Happy Birthday Randeep Hooda | चित्रपटात दिसण्यापूर्वी वेटर आणि ड्रायव्हर म्हणून काम करायचा रणदीप हुडा, ‘या’ चित्रपटाने बनवले सुपरस्टार!

बॉलिवूडमध्ये दमकदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता रणदीप हुडा (Randeep Hooda) आज (20 ऑगस्ट) आपला वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म 20 ऑगस्ट 1976 रोजी रोहतक, हरियाणा येथे झाला. रणदीप हुडा आज त्याचा 45वा वाढदिवस साजरा करत आहे.

Happy Birthday Randeep Hooda | चित्रपटात दिसण्यापूर्वी वेटर आणि ड्रायव्हर म्हणून काम करायचा रणदीप हुडा, ‘या’ चित्रपटाने बनवले सुपरस्टार!
रणदीप हुडा

मुंबई : बॉलिवूडमध्ये दमकदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता रणदीप हुडा (Randeep Hooda) आज (20 ऑगस्ट) आपला वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म 20 ऑगस्ट 1976 रोजी रोहतक, हरियाणा येथे झाला. रणदीप हुडा आज त्याचा 45वा वाढदिवस साजरा करत आहे. रणदीप ज्या ठिकाणी, तिथे पोहोचण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. त्याने बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.

रणदीपने आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. रणदीप हुड्डा चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी कोणते काम करायचा, हे तुम्हाला माहिती आहे का? नाही, तर आज आम्ही त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाशी संबंधित अनेक मनोरंजक गोष्टी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया…

वेटर आणि ड्रायव्हर म्हणून केले काम

रणदीपचे वडील रणबीर हुड्डा व्यवसायाने डॉक्टर आहेत आणि आईचे नाव आशा हुडा आहे. असे म्हटले जाते की, सततच्या कामामुळे त्याच्या आईवडिलांनी त्याला आजीसोबत सोडले होते. यामुळे त्याला हॉस्टेलमध्ये राहावे लागले. रणदीप हुडा याने आपले प्राथमिक शिक्षण सोनीपत येथील बोर्डिंग स्कूलमधून केले. यानंतर त्याने शालेय कार्यक्रमांमध्ये अभिनय करण्यास सुरुवात केली. पण त्याच्या पुढील अभ्यासासाठी त्याला ऑस्ट्रेलियामधील मेलबर्नला येथे जावे लागले. येथून रणदीपने मानव संसाधन व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी घेतली. येथे राहताना रोजचा खर्च भागवण्यासाठी रणदीप हुडाला अनेक प्रकारची कामे करावी लागली. एका मुलाखतीत त्याने सांगितले होते की, त्याला ऑस्ट्रेलियामध्ये राहणे खूप कठीण झाले होते. त्याच वेळी, त्याला तेथे राहण्यासाठी ड्रायव्हरपासून ते वेटरपर्यंतची सर्व काम करावी लागली होती.

‘सरबजीत’ साठी 18 किलो वजन केले कमी

रणदीप हुडा याने मॉडेलिंग आणि थिएटरमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर त्याने दिग्दर्शक मीरा नायर यांच्या ‘मान्सून वेडिंग’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. यानंतर रणदीपने ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’, ‘जन्नत 2’, ‘सरबजीत’, ‘सुल्तान’, ‘साहिब बीवी और गँगस्टर’, ‘मान्सून वेडिंग’, ‘रंगरसिया’, ‘हायवे’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

त्याच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक झाले आहे. या सर्वांव्यतिरिक्त, रणदीप हुड्डासाठी 2016मध्ये रिलीज झालेल्या ‘सरबजीत’ची भूमिका साकारणे खूप आव्हानात्मक होते. या सिनेमासाठी त्याने तब्बल 18 किलो वजन कमी केले होते. त्यानंतर त्याच्या शरीराची हाडेही दिसत होती.

हेही वाचा :

कोट्यवधींची मालकीण स्वरा भास्कर, एका चित्रपटासाठी आकारते तगडे मानधन!

‘हॉलिडे’ ते ‘बेल बॉटम’, देशभक्तीच्या रंगात रंगलेयत अक्षय कुमारचे ‘हे’ खास चित्रपट!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI