AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Swara Bhasker Net Worth | कोट्यवधींची मालकीण स्वरा भास्कर, एका चित्रपटासाठी आकारते तगडे मानधन!

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) तिच्या चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते. स्वराने तिच्या कारकिर्दीत आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. स्वरा एक अशी अभिनेत्री आहे जी आपले मत अतिशय स्पष्टपणे मांडते.

Swara Bhasker Net Worth | कोट्यवधींची मालकीण स्वरा भास्कर, एका चित्रपटासाठी आकारते तगडे मानधन!
स्वरा भास्कर
| Edited By: | Updated on: Aug 19, 2021 | 1:53 PM
Share

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) तिच्या चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते. स्वराने तिच्या कारकिर्दीत आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. स्वरा एक अशी अभिनेत्री आहे जी आपले मत अतिशय स्पष्टपणे मांडते, यामुळे तिला अनेक वेळा ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागते. आजमितीला स्वराने स्वकष्टाने सिनेमा जगतात नाव आणि पैसा कमावला आहे.

अभिनयाव्यतिरिक्त स्वरा भास्कर चित्रपटांची निर्मितीही करते. स्वराने ‘तनु वेड्स मनु’ चित्रपटात कंगना राणौतची मैत्रीण पायलची भूमिका साकारली, ज्यामुळे तिला प्रेक्षकांमध्ये ओळख मिळाली. स्वराने आपल्या मेहनतीच्या जोरावर कोट्यवधींची मालमत्ता कमावली आहे.

स्वरा भास्करचे नेटवर्थ

दिल्लीत जन्मलेली स्वरा भास्कर आज जगभरात नाव कमावते आहे. मीडिया रिपोर्टनुसार, स्वराकडे 2021 मध्ये 5 डॉलर दशलक्ष संपत्ती आहे. स्वराने 2009पासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. या दरम्यान तिने 15हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनयाबरोबरच अभिनेत्री कमाईमध्ये मोठ्या अभिनेत्रींनाही मागे टाकत आहे.

चित्रपटांच्या मानधनाव्यतिरिक्त, स्वराच्या कमाईचे मोठे साधन म्हणजे जाहिरात. स्वरा तनिष्क, फॉर्च्यून ऑइल, स्प्राइट, आयोडेक्स इत्यादी अनेक लोकप्रिय जाहिरातींचा एक भाग आहे. मीडिया रिपोर्टनुसार, स्वरा भास्कर एका चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासाठी तगडी रक्कम मानधन म्हणून घेते. रिपोर्ट्सनुसार, स्वरा एका चित्रपटासाठी तब्बल पाच कोटी रुपये घेते.

स्वराचे घर

दिल्लीत राहणाऱ्या स्वरा भास्करचे आज मुंबईत स्वतःचे घर आहे. स्वरा मुंबईत 3 बीएचके फ्लॅटमध्ये राहते, तिच्या आलिशान फ्लॅटचे इंटेरियर खूप छान आहे. अभिनेत्रीकडे बीएमडब्ल्यू एक्स 1 सीरीज सारखी महागडी कार खरेदी केली आहे.

स्वराने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात 2009मध्ये ‘माधोलाल कीप वॉकिंग’ या चित्रपटाने केली होती. वर्ष 2010मध्ये, ती संजय लीला भन्साळी यांच्या ‘गुजारिश’ या चित्रपटातही विशेष भूमिकेत दिसली. मात्र, अभिनेत्रीला तनु वेड्स मनुमधून खरी ओळख मिळाली. ‘रांझना’ या चित्रपटात तिने साकारलेल्या भूमिकेमुळे तिच्या करिअरला चालना मिळाली. आता स्वरा अनेक उत्तम चित्रपटांचा एक भाग झाली आहे आणि तिच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे.

स्वरा होतेय ट्रोल

स्वरा भास्करने अफगाणिस्तानमधील परिस्थितीबद्दल ट्विट केले. तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबूल ताब्यात घेतली आहे. स्वराने अफगाणिस्तानच्या या स्थितीची भारताशी तुलना केली आहे, ज्यामुळे तिला अटक करण्याची मागणी सोशल मीडियावर जोर धरत आहे. स्वरा भास्करने ट्वीट केले की, ‘आम्ही हिंदुत्व दहशतवादाशी ठीक असू शकत नाही आणि तालिबानी दहशतवादामुळे प्रत्येकजण हैराण आणि उद्ध्वस्त झाला आहे. आपण तालिबानच्या दहशतीसह शांत बसू शकत नाही आणि मग हिंदुत्वाच्या दहशतीबद्दल राग येऊ शकतो. आपली मानवी आणि नैतिक मूल्ये दडपलेल्यांच्या ओळखीवर आधारित नसावीत.’ यानंतर ती खूप ट्रोल होत आहे.

हेही वाचा :

अण्णा नाईक लेकालाच बनवू पाहतायत नवं ‘झाड’, त्यांच्या तावडीतून वाचू शकेल का अभिराम?

‘KBC13’च्या हॉट सेटवर विराजमान होणार सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग, ‘बिग बीं’समोर करणार दमदार खेळी!

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.