Ratris Khel Chale 3 | अण्णा नाईक लेकालाच बनवू पाहतायत नवं ‘झाड’, त्यांच्या तावडीतून वाचू शकेल का अभिराम?

शेवंताने वाड्यात आलेल्या नव्या सुनेचा अर्थात अभिरामच्या बायकोच्या शरीराचा ताबा घेतला आहे. तर आता अण्णाना देखील परतण्यासाठी एका ‘झाडा’ची अर्थात शरीराची आवश्यकता आहे. अण्णांनी यासाठी अभिरामच्या शरीराचा ताबा घेण्याचे ठरवले आहे.

Ratris Khel Chale 3 | अण्णा नाईक लेकालाच बनवू पाहतायत नवं ‘झाड’, त्यांच्या तावडीतून वाचू शकेल का अभिराम?
Ratris Khel Chale 3

मुंबई : झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ (Ratris Khel Chale 3) या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांना चांगलेच खिळवून ठेवले आहे. पहिल्या दोन भागांना चाहत्यांकडून कमालीची लोकप्रियता मिळाली होती. मात्र तिसरा सिझन सुरु झाला आणि अल्पावधीत कोरोनामुळे चित्रिकरणालाच ब्रेक लागला. मात्र, आता या मालिकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

‘रात्रीस खेळ चाले 3’ साठी प्रेक्षकांना आता फार उत्सुकता ताणून धरावी लागणार नाहीय. 16 ऑगस्टपासून नव्या वेळेनुसार सोमवार ते शनिवार रात्री 11 वाजता या मालिकेचं प्रसारण सुरु झालं आहे. बदललेली वेळ आणि नव्या व्यक्तिरेखांचा भरणा या काही करणांमुळे ‘रात्रीस खेळ चाले 3’ प्रेक्षकांची फारशी पकड घेऊ शकली नव्हती. मात्र, आता कलाकारांसह लेखक, निर्माते आणि दिग्दर्शकही जोरदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

अण्णा अभिरामच्या शरीराचा ताबा घेणार?

शेवंताने वाड्यात आलेल्या नव्या सुनेचा अर्थात अभिरामच्या बायकोच्या शरीराचा ताबा घेतला आहे. तर आता अण्णाना देखील परतण्यासाठी एका ‘झाडा’ची अर्थात शरीराची आवश्यकता आहे. अण्णांनी यासाठी अभिरामच्या शरीराचा ताबा घेण्याचे ठरवले आहे. मात्र, या सगळ्यात आता अभिराम देखील अडकणार का? की माईची पुण्याई अभिरामला यातून वाचून शकेल याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. सध्या तरी माईने दिलेल्या देवाच्या विड्यामुळे अभिराम थोडक्यात बचावल्याचे दिसत आहे. मात्र, पुढे काय होईल, याची कल्पना कुणालाच नाही.

पाहा नवा प्रोमो :

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

पुन्हा रंगणार पाप…शाप… आणि उ:शापाचा खेळ!

एका नाईक आडनावाच्या घराण्याची “रात्रीस खेळ चाले” ही कथा. अण्णा नाईकांच्या पापामुळे त्यांना आणि त्यांच्या पुढच्या पिढीला अत्रुप्त आत्म्यांनी दिलेले शाप भोगावे लागले. अण्णा नाईकांच्या पुढच्या पिढीची वाताहात लागली. अतृप्त आत्म्यानी नाईक वाड्याचा ताबा घेतला. एक नांदतं घर बघता बघता रसातळाला गेलं. पण या आलेल्या वादळात अण्णा नाईकांची बायको, इंदू उर्फ माई नाईक घराण्याच्या मूळ पुरुषावर आणि कुलदैवतेवर भार टाकून सगळ्या स़कटांशी शेवटपर्यंत लढते. आपल्या उध्वस्त झालेल्या घराण्याला शाप मुक्त होण्यासाठी उ:शाप मिळवते. एक अशिक्षित स्त्रीसुद्धा आपला स्वाभिमान जपून, संपूर्ण घराला पुन्हा उभं करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगते आणि त्यात जिंकून दाखवते. त्याची ही एक रंजक कथा असणार आहे. नाईक घराण्याचं पाप…शाप… आणि उ:शाप यामधून झालेलं संक्रमण म्हणजेच ‘रात्रीस खेळ चाले 3’ असणार आहे.

हेही वाचा :

‘KBC13’च्या हॉट सेटवर विराजमान होणार सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग, ‘बिग बीं’समोर करणार दमदार खेळी!

अनेक अडचणींचा सामना करत अखेर पार पडतोय ओम-स्वीटूचा साखरपुडा, पाहा ‘या’ सोहळ्याची खास क्षणचित्रे!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI