Bhool Bhulaiyaa 2: अवघ्या 9 दिवसांत ‘भुल भुलैय्या 2’ची कमाई 100 कोटींच्या पार

| Updated on: May 29, 2022 | 12:45 PM

अवघ्या 9 दिवसांत या चित्रपटाने कमाईचा 100 कोटींचा आकडा पार केला आहे. टी सीरिजचे भूषण कुमार आणि मुराद खेतानी निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन अनीस बाझमीने केलं आहे. 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'भुल भुलैय्या'चा ही सीक्वेल आहे.

Bhool Bhulaiyaa 2: अवघ्या 9 दिवसांत भुल भुलैय्या 2ची कमाई 100 कोटींच्या पार
Bhool Bhulaiyaa 2
Image Credit source: Instagram
Follow us on

कार्तिक आर्यन (Kartik Aaryan), कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि तब्बू यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘भुल भुलैय्या 2’ (Bhool Bhulaiyaa 2) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर घसघशीत कमाई केली आहे. अवघ्या 9 दिवसांत या चित्रपटाने कमाईचा 100 कोटींचा आकडा पार केला आहे. टी सीरिजचे भूषण कुमार आणि मुराद खेतानी निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन अनीस बाझमीने केलं आहे. 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भुल भुलैय्या’चा ही सीक्वेल आहे. सीक्वेल असला तरी याची कथा पहिल्यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्या शनिवारी या चित्रपटाने 11.35 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर पहिल्या आठवड्यात 92.05 कोटी रुपयांची कमाई झाली. आतापर्यंत या चित्रपटाने 109.92 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

पहिला आठवडा- 92.05 कोटी रुपये
दुसरा शुक्रवार- 6.52 कोटी रुपये
दुसरा शनिवार- 11.35 कोटी रुपये
एकूण कमाई- 109.92 कोटी रुपये

हे सुद्धा वाचा

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शचं ट्विट-

कार्तिक आर्यनच्या या चित्रपटासोबत कंगना रनौतचा ‘धाकड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र ‘भुल भुलैय्या 2’पुढे कंगनाचा चित्रपट टिकू शकला नाही. प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यात बक्कळ कमाई करणाऱ्या टॉप 3 चित्रपटांच्या यादीतही ‘भुल भुलैय्या 2’चा समावेश झाला आहे. या यादीत विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ पहिल्या क्रमांकावर आहे. तर आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाला कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने मागे टाकलं आहे.

भुल भुलैय्या 2 हा 100 कोटी क्लबमध्ये समाविष्ट होणारा या वर्षातील पाचवा चित्रपट ठरला आहे. याआधी गंगूबाई काठियावाडी, द काश्मीर फाइल्स, आरआरआर आणि केजीएफ 2 या चार चित्रपटांनी या वर्षात 100 कोटींहून अधिकची कमाई केली आहे.