तमिळ, कन्नड आणि पंजाबी या पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनयाव्यतिरिक्त सोनू इतर अनेक गोष्टींमध्ये माहिर आहे. आज अर्थात 30 जुलै रोजी सोनू आपला 48वा वाढदिवस साजरा करत आहे.

अभिनेता सोनू सूद सध्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव झाला आहे आणि आपल्या कौशल्यांनी चाहत्यांचे मनोरंजन करतो. तो त्याच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात खूप चांगले संतुलन राखतो. अलीकडेच, त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो ‘हेअरस्टाईल’ करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तिने सांगितले की, ‘हेअरस्टाईलिंग ही एक कला आहे आणि त्याने या गोष्टीबद्दल खूप सरावही केला आहे. हेअर स्टाईल करणे ही त्याची आवड असल्याचेही त्याने सांगितले. या व्हिडीओमध्ये आपण हे पाहू शकता की, सोनू एका व्यक्तीच्या केसांची स्टाईल करत आहे. पान हा माणूस चक्क टकलू आहे. हा व्हिडीओ केवळ मनोरंजनाच्या हेतूने बनवण्यात आला असून, आपण त्याची मजेदार शैली पाहू शकता.

View this post on Instagram

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

तंदूरवर बनवल्या रोटी

सोनूने काही काळापूर्वी एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यात तो तंदूरवर रोटी बनवताना दिसत होता. या व्हिडीओमध्ये तो असे म्हणत आहे की, ‘सोनू सूद दा पंजाबी ढाबा’च्या रोट्या खाणाऱ्याला त्या विसरता येणार नाही. या ढाब्यात रोट्या खूप लवकर बनवल्या जातात आणि जर तुम्ही कधी पंजाबला आलात तर या ढाब्यावर नक्की या. त्यांची ही शैली पाहून त्यांच्या एका चाहत्याने असेही लिहिले की, ‘एकच हृदय आहे, आणि तुम्ही किती वेळा जिंकणार साहेब.’

View this post on Instagram

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

बँड देखील वाजवतो

सोनू सूदला बँड कसा वाजवायचा हे देखील माहित आहे. त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये स्वत: सोनू बँड सदस्यांसह बँड वाजवताना दिसला. आपल्या व्हिडीओमध्ये त्याने असेही म्हटले आहे की, लग्नासाठी तुम्हाला कधी बॅन्डची आवश्यकता असेल तर आमच्याशी संपर्क साधा. आमचा बँड तयार आहे. हा व्हिडीओ पाहून सोनूच्या चाहत्यांनीही बऱ्याच मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

इतकेच नाही तर सोनू सूद दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ शेअर करत राहतो, ज्यामध्ये तो कपडे शिवताना, कधी लिंबूपाणी बनवताना, तर कधी रिक्षा चालवताना दिसतो. सोनू आपल्या याच शैलीने चाहत्यांची मने जिंकत आहे.

(Happy Birthday Sonu Sood In addition to acting, he is also an expert in ‘these’ things)

हेही वाचा :

90च्या दशकांत लूक आणि अभिनयाने केले घायाळ, कर्करोगाशी लढाई जिंकून ‘प्रेरणा’ बनलीय सोनाली बेंद्रे!

पुन्हा एकदा शमिता शेट्टी बहीण शिल्पाच्या समर्थनात, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली…

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें