Shantit Kranti | भाडिपाची ‘शांतीत क्रांती’, नव्या वेब सीरीजसोबत चला धमाल रोड ट्रिपवर!

शांतीत क्रांती’ ही शांतता आणि कल्याणाचे प्रतीक असून, या शोमध्ये सुंदर पद्धतीने 3 मित्रांची मैत्री दाखवली आहे. ती अत्यंत अर्थपूर्ण आणि धमाल असून प्रेक्षकांशी लगेच जोडली जाते.

Shantit Kranti | भाडिपाची ‘शांतीत क्रांती’, नव्या वेब सीरीजसोबत चला धमाल रोड ट्रिपवर!
शांतीत क्रांती'
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Jul 29, 2021 | 1:18 PM

मुंबई : कधी-कधी तुम्हाला आयुष्यात काही गोष्टी नीट होण्यासाठी तुमच्या जवळच्या मित्रांसोबत फक्त एका रोड ट्रिपची गरज असते. उत्तम, विचारप्रवर्तक कन्टेंटसोबत प्रादेशिक घटकांवर भर देत असताना सोनी लिव्हने आपल्या आगामी मराठी ओरिजिनल- ‘शांतीत क्रांती’चा ट्रेलर आपल्यासाठी आणला आहे. त्यातून मैत्री, प्रवास आणि स्वतःचा शोध पाहता येईल. ही श्रेयस, प्रसन्न आणि दिनार या 3 बेस्ट फ्रेंड्सची गोष्ट आहे. ‘शांतीत क्रांती’ ही त्यांनी आपल्या आयुष्यातील समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी गोव्याला केलेल्या रोड ट्रिपची गोष्ट आहे.

एक साधी रोड ट्रिप त्यांच्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणते. ती त्यांना आत्मपरीक्षण करण्यासाठी आणि आयुष्यातील कधीही न अनुभवलेल्या गोष्टी अनुभवण्याची संधी देते. ‘शांतीत क्रांती’ ही शांतता आणि कल्याणाचे प्रतीक असून, या शोमध्ये सुंदर पद्धतीने 3 मित्रांची मैत्री दाखवली आहे. ती अत्यंत अर्थपूर्ण आणि धमाल असून प्रेक्षकांशी लगेच जोडली जाते.

भाडिपाचा नवा शो!

भारतीय डिजिटल पार्टी (भाडिपा) या मराठी साहित्याच्या पेजचे संस्थापक सारंग साठे आणि पॉला मॅकग्लिन यांचे दिग्दर्शन असलेल्या या शोमध्ये लोकप्रिय मराठी कलाकार अभय महाजन (श्रेयस), ललित प्रभाकर (प्रसन्न) आणि आलोक राजवाडे (दिनार) आपल्याला प्रमुख भूमिकेत दिसतील. या शोमध्ये लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री शिखा तलसानिया मराठीत प्रथमच दिसणार असून, ती प्रमुख भूमिकेत दिसेल.

पहा ट्रेलर :

नात्यातील असुरक्षिततेसारख्या समस्या, आयुष्यातील अशाश्वता, अपूर्ण स्वप्ने अशा समस्यांचा सामना करण्यापासून हा शो नवीन दृष्टीकोन आणि शिकवण हलक्याफुलक्या पद्धतीने लोकांसमोर आणतो. ‘शांतीत क्रांती’ ही फक्त तीन जवळच्या मित्रांची कथा नाही, तर त्यांचा स्वतःचा शोध आणि ओळख यांच्या दिशेने त्यांनी केलेला हा प्रवास आहे. आश्चर्यकारक, हास्याच्या उकळ्या फुटणारे क्षण, रस्त्यावरील अनुभव, दिलखेचक संवाद आणि ताल धरायला लावणारे रॅप संगीत यांच्यामुळे हा शो नक्कीच प्रेक्षकांचे मनोरंजन करेल.

आयुष्याचा एक सुंदर अनुभव

या शोचे दिग्दर्शक सारंग साठ्ये आणि पॉला मॅकग्लिन म्हणाले की, “शांतीत क्रांती हा फक्त शो नाही तर तो आयुष्याचा एक सुंदर अनुभव आहे. हा शो सोनी लिव्ह, आमची क्रिएटिव्ह टीम आणि आमच्या टॅलेंटेड कलाकारांमधील भागीदारीचा परिपाक आहे. त्यामुळे हा शो शक्य झाला आहे. रोड ट्रिप, कथा, निर्माण झालेल्या आठवणी आणि अनुभव हे सर्व नॉस्टॅल्जिया, हास्याचे क्षण आणि आयुष्याला मिळालेले धडे हे घेऊन येतील. ही कथा नक्कीच आमच्या प्रेक्षकांना आवडेल आणि आम्हाला आशा आहे की, ते नक्कीच या राईडचा आनंद घेऊ शकतील.”

(Bhartiy Digital Party AKA BhaDiPa new web series Shantit Kranti on Sony Liv)

हेही वाचा :

Ani Kay Hava : जुई आणि साकेत लवकरच भेटीला, ‘आणि काय हवं’च्या तिसऱ्या सीझनची घोषणा

Bhetli Ti Punha 2 : वैभव तत्ववादी आणि पूजा सावंत ही सुंदर जोडी पुन्हा येणार भेटीला, ‘भेटली ती पुन्हा 2’ ची घोषणा

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें