KBC Season 13 | ‘KBC13’च्या हॉट सेटवर विराजमान होणार सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग, ‘बिग बीं’समोर करणार दमदार खेळी!

‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun banega crorepati 13) पुन्हा एकदा सुरू होणार आहे. सुपरस्टार अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या केबीसीचा हा 13 वा सीझन असणार आहे. यावेळी हा शो 23 ऑगस्टपासून सुरू होत आहे. दरम्यान, आता एक मोठी अपडेट समोर येत आहे.

KBC Season 13 | ‘KBC13’च्या हॉट सेटवर विराजमान होणार सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग, ‘बिग बीं’समोर करणार दमदार खेळी!
KBC 13

मुंबई : ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun banega crorepati 13) पुन्हा एकदा सुरू होणार आहे. सुपरस्टार अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या केबीसीचा हा 13 वा सीझन असणार आहे. यावेळी हा शो 23 ऑगस्टपासून सुरू होत आहे. दरम्यान, आता एक मोठी अपडेट समोर येत आहे. यावेळी टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि आता बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) देखील ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये दिसणार आहेत.

आतापर्यंत लोकांनी आणि चाहत्यांनी क्रिकेटच्या मैदानावर गांगुली आणि सेहवागची जोडी पाहिली आहे, जी खूप यशस्वीही झाली आहे. पण प्रेक्षक आता त्यांची ही जोडी KBC च्या हॉट सीटवर दिसणार आहे. सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग ‘KBC 13’च्या ‘कर्म वीर’ विशेष भागात दिसणार आहे.

रंगणार ‘फॅन्टास्टिक फ्रायडे’!

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग 27 ऑगस्टला ‘केबीसी 13’च्या हॉट सीटवर विराजमान झालेले दिसतील. असे म्हटले जात आहे की, सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवागच्या एपिसोडला ‘फॅन्टास्टिक फ्रायडे’ असे नाव देण्यात आले आहे. नावाप्रमाणेच हा एपिसोड शुक्रवारी प्रसारित केला जाईल. केबीसीच्या शेवटच्या सीझनमध्येही ‘कर्म वीर’ नावाचा एक एपिसोड होता, ज्यात सेलिब्रिटी पाहुणे सामाजिक कारणांसाठी सामील होत असत. पण, या हंगामात या भागाला ‘फॅन्टास्टिक फ्रायडे’ असे नाव देण्यात आले आहे.

प्रेक्षकांसह लाईफ लाईन परतणार!

विशेष गोष्ट म्हणजे कौन बनेगा करोडपतीच्या या हंगामात अनेक बदल करण्यात आले आहेत. ऑडियन्स पोलची लाईफलाईन या हंगामात पुनरागमन करत आहे. स्टुडिओत प्रेक्षकांना एन्ट्री मिळत असल्याने पुन्हा एकदा या सेटचे रुपडे पालटणार आहे. यामुळे शोचे वातावरण देखील पूर्णपणे बदलणार आहे. या सिझनमध्ये ‘50:50’, ‘आस्क द एस्पर्ट’ आणि ‘फ्लिप द क्वेश्चन’ या तीन लाईफ लाईन्स देखील केबीसीमध्ये पुनरागमन करत आहे.

‘बिग बी’देखी उत्साही

याविषयी बोलताना मेगास्टार अमिताभ बच्चन म्हणतात की, ‘कौन बनेगा करोडपतीशी माझा संबंध 21 वर्षांचा आहे. हे कदाचित पहिल्यांदाच होते की गेल्या हंगामात, स्टुडिओत कोणतेही प्रेक्षक नव्हते, जे नेहमी या शोचा भाग असायचे आणि आम्ही लाईफ लाईनमध्येही मोठा बदल पाहिला आहे.’ अमिताभ बच्चन म्हणाले की, ‘मला आनंद आहे की, या हंगामात स्टुडिओत प्रेक्षक पुन्हा उत्साहाने परत आले आहेत आणि लाईफलाईन प्रेक्षक सर्वेक्षण देखील आहे. हा माझ्यासाठी प्रत्येक वर्षी एक समृद्ध करणारा अनुभव आहे, सर्व क्षेत्रातील स्पर्धकांनी यात सहभाग घेतला आहे आणि आता हा खेळ आकर्षक आणि परिपूर्ण बनवण्यासाठी पुन्हा सज्ज झालो आहोत.’

हेही वाचा :

लॉकडाऊननंतर थिएटरमध्ये पहिल्यांदाच प्रदर्शित होणार चित्रपट, किती कमाई करू शकतो अक्षयचा ‘बेलबॉटम’?

विकी कौशल-कतरिना कैफ यांचा साखरपुडा झाला? पाहा अभिनेत्रीची टीम काय म्हणाली…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI