
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Karthik Aaryan) हा सतत चर्चेत आहे. त्याचे कारणही तेवढेच खास आहे. गेल्या आठवड्यामध्ये कार्तिक आर्यन याचा शहजादा हा चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपटाकडून सर्वांनाच मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, प्रत्यक्षात पठाण चित्रपटामुळे शहजादाला (Shehzada) मोठा फटका बसल्याचे सांगितले जात आहे. कारण ज्यादिवशी शहजादा हा चित्रपट रिलीज झाला, त्याचवेळी पठाण चित्रपटाच्या तिकिट दरामध्ये मोठी कपात करण्यात आली. पठाण हा चित्रपट (Movie) 110 रूपयांमध्ये बघायला मिळत असल्याने प्रेक्षकांनी पठाण हा चित्रपट बघण्याकडे कल दिला.
अपेक्षित ओपनिंग डेला कमाई करण्यात शहजादा यश मिळाले नाही. आज शहजादा चित्रपटाला रिलीज होऊन एक आठवडा झाला असून अजूनही बाॅक्स आॅफिसवर संथगतीने शहजादाची कमाई सुरू आहे. कार्तिक आर्यन याच्या या चित्रपटाकडून फक्त चित्रपट निर्मात्यांनाच नाही तर प्रेक्षकांनाही मोठ्या अपेक्षा होत्या.
मुळात म्हणजे बाॅलिवूडच्या मोठ्या स्टारचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर ज्यावेळी फ्लाॅप जात होते. त्यावेळी कार्तिक आर्यन याचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करत होते. विशेष म्हणजे शहजादा हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर कार्तिक आर्यन याच्या तब्बल तीन चित्रपटांनी धमाकेदार कमाई केली.
शहजादा या चित्रपटाचे जोरदार प्रमोशनही करताना कार्तिक आर्यन हा दिसला. मात्र, तीन चित्रपटांनंतर कार्तिक आर्यन याची बाॅक्स आॅफिसवरील हवा गुल झाल्याचे शहजादाच्या बाॅक्स आॅफिस कलेक्शनवरून दिसत आहे. कारण एक आठवडा होऊनही शहजादाला धमाका करण्यात यश मिळाले नाहीये.
शदजादा या चित्रपटाने ओपनिंग डेला 6 कोटी, दुसऱ्या दिवसी 8 कोटी, एका आठवड्यामध्ये चित्रपटाने 27 कोटीच्या जवळपास कलेक्शन केले. आजच अक्षय कुमार याचा सेल्फी हा चित्रपट रिलीज झाल्याने शहजादाचे पुढच्या काही दिवसांमध्ये बाॅक्स आॅफिस कलेक्शन वाढेल, याची अपेक्षा फार कमी आहे. कारण अक्षय कुमार याच्या सेल्फीसोबत बाॅक्स आॅफिसवर अजूनही शाहरूख खान याचा पठाणही चांगली कमाई करताना दिसत आहे.
रिपोर्टनुसार शहजादा हा चित्रपट तयार करण्यासाठी तब्बल 85 कोटींचा खर्च आलाय. मात्र, आठ दिवसांमध्ये चित्रपटाला 30 कोटींचे कलेक्शन करण्यातही अपयश आले. यामुळे कार्तिक आर्यन याचा शहजादा हा चित्रपटाचे बजेटही काढू शकले की नाही हे सांगणे अवघड आहे. सध्याचे शहजादाचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन पाहता हा चित्रपट फ्लाॅप जाण्याच्या मार्गावर आहे आणि हा कार्तिक आर्यन याच्यासाठी मोठा झटका नक्कीच आहे.