AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदवार्ता, लवकरच जानेवारीचा हप्ता

| Updated on: Feb 20, 2026 | 9:08 AM
Share

Maharashtra News LIVE Updates: राज्यातील लाडक्या बहि‍णींना जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक न्याय विभागाचा 98.45 कोटींचा निधी त्यासाठी वर्ग करण्यात आला आहे.

Maharashtra News LIVE : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदवार्ता, लवकरच जानेवारीचा हप्ता

LIVE NEWS & UPDATES

  • 20 Feb 2026 09:20 AM (IST)

    धाराशिवमध्ये कॉपी प्रकरणात 6 शिक्षक निलंबित तर 12 विद्यार्थ्यांवर कारवाई

    जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मौनक घोष यांच्यासह शिक्षण विभागाची कारवाई. रसायनशास्त्राच्या पेपर ला धाराशिव मधील 3, कळंब मधील 1 आणि तुळजापूर तालुक्यातील 9 अशा एकूण 12 कॉपी बहाद्दरांना शिक्षण विभागाचा दणका तर कॉपीला प्रोत्साहन देणाऱ्या सहा शिक्षकांवर शिक्षण अधिकाऱ्यांकडून निलंबनाची कारवाई

  • 20 Feb 2026 09:05 AM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची स्वीकृत नगरसेवक संदर्भात महत्त्वाची बैठक

    रंगशारदा सभागृहात आज सकाळी दहा वाजता होणार बैठक. बैठकीला महाराष्ट्रातील मनसेचे सर्व नेते पदाधिकारी राहणार उपस्थित. निवडणुकीनंतरची पहिली राज्यस्तरीय बैठक. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडणार

  • 20 Feb 2026 09:00 AM (IST)

    नाशिकमध्ये स्थायी सभापतिपदाची बुधवारी निवडणूक

    नाशिकमध्ये स्थायी सभापतिपदाची बुधवारी निवडणूक होणार आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे. उमेदवारी ठरविण्यात मंत्री गिरीश महाजन तसेच अन्य कोअर कमिटी सदस्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

  • 20 Feb 2026 08:55 AM (IST)

    थकीत रक्कम वरून पुणे महानगरपालिका जलसंपदा विभागात वाद

    जलसंपदा विभागाची आज उच्चस्तरीय बैठक होणार त्यामध्ये पाणी बंद करण्याबाबत चर्चा होणार आहे. महापालिकेने पाणीपट्टी भरली नाही तर पुढील आठवड्यात खडकवासला वरील पंप बंद करण्याची तयारी सुरू आहे. 954 कोटी रुपये थकीत भरण्याचे जलसंपदा विभागाचे पालिकेला पत्र तर पालिकेकडून 400 कोटी रुपये आमचे तुमच्याकडे असल्याचे जलसंपदा विभागाला पत्र देण्यात आले. थकीत पाणी पट्टी भरली नाही तर पाणी बंद करण्याचा जलसंपदा विभागाचा पत्रात इशारा देण्यात आला.

  • 20 Feb 2026 08:50 AM (IST)

    धाराशिवमध्ये मोठा ट्विस्ट, राष्ट्रवादीचा मोठा डाव

    शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा प्रस्ताव राष्ट्रवादीने फेटाळला.आमिषाला थारा नाही. राष्ट्रवादी पक्ष महायुती सोबतच राहणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष तथा नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे यांनी भूमिका मांडली. निवडणुकीपूर्वी महायुती होती आणि नंतर देखील असणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

  • 20 Feb 2026 08:30 AM (IST)

    बनावट जन्म दाखल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल

    बनावट जन्म दाखल्याप्रकरणी नाशिकमध्ये पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. खोटे जात प्रमाणपत्र तयार करून ते खरे असल्याचे दाखवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणात कारवाई करण्यात आली. जन्म प्रमाणपत्राची प्रत मनपाच्या कार्यालयात ऑनलाइन प्रणालीत प्रमाणपत्रावरील नोंदणी क्रमांक तपासला असता हे प्रमाणपत्र खोटे असल्याचे निदर्शनास आले. संशयित शेख नायजा नूर महंमद या महिलेने बनावट व खोटे जन्म प्रमाणपत्र तयार करून ते खरे असल्याचे दाखवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

  • 20 Feb 2026 08:20 AM (IST)

    अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न

    अन्न व औषध प्रशासनाच्या छापा टाकण्यास गेलेल्या अन्न व औषध अधिकारी रेणुका पाटील या महिला अधिकार्याच्या अंगावर गाडी घालून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न सोलापूर जिल्ह्यात घडला.माढ्याच्या बावी गावामधील धक्कादायक घटना घडली. गुटख्याचा साठा असलेल्या तिन पिकअप पैकी दोन पिक अप गुटख्यासह ताब्यात घेतले असून एक पिकअप पसार झालाय. माढा पोलिसांत जीवे मारण्याच्या प्रयत्नासह सरकारी कामात अडथळा आणल्याचा ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 20 Feb 2026 08:10 AM (IST)

    दहावीची पहिली परीक्षा सक्तीची; न दिल्यास दुसरी संधी नाही

    Central Board of Secondary Education (CBSE) ने दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय घेतला असला तरी पहिली परीक्षा देणे सक्तीचे केले आहे. पहिल्या परीक्षेला गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या परीक्षेला बसता येणार नाही. किमान तीन विषय न दिल्यास विद्यार्थ्यांना ‘एसेंशियल रिपीट’ श्रेणीत ठेवून पुढील वर्षी मुख्य परीक्षेला बसावे लागेल. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तीन विषयांपर्यंत गुण सुधारण्याची संधी असेल.नियमात कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे.

  • 20 Feb 2026 08:02 AM (IST)

    आजपासून दहावीच्या परीक्षेचा श्रीगणेशा

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने दहावी परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी २७१ भरारी व बैठी पथके तैनात करण्यात आली आहेत. राज्यातील १९१ परीक्षा केंद्रे संवेदनशील असून, त्यापैकी ४२ ठिकाणी सीसीटीव्ही नसल्याने शिक्षक-कर्मचाऱ्यांची अदलाबदल होणार आहे. ५५४ केंद्रांवर अद्याप कॅमेरे बसविलेले नाहीत. मागील वर्षी ३१ केंद्रांची मान्यता रद्द करण्यात आली होती.परीक्षा केंद्रापासून ५०० मीटर परिसरातील झेरॉक्स केंद्रे बंद ठेवण्याचे आदेश आहेत. राज्यात ९,७८८ दिव्यांग विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. पुण्यातील दोन विद्यार्थ्यांना लॅपटॉप वापराची मुभा देण्यात आली आहे.

लाडक्या बहि‍णींसाठी आनंदवार्ता आली आहे. त्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता आहे. कारण सामाजिक न्याय विभागाचा 98.45 कोटींचा निधी त्यासाठी वर्ग करण्यात आला आहे. तर अजितदादांच्या विमान अपघाताचा अहवाल येत्या 28 फेब्रुवारीपूर्वीच येणार असल्याचे समजते. त्यामुळे हा अपघात होता की घातपात यावर लवकरच प्रकाश पडेल. राज्यसभेसाठी मोर्चबांधणी सुरू आहे. भाजपच्या निष्ठावंतांनी आयाराम-गयारामला खासदारकी देण्यास विरोध केला आहे. राज्यसभेसाठी शरद पवार इच्छुक असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर लाचप्रकरणात झिरवळ यांच्या मंत्रालयातील कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे. दहावी बोर्डाच्या परीक्षेचा आजपासून श्रीगणेशा होत आहे. तर एपस्टिन प्रकरणात ब्रिटनचे राजपुत्र अँड्रयू यांना अटक करण्यात आली आहे. बांगलादेशातील व्हिसा सेवा लवकरच सुरू होणार आहे.

Published On - Feb 20,2026 8:01 AM

Follow us
आता एनसीईआरटीच्या पुस्तकात मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा समावेश
आता एनसीईआरटीच्या पुस्तकात मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा समावेश.
नवी दिल्लीत इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 चे उद्घाटन
नवी दिल्लीत इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 चे उद्घाटन.
नाशिकमध्ये शेअर मार्केटच्या आमिषाने 2.16 कोटींची फसवणूक
नाशिकमध्ये शेअर मार्केटच्या आमिषाने 2.16 कोटींची फसवणूक.
ड्रग्ज प्रकरणाला इम्तियाज जलीलांचा सपोर्ट? संजय शिरसाटांचे गंभीर आरोप
ड्रग्ज प्रकरणाला इम्तियाज जलीलांचा सपोर्ट? संजय शिरसाटांचे गंभीर आरोप.
मुंबई पालिकेच्या महापौरपदावरुन महायुतीत एकमत? अपडेट आली समोर
मुंबई पालिकेच्या महापौरपदावरुन महायुतीत एकमत? अपडेट आली समोर.
शिंदे- ठाकरे भेटीवर राजकीय वाद; राऊत आणि बन यांच्यात टीका-प्रत्युत्तर
शिंदे- ठाकरे भेटीवर राजकीय वाद; राऊत आणि बन यांच्यात टीका-प्रत्युत्तर.
अजित दादांच्या अपघातावर मुलाची शंका, थेट पोस्ट करत केला सवाल
अजित दादांच्या अपघातावर मुलाची शंका, थेट पोस्ट करत केला सवाल.
धाराशिवमध्ये तानाजी सावंत-एकनाथ शिंदेंच्या भेटीत नेमकं काय घडलं?
धाराशिवमध्ये तानाजी सावंत-एकनाथ शिंदेंच्या भेटीत नेमकं काय घडलं?.
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेली मुंबई आम्हाला घडवायची आहे
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेली मुंबई आम्हाला घडवायची आहे.
आठवड्याभरानंतर तेजस ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज
आठवड्याभरानंतर तेजस ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज.