Raj Kundra Case | राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीवर प्रश्नचिन्ह, ‘हंगामा 2’चे निर्माते म्हणतात…

अश्लील चित्रपट प्रकरणी राज कुंद्राच्या (Raj Kundra) अटकेनंतर त्याची पत्नी-अभिनेत्री शिल्पा शेट्टीवरही (Shilpa Shetty) प्रश्न चिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.

Raj Kundra Case | राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीवर प्रश्नचिन्ह, ‘हंगामा 2’चे निर्माते म्हणतात...
शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Jul 29, 2021 | 1:44 PM

मुंबई : अश्लील चित्रपट प्रकरणी राज कुंद्राच्या (Raj Kundra) अटकेनंतर त्याची पत्नी-अभिनेत्री शिल्पा शेट्टीवरही (Shilpa Shetty) प्रश्न चिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. शिल्पा शेट्टीला राज कुंद्राच्या कामाविषयी माहिती होती की, ती स्वत: देखील यात सामील होती, हे लोकांना जाणून घ्यायचे आहे. शिल्पाच्या बँक खात्यांचा तपास सुरू असून या एजन्सीची चौकशी अद्याप सुरू आहे.

आता अलीकडेच ‘हंगामा 2’ या चित्रपटाचे निर्माते रतन जैन यांनी शिल्पाबाबत आपले मत स्पष्ट केले आहे. रतनच्या मते, शिल्पा शेट्टी या घडल्या प्रकारांत सहभागी असेल, असे त्यांना वाटत नाही.

रतनने एका मुलाखतीत सांगितले होते की, शिल्पाला आपल्या पतीच्या कामाविषयी किती माहिती आहे हे माहित नाही. परंतु, माझ्या अंदाजानुसार शिल्पा स्वत: या कामात सामील होणार नाही. रतन म्हणाली की, जितका मी शिल्पाला ओळखतो आहे, ती असे प्रकार करणार नाही. राजच्या कामाबद्दल तिला किती माहित होते, हे मला माहित नाही. परंतु, हो मी म्हणू शकतो की ती स्वत: यात गुंतलेली नसेल. कुटुंबातीलतील कोणताही सदस्य असे काम करणार नाही आणि जितकी मला शिल्पा माहित आहे, ती असे करणार नाही. आत्ता आपण हे प्रकरण तपास यंत्रणेवर ठरवले पाहिजे.

शिल्पाला क्लीन चिट मिळाली नाही!

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिला अद्याप या प्रकरणात क्लीन चिट मिळाली नाही. फॉरेन्सिक तज्ज्ञ राज यांच्या कंपनीचा तसेच त्यांच्या बँक खात्यांची सखोल तपासणी करत आहेत. शिल्पा यापूर्वी वियान इंडस्ट्रीजची डायरेक्टर होती, पण नंतर तिने राजीनामा दिला. यामुळे शिल्पाला क्लीन चिट मिळाली नाही. इंटर्नल ट्रेडिंग नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्या वियान इंडस्ट्रीजला सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) 3 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

राजच्या अटकेने खचली शिल्पा

गुन्हे शाखा तपास अधिकारी जेव्हा राजसमवेत त्याच्या घरी गेले, तेव्हा शिल्पा राजवर संतापली होती. तिने राजला सांगितले की, तुझ्या या कृत्यामुळे संपूर्ण कुटुंबाची बदनामी होत आहे. माझ्या बर्‍याच असाईनमेंट्स आणि नवे करार माझ्या हातातून गेले आहेत. शिल्पाला रडताना पाहून राजही भावूक झाला होता. त्याच्या डोळ्यातूनही अश्रू आले होते.

(Raj Kundra Case Hungama 2 producer Ratan jain reacted on shilpa shetty’s involvement)

हेही वाचा :

जावेद अख्तर यांची याचिका फेटाळल्यानंतर, आशिष कौलनी कंगना रनौत विरोधात दाखल केली अवमान याचिका!

Nyay The Justice : सुशांतच्या वडिलांच्या प्रयत्नांना अपयश, ‘न्याय: द जस्टिस’ चित्रपटाला दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें