Sunanda Shetty | शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी यांनी जुहू पोलीस ठाण्यात दाखल केला FIR, राज कुंद्रा प्रकरणातही आलेय नाव!

राज कुंद्रा (Raj Kundra) अश्लील चित्रपट प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि त्याच्या बिझनेस पार्टनर यांची नावे समोर आल्यानंतर, आता तिची आई सुनंदा शेट्टी (Sunanda Shetty) यांनी फसवणूकीच्या प्रकरणात एफआयआर दाखल केला आहे.

Sunanda Shetty | शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी यांनी जुहू पोलीस ठाण्यात दाखल केला FIR, राज कुंद्रा प्रकरणातही आलेय नाव!
Shilpa-sunanda

मुंबई : राज कुंद्रा (Raj Kundra) अश्लील चित्रपट प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि त्याच्या बिझनेस पार्टनर यांची नावे समोर आल्यानंतर, आता तिची आई सुनंदा शेट्टी (Sunanda Shetty) यांनी फसवणूकीच्या प्रकरणात एफआयआर दाखल केला आहे. जुहू पोलीस स्टेशनमध्ये सुनंदा शेट्टी यांनी जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात फिर्याद दिली आहे. सुनंदा यांचे नाव राज कुंद्रा अश्लील चित्रपट प्रकरणात देखील जोडले गेले आहेत. चौकशीत असे निष्पन्न झाले आहे की, त्या सप्टेंबर 2020 पर्यंत कुंद्राच्या एका कंपनीत संचालक म्हणूनही कार्यरत होत्या.

मालमत्ता फसवणूकीशी संबंधित हे प्रकरण रायगडमधील एका जमिनीशी संबंधित आहे. प्राप्त माहितीनुसार सुनंदा शेट्टी यांनी सन 2019मध्ये रायगडच्या कर्जत येथे जमीन व बंगला खरेदी केला होता. ही जमीन त्यांनी सुधाकर नावाच्या व्यक्तीकडून विकत घेतली होती. मात्र, ही जमीन आणि बंगला कधीही सुधाकरचा नसल्याचे तपासात उघड झाले आहे. जेव्हा, सुनंदाने सुधाकर यांना पैसे परत करण्यास सांगितले, तेव्हा त्याने ते परत देण्यास नकार दिला. यानंतर सुनंदाने कोर्टात धाव घेतली होती. आता या प्रकरणात कोर्टाच्या आदेशानंतर फसवणूकीची तक्रार नोंदवण्यात आली आहे.

शिल्पा शेट्टीसुद्धा अडचणीत!

दुसरीकडे, राज कुंद्रा अश्लील चित्रपट प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने नवीन पुरावे मिळाल्यानंतर शिल्पा शेट्टी हिला क्लीन चिट देण्यास नकार दिला आहे. या प्रकरणात सुनंदा शेट्टीचा थेट संबंध असल्याचा ठोस पुरावा सध्या तरी मिळालेला नाही, पण अभिनेत्री शिल्पा शेट्टीची आई सुनंदा सुरेंद्र शेट्टी या देखील सप्टेंबर 2020पर्यंत राज कुंद्राच्या कंपनीत संचालक पदावर होत्या, असे तपासात समोर आले आहे. काही महिन्यांपूर्वी शिल्पा शेट्टी पती राज कुंद्राची कंपनी जेएल स्ट्रीमची जाहिरात करत होती. ही तीच कंपनी आहे, जिच्यावर अश्लील सामग्री तयार केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

शिल्पा शेट्टीची चौकशी करण्यासाठी गुन्हे शाखा पुन्हा एकदा तयारी करत आहे. राज कुंद्राचे पीएनबी बँकेत संयुक्त खाते, राज कुंद्राच्या कार्यालयात सापडलेल्या गुप्त कपाटांमधून सापडलेली कागदपत्रे आणि शिल्पाच्या नावाने खरेदी केलेली कोट्यवधींची संपत्ती सध्या संशयाच्या भोवऱ्यात आहे. शिल्पाने या पोर्नोग्राफी रॅकेटबद्दल आपल्याला माहिती असल्याची बाब नाकारली आहे. परंतु, त्यातून मिळणारी कमाई केवळ तिच्या खात्यात येत-जात नव्हती, तर क्रिप्टो चलन व इतर मालमत्तांच्या गुंतवणूकीशी संबंधित कागदपत्रांवर तिच्या स्वाक्षर्‍या आढळून आल्या आहेत.

(Shilpa Shetty’s Mother Sunanda Shetty files FIR against Land fraud in Juhu police station)

हेही वाचा :

Raj Kundra Case | राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीवर प्रश्नचिन्ह, ‘हंगामा 2’चे निर्माते म्हणतात…

Raj Kundra Case : शिल्पा शेट्टीला क्लीन चीट नाहीच, सर्व बँक खात्यांची चौकशी होणार

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI