AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 WC 2026 : टीम इंडियाच्या सेमीफायनल प्रवेशावरुन पाकिस्तानच्या दिग्गज क्रिकेटपटूचा भारतीयांना चीड आणणारा दावा

T20 World Cup 2026 : आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये दुसऱ्या राऊंडची सुरुवात होत आहे. या राऊंडमध्ये 8 टीम्समध्ये सेमीफायनलचं तिकिट मिळवण्यासाठी लढत होईल. या दरम्यान एका माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूने टीम इंडियाबद्दल धक्कादायक दावा केला आहे.

T20 WC 2026 : टीम इंडियाच्या सेमीफायनल प्रवेशावरुन पाकिस्तानच्या दिग्गज क्रिकेटपटूचा भारतीयांना चीड आणणारा दावा
Team India Image Credit source: PTI
| Updated on: Feb 20, 2026 | 8:27 AM
Share

T20 World Cup 2026 : आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 टुर्नामेंट सुरु आहे. सुपर-8 राऊंडची सुरुवात 21 फेब्रुवारीपासून होणार आहे. सेमीफायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी आठ टीममध्ये मुकाबला होईल. या टीम्सची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत, झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज ग्रुप 1 मध्ये परस्पराविरुद्ध खेळतील. अन्य चार टीम्स श्रीलंका, पाकिस्तान, इंग्लंड आणि न्यूझीलंड या दुसऱ्या ग्रुपमध्ये आहेत. या रोमांचक ग्रुप लढतींची सुरुवात होण्याआधी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीर यांने एक धक्कादायक दावा केला आहे.

सुपर-8 राऊंडला सुरुवात होण्याआधी मोहम्मद आमिर आपल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. त्याने भविष्यवाणी केलीय की, भारत या टुर्नामेंटच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणार नाही. सुपर-8 राऊंडमध्येच भारताचा प्रवास संपुष्टात येईल असा दावा मोहम्मद आमिर याने केला आहे. भारत यंदाच्या टी20 वर्ल्ड कपचा यजमान आणि विद्यमान चॅम्पियन संघ आहे. टीमने आपल्या ग्रुपमध्ये शानदार प्रदर्शन केलय. भारताने आपले चारही सामने जिंकलेत. टीम इंडिया टुर्नामेंटमधील फेवरेट टीम मानली जात आहे. पण भारत सेमीफायनलमध्ये खेळणार नाही असं आमिर याला वाटतं.

भारताचा ग्रुप सर्वात टफ का?

“भारत टी20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणार नाही. पाकिस्तान विरुद्ध सामना सोडल्यास भारतीय फलंदाजांची फळी प्रत्येक सामन्यात कोसळलीय. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज टीम ज्या पद्धतीने खेळतायत, ते कुठल्याही टीमला हरवू शकतात” असं मोहम्मद आमिर GEO TV वर एका कार्यक्रमादरम्यान म्हणाला. सुपर-8 राऊंडमध्ये ग्रुप-1 खूप मजबूत आहे. ग्रुप-1 मधील चारही टीम्सनी आतापर्यंत एकाही पराभवाचा सामना केलेला नाही. भारताशिवाय दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजने आपपाल्या ग्रुपमधील 4-4 सामने जिंकले आहेत. झिम्बाब्वेने तीन विजय आणि नो रिझल्ट सामन्यासह सुपर-8 मध्ये प्रवेश केला आहे.

सेमीफायनलमध्ये प्रवेशासाठी किती सामने जिंकावे लागतील?

सुपर-8 राऊंडमध्ये टीम इंडिया 22 फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. त्यानंतर 26 फेब्रुवारीला चेन्नईमध्ये झिम्बाब्वे विरुद्ध सामना होईल. भारताचा सुपर-8 मधील अखेरचा सामना वेस्ट इंडिज विरुद्ध 1 मार्चला कोलकातामध्ये होईल. टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये प्रवेशासाठी कमीत कमी 2 मॅच जिंकाव्या लागतील.

Follow Us
तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर....
Abhijeet Dipke : तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर पुन्हा दिल्ली भडकणार?; अभिजीत दिपकेंचा थेट इशारा
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा