Laal Singh Chaddha: तुम्हाला माहितीये का? करीना कपूरचा मुलगा ‘जेह’सुद्धा आहे ‘लाल सिंग चड्ढा’चा भाग

| Updated on: May 30, 2022 | 9:45 AM

करीनाचा छोटा मुलगा जेहसुद्धा (Jeh) या चित्रपटाचा एक भाग असल्याचं तिने म्हटलंय. 'लाल सिंग चड्ढा' हा 'फॉरेस्ट गम्प' या अमेरिकन चित्रपटाचा रिमेक आहे. मूळ चित्रपटात टॉम हँक्सने मुख्य भूमिका साकारली होती.

Laal Singh Chaddha: तुम्हाला माहितीये का? करीना कपूरचा मुलगा जेहसुद्धा आहे लाल सिंग चड्ढाचा भाग
Kareena Kapoor Khan
Image Credit source: Instagram
Follow us on

रविवारी (29 मे) आमिर खानच्या (Aamir Khan) आगामी ‘लाल सिंग चड्डा’ (Laal Singh Chaddha) या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यामध्ये आमिरसोबत अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करताना करीनाने खास पोस्ट लिहिली आहे. विशेष म्हणजे करीनाचा छोटा मुलगा जेहसुद्धा (Jeh) या चित्रपटाचा एक भाग असल्याचं तिने म्हटलंय. ‘लाल सिंग चड्ढा’ हा ‘फॉरेस्ट गम्प’ या अमेरिकन चित्रपटाचा रिमेक आहे. मूळ चित्रपटात टॉम हँक्सने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाने प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कार पटकावला होता. ‘लाल सिंग चड्ढा’मध्ये करीना आणि आमिरसोबतच मोना सिंग, नाग चैतन्य यांच्याही भूमिका आहेत.

करीनाची पोस्ट-

‘कोरोना महामारी, दोन लॉकडाऊन आणि त्यानंतर झालेलं बाळ.. माझ्या आयुष्यातील सर्वांत खास चित्रपटांपैकी हा एक आहे. कारण माझा जेह बाबासुद्धा या चित्रपटाचा एक भाग आहे (तेव्हा तो माझ्या पोटात होता). फक्त मलाच नाही तर आम्हा दोघांना या चित्रपटात घेण्यासाठी अद्वैत आणि आमिर तुम्हा दोघांचे आभार. हा प्रवास कायम माझ्या लक्षात राहील’, अशी पोस्ट करीनाने लिहिली आहे.

हे सुद्धा वाचा

पहा ट्रेलर-

या ट्रेलरवर अनेकांनी कमेंट्स करत कौतुकाचा वर्षाव केला आहे. लाल सिंग चड्ढा या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान करीना प्रेग्नंट होती. गेल्या वर्षी 21 फेब्रुवारी रोजी तिने जेहला जन्म दिला. गेल्या वर्षी आमिरने चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक पोस्ट लिहिली होती. त्यात त्याने म्हटलं होतं की केवळ कोरोना महामारीमुळे नाही तर करीना गरोदर असल्याने शूटिंगदरम्यान विशेष काळजी घ्यावी लागत आहे. ‘ज्यावेळी अख्खं जग कोरोनाचा सामना करत होता, तेव्हा आम्ही कोरोना आणि आमच्या चित्रपटाची नायिका करीना या दोघांचा सामना करत होतो,’ असं त्याने म्हटलं होतं.