Kareena kapoor baby boy name : सैफ-करीनाच्या दुसऱ्या बाळाचं नाव आलं समोर, ‘या’ नावाने ओळखला जाणार तैमूरचा भाऊ!

काही दिवसांपूर्वी करीनाने तिच्या लहान बाळाचा, तैमूर आणि सैफचा एक फोटो शेअर केला होता. परंतु, त्यामध्ये नवजात बाळाचा चेहरा दिसत नव्हता. करीना आणि सैफने धाकटा मुलाच्या जन्मापूर्वी निर्णय घेतला होता की, ते आपल्या धाकट्या मुलाला मीडिया आणि लाईमलाईटपासून दूर ठेवतील.

Kareena kapoor baby boy name : सैफ-करीनाच्या दुसऱ्या बाळाचं नाव आलं समोर, ‘या’ नावाने ओळखला जाणार तैमूरचा भाऊ!
तैमूर-जेह
| Edited By: | Updated on: Jul 09, 2021 | 1:25 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान (Kareena Kapoor-Khan) आणि अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) यांचा मोठा मुलगा तैमूर अली खान (Taimur Ali Kha) याच्या नावावर बरेच वादंग निर्माण झाले होते. यावर्षी तैमूरच्या धाकट्या भावाचा जन्म झाला आहे. ज्याचा चेहरा ना चाहत्यांना दाखवण्यात आला आहे ना मीडियाला… इतकेच नाही तर, त्याच्या नावाबद्दल काही माहिती समोर आली नव्हती. मात्र, आता तैमूरच्या भावाचे नाव एका अहवालातून समोर आले आहे. बॉम्बे टाईम्सच्या वृत्तानुसार, करीना आणि सैफ धाकट्या मुलाच्या नावाचा विचार करत आहेत. परंतु, सध्याच्या काळात त्यांनी मुलाचे नाव ‘जेह’ (Jeh) असे ठेवले आहे (Kareena kapoor baby boy name actress named their second son Jeh).

मात्र, सैफ आणि करीनाने आपल्या मुलाला हेच नाव दिले आहे की नाही, याची पुष्टी झालेली नाही. याशिवाय आणखी एक नावही समोर आले आहे. वृत्तानुसार सैफला आपल्या वडिलांचे नाव लहान मुलाला द्यावे असे वाटते आहे. वडील मन्सूर अली खान पतौडी यांच्यानंतर त्याला आपल्या छोट्या मुलाचे नावही मन्सूर असे ठेवावेसे वाटत होते. आता सैफ आणि करीना या दोघांनीही आपल्या मुलाचे नाव निश्चित केले आहे. ‘जेह’ हे एका निळ्या रंगाच्या पक्षाचे नाव देखील आहे.

मीडियापासून लपवला चेहरा!

काही दिवसांपूर्वी करीनाने तिच्या लहान बाळाचा, तैमूर आणि सैफचा एक फोटो शेअर केला होता. परंतु, त्यामध्ये नवजात बाळाचा चेहरा दिसत नव्हता. करीना आणि सैफने धाकटा मुलाच्या जन्मापूर्वी निर्णय घेतला होता की, ते आपल्या धाकट्या मुलाला मीडिया आणि लाईमलाईटपासून दूर ठेवतील. तैमूरप्रमाणेच आपल्या लहान मुलाने देखील चर्चेत यावे, अशी त्यांची इच्छा नाही.

जेव्हा जेव्हा तैमुर त्याच्या आई वडिलांसोबत बाहेर येतो तेव्हा छायाचित्रकार त्याचे फोटो काढायला लागतात. सुरुवातीला तैमूरला याचा खूप राग यायचा आणि कधीकधी तो फोटोग्राफरवरही चिडायचा, पण आता त्याला त्याची सवय झाली आहे. आता तो कॅमेरा पाहून हाय किंवा बायसुद्धा म्हणतो.

शर्मिला टागोर म्हणतात…

तसे, तैमूरला मिळालेली लाईमलाईट बरीच चर्चेत होती. यामुळे सैफ आणि करीना देखील अस्वस्थ झाले होते. त्याचवेळी तैमूरची आजी शर्मिला टागोर म्हणाल्या होत्या की, त्याला आत्ता ही लाईम लाईट मिळते आहे आणि ती त्याला समजत नाहीय. परंतु, जेव्हा तो मोठा होईल आणि मग त्याला हे सर्व मिळणार नाही, तेव्हा ते अधिक जाणवेल. त्याचवेळी शर्मिला यांनी असेही म्हटले होते की, जेव्हा कधी दुसर्‍या कलाकाराला मूल होईल, तेव्हा ही लाईमलाईट तैमूरपासून दूर होऊन त्याच्यावर जाईल.

(Kareena kapoor baby boy name actress named their second son Jeh)

हेही वाचा :

PHOTO | अभिनेत्री अमायारा दस्तूरच्या सौंदर्यावर फिदा झाली ब्युटी प्रोडक्ट कंपनी, ब्रँड अ‍ॅम्बेसेडरपदी लागली वर्णी!

‘साधी ओळखही नाही तरी माझ्यासाठी खूप केलं’, आर्थिक अडचणीत असलेल्या शगुफ्ताने मानले रोहित शेट्टीचे आभार!