Happy Birthday Pavan Malhotra | दूरदर्शनच्या ‘नुक्कड’ने मिळवून दिली प्रसिद्धी, करीना कपूरच्या काकाच्या भूमिकेतही गाजले पवन मल्होत्रा!

| Updated on: Jul 02, 2021 | 10:57 AM

‘ब्लॅक फ्रायडे’, ‘डॉन’, ‘भाग मिल्खा भाग’ आणि ‘रुस्तम’ यासारख्या चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनय सादर करणारे अभिनेता पवनराज मल्होत्रा (Pavan Malhotra) ​​चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. पवन नेहमी आपल्या सरळ-साध्या अभिनयासाठी ओळखले जातात.

Happy Birthday Pavan Malhotra | दूरदर्शनच्या ‘नुक्कड’ने मिळवून दिली प्रसिद्धी, करीना कपूरच्या काकाच्या भूमिकेतही गाजले पवन मल्होत्रा!
पवन मल्होत्रा
Follow us on

मुंबई : ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘डॉन’, ‘भाग मिल्खा भाग’ आणि ‘रुस्तम’ यासारख्या चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनय सादर करणारे अभिनेता पवनराज मल्होत्रा (Pavan Malhotra) ​​चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. पवन नेहमी आपल्या सरळ-साध्या अभिनयासाठी ओळखले जातात. पवन मल्होत्राचा आज आपला वाढदिवस साजरा करत आहे (Happy Birthday Pawan Malhotra know about actros career journey).

प्रख्यात अभिनेता पवन मल्होत्रा ​​यांचा जन्म 2 जुलै 1958 रोजी दिल्ली येथे झाला. दूरदर्शनचा प्रसिद्ध शो ‘नुक्कड’मधून त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती.

कसा मिळाला पहिला शो?

पवनराज मल्होत्रा ​​यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवी घेतली. सुरुवातीपासूनच या त्यांना अभिनयात रस होता. अभ्यासाकर्म पूर्ण झाल्यानंतरच ते दिल्लीतील थिएटरमध्ये सामील झाले. थिएटर करत असताना त्यांना त्यांची पहिली मालिका मिळाली.

1986 मध्ये अभिनेत्याला दूरदर्शनवर त्याचा पहिला ब्रेक मिळाला. या मालिकेचे नाव होते ‘नुक्कड’. या शोमध्ये ते सईदच्या भूमिकेत दिसले आणि घरोघरी त्यांचे नाव झाले. त्यांच्या वडिलांना नेहमी वाटायचे की त्यांनी व्यवसायात करिअर करावे, परंतु त्यांनी अभिनयालाच आपले सर्वस्व मानले होते. पवन यांनी ‘नुक्कड’ व्यतिरिक्त त्याने ‘मनोरंजन’, ‘ये जो है जिंदगी’, ‘मलबार हिल्स’, ‘इंतजार’ यासारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

चित्रपट विश्वात प्रवेश

पवनने 1984 मध्ये ‘अब आयेगा मजा’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. यानंतर त्यांचे चित्रपटांमध्ये काम सुरू झाले. पवन यांना 1985 मध्ये ‘खामोश’ आणि 1989 मध्ये ‘बाघ बहादूर’ अशा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटांमधून विशेष ओळख मिळाली.

प्रत्येक प्रकारच्या भूमिकेत एक वेगळी छाप

पवन मल्होत्रा ​​हे एक असे कलाकार आहेत की, आपल्या चित्रपटाच्या प्रवासामध्ये त्यांनी अनेक नकारात्मक, सकारात्मक अशा सर्व प्रकारच्या भूमिका साकारत रसिकांमध्ये वाहवा मिळवली. या अभिनेत्याने बरेच पुरस्कारही जिंकले आहेत. ‘जब वी मेट’ या चित्रपटामध्ये ते करीनाच्या काकाच्या भूमिकेत दिसले होता. या छोट्या भूमिकेसाठी देखील पवन मल्होत्रांचे खूप कौतुक झाले.

वॉर्डरोब सहाय्यक

पवनला नेहमीच लाईमलाइटपासून दूर राहणे आवडते. ते नेहमीच निवडक चित्रपटांमध्ये विचारपूर्वक भूमिका निवडतात. पण ज्या मालिकेत किंवा चित्रपटात ते काम करतात, त्यात आपली एक वेगळी छाप सोडतात. पवन ‘एटनबरो की गांधी’ या चित्रपटाचे वॉर्डरोब सहाय्यक होते. पवन मल्होत्रा सध्या त्यांच्या ‘ग्रहण’ सीरीजमुळे खूप चर्चेत आहे. यात पवन मुख्य भूमिका साकारत आहेत. ही सीरीज 84च्या दंगलीवर आधारित असल्याचे म्हटले जाते आहे.

(Happy Birthday Pavan Malhotra know about actros career journey)

हेही वाचा :

Photo : ‘कुछ कुछ होता है’ ते ‘बाजीराव मस्तानी’ ‘या’ सुपरहिट चित्रपटांना ऐश्वर्या रायनं दिला होता नकार

July Releasing Movies | जुलै महिन्यात ओटीटीवर मिळणार मनोरंजनाची जबरदस्त मेजवानी, ‘हे’ बहुचर्चित चित्रपट होणार रिलीज!