Khoya khoya Chand | 90च्या दशकांत लूक आणि अभिनयाने केले घायाळ, कर्करोगाशी लढाई जिंकून ‘प्रेरणा’ बनलीय सोनाली बेंद्रे!

90च्या दशकात बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री होत्या, ज्यांनी आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने रसिकांची मने जिंकली होती. या 90च्या दशकातील अभिनेत्री आजच्या अभिनेत्रींनाही तगडी स्पर्धा देतात.

Khoya khoya Chand | 90च्या दशकांत लूक आणि अभिनयाने केले घायाळ, कर्करोगाशी लढाई जिंकून ‘प्रेरणा’ बनलीय सोनाली बेंद्रे!
सोनाली बेंद्रे
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Jul 30, 2021 | 8:54 AM

मुंबई : 90च्या दशकात बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री होत्या, ज्यांनी आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने रसिकांची मने जिंकली होती. या 90च्या दशकातील अभिनेत्री आजच्या अभिनेत्रींनाही तगडी स्पर्धा देतात. आजही त्यांच्या सौंदर्याचे बरेच लोक दिवाने आहेत. या दशकातल्या अनेक अभिनेत्री अजूनही इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत, तर बर्‍याच जणी मनोरंजन विश्वाला निरोप देऊन निघून गेल्या आहेत. आज, आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल अर्थात सोनाली बेंद्रेबद्दल बोलणार आहोत, जिने काही काळापूर्वी कर्करोगाविरुद्धची लढाई जिंकली होती.

अभिनेत्री सोनाली बेंद्रेने आपल्या ‘क्यूट स्माईल’ने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकत सर्वांची मने जिंकली. प्रत्येकजण तिच्या सौंदर्याचा दिवाना होता. सोनालीने आपल्या करिअरची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली होती. तिला मॉडेलिंग दरम्यान चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती आणि तिने ती ऑफर लगेचच स्वीकारली. ‘आग’ या चित्रपटाद्वारे सोनालीने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटात ती गोविंदाच्या विरुद्ध दिसली होती. सोनालीचा पहिला चित्रपट हिट ठरला आणि ती इंडस्ट्रीची स्टार बनली.

करिअरसाठी कठोर परिश्रम

‘आग’नंतर सोनाली बेंद्रे अजय देवगण सोबत ‘दिलजले’ चित्रपटात दिसली होती. सोनालीचा हा चित्रपटही सुपरहिट ठरला. यानंतर ती ‘भाई’, ‘सरफरोश’, ‘डुप्लिकेट’, ‘हम साथ साथ हैं’ अशा बर्‍याच सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसली. सोनालीने चाहत्यांच्या हृदयात आपले खास स्थान निर्माण केले होते, ज्यामुळे तिचे बहुतेक चित्रपट हिट ठरले.

गोल्डी बहलशी बांधली लग्नगाठ

सोनाली बेंद्रे हिने चित्रपट निर्माता गोल्डी बहलशी लग्न केले. त्यानंतर तिने स्वत:ला चित्रपट विश्वापासून दूर केले होते. ती आपला सर्व वेळ आपल्या कुटूंबाला देत होती.

कर्करोगाची लागण

सोनाली बेंद्रे सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. काही वर्षांपूर्वी तिने आपल्या मेटास्टेसिस कर्करोग झाल्याचे सांगून सर्वांना चकित केले. सोनालीला कर्करोग झाल्याचे निदान झाल्यानंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. या दरम्यान ती तिच्या उपचारांसाठी न्यूयॉर्कला गेली होती. जिथे जवळपास 1 वर्ष उपचार घेतल्यानंतर ती बरी झाली आणि भारतात परत आली आहे. यादरम्यान, सोनाली सोशल मीडियावर सकारात्मक पोस्ट शेअर करत होती. यासह तिने आपल्या कर्करोगाशी झालेल्या लढ्याबद्दल पोस्ट शेअर करुन सर्वांना सांगितले. आता सोनाली आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे.

(Khoya khoya Chand 90’s famous actress Sonali Bendre who wins battle against cancer)

हेही वाचा :

पुन्हा एकदा शमिता शेट्टी बहीण शिल्पाच्या समर्थनात, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली…

Shantit Kranti | भाडिपाची ‘शांतीत क्रांती’, नव्या वेब सीरीजसोबत चला धमाल रोड ट्रिपवर!

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें