पुन्हा एकदा शमिता शेट्टी बहीण शिल्पाच्या समर्थनात, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली…

अश्लील चित्रपट प्रकरणात राज कुंद्राच्या (Raj Kundra) अटकेनंतर शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) खूप धक्क्यात आहेत. याक्षणी ती खूप कठीण काळाला सामोरी जात आहे. त्याचबरोबर शिल्पाची बहीण शमिता शेट्टीसुद्धा (Shamita Shetty) अशा कठीण काळात आपल्या बहिणीची पूर्ण काळजी घेत आहे.

पुन्हा एकदा शमिता शेट्टी बहीण शिल्पाच्या समर्थनात, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली...
Shamita-Raj-Shilpa
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Jul 29, 2021 | 4:07 PM

मुंबई : अश्लील चित्रपट प्रकरणात राज कुंद्राच्या (Raj Kundra) अटकेनंतर शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) खूप धक्क्यात आहेत. याक्षणी ती खूप कठीण काळाला सामोरी जात आहे. त्याचबरोबर शिल्पाची बहीण शमिता शेट्टीसुद्धा (Shamita Shetty) अशा कठीण काळात आपल्या बहिणीची पूर्ण काळजी घेत आहे. दरम्यान, शमिताने पुन्हा एकदा एक पोस्ट शेअर करत आपल्या बहिणीचे मनोधैर्य वाढवले आहे.

आपला एक फोटो शेअर करत शमिताने प्रत्येकासाठी एक संदेश लिहिला आहे की, ‘आपण जे काही करता ते प्रामाणिकपणे आणि प्रेमाने करा.’ शमिताने लिहिले की, ‘कधीकधी तुमच्या आतील शक्तीची आग इतकी नसते की प्रत्येकजण पाहू शकेल. ती छोटीशी ठिणगी आहे, जी अगदी प्रेमळपणे सांगते की, तुम्ही काम सुरु ठेवा.’

पुढे तिने लिहिले की, ‘इतर तुमची उर्जा कशी वाया घालवत आहेत, यावर आपण नियंत्रित ठेवू शकत नाही. आपण जे काही बोलता किंवा म्हणता ते लेन्स फिल्टरमधून जाते, ज्या परिस्थितीतून त्यावेळेस ती जात होती. आपले काम प्रामाणिकपणाने आणि प्रेमाने करा.’

पाहा शमिताची पोस्ट :

शमिताच्या या पोस्टवर, काही यूजर्स तिला पाठिंबा देत आहेत, तर काहीजण ही पोस्ट तुमच्या मेहुण्याबाबत आहे का? अशी प्रश्नांची सरबत्ती करत आहेत.

या आधीही केली पोस्ट :

शिल्पाच्या या कठीण काळात तिची बहीण शमिता शेट्टीनं तिला प्रोत्साहन दिलं आहे. शमितानं शिल्पाच्या ‘हंगामा 2’ या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आणि आपल्या बहिणीसाठी एक खास संदेशही लिहिला होता.

शमितानं लिहिलं होतं की, ‘हंगामा 2 साठी ऑल द बेस्ट मुन्की. मला माहित आहे की तु या चित्रपटासाठी खूप परिश्रम केलेत आणि तसेच उर्वरित टीमनं ही प्रचंड मेहनत घेतली आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी नेहमी तुझ्याबरोबर आहे. आयुष्यात तु अनेक चढउतार पाहिले आहेत आणि एक गोष्ट मला माहिती आहे की तु खूप स्ट्राँग आहेस. हंगामा 2 च्या संपूर्ण टीमला शुभेच्छा.’

राज कुंद्राच्या देखील क्लोज होती शमिता!

शमिता केवळ बहीण शिल्पाच नव्हे तर, मेहुणा राज कुंद्राची देखील लाडकी होती आणि ती त्यांच्याबरोबर व बहिणीसमवेत पार्टी किंवा सुट्टीवर जायची. शमिता सध्या राजच्या अटकेनंतर एकाकी पडलेल्या तिच्या बहिणीची काळजी घेत आहे.

(It just a tiny spark actress Shamita Shetty wrote a post for sister shilpa shetty)

हेही वाचा :

Sunanda Shetty | शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी यांनी जुहू पोलीस ठाण्यात दाखल केला FIR, राज कुंद्रा प्रकरणातही आलेय नाव!

Raj Kundra Case | राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीवर प्रश्नचिन्ह, ‘हंगामा 2’चे निर्माते म्हणतात…

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें