Video: छुपाना भी नहीं आता.. ब्रेकअपनंतर कार्तिक-साराची Awkward मूमेंट!

ब्रेकअपनंतर या दोघांना एकत्र कुठेच पाहिलं गेलं नाही. नुकताच मुंबईत एक कार्यक्रम पार पडला आणि त्या कार्यक्रमात या दोघांना पहिल्यांदा एकत्र पाहिलं गेलं.

Video: छुपाना भी नहीं आता.. ब्रेकअपनंतर कार्तिक-साराची Awkward मूमेंट!
Sara Ali Khan and Kartik Aaryan
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jun 17, 2022 | 11:50 AM

अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) या जोडीचा सोशल मीडियावर एक वेगळाच फॅन फॉलोईंग आहे. 2020 मध्ये या दोघांनी ‘लव्ह आज कल 2’ (Love Aaj Kal 2) या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला, पण ही जोडी मात्र चाहत्यांमध्ये हिट ठरली. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हे दोघं रिलेशनशिपमध्ये होते, असंही म्हटलं जातं. मात्र कार्तिक-साराचं हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. ब्रेकअपनंतर या दोघांना एकत्र कुठेच पाहिलं गेलं नाही. नुकताच मुंबईत एक कार्यक्रम पार पडला आणि त्या कार्यक्रमात या दोघांना पहिल्यांदा एकत्र पाहिलं गेलं. पिंकविला स्टाइल आयकॉन इव्हेंटच्या रेड कार्पेटवर योगायोगाने कार्तिक आणि सारा एकाच वेळी पोहोचले होते. यावेळी पापाराझींनी त्यांना फोटोसाठी एकत्र पोझ द्यायला सांगितलं, तेव्हा दोघांची ‘Awkward’ मूमेंट स्पष्टपणे दिसून येत होती. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट्स केल्या आहेत.

पहा व्हिडीओ-


या कार्यक्रमात कार्तिकने सूट आणि टाय परिधान केला होता, तर साराने हाय स्लीट गाऊन परिधान केला होता. तिच्या बोल्ड लूकची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली. रेड कार्पेटवर जेव्हा दोघं एकमेकांसमोर आले, तेव्हाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. पापाराझींनी दोघांना एकत्र फोटोसाठी विनंती केली, मात्र साराचा संकोचलेपणा सहज दिसून येत होता. ‘ती खोटं खोटं हसण्याचा प्रयत्न करतेय’, असं एका युजरने लिहिलं. तर ‘दोघांसाठी खूप विचित्र क्षण आहे’, असंही एकाने म्हटलं. सारा अजिबात कम्फर्टेबल दिसत नाहीये, असंही एका युजरने लिहिलंय.

या कार्यक्रमात कार्तिकने ‘सुपर स्टायलिश अभिनेता’ हा पुरस्कार पटकावला. तर सारा अली खानला सुपर स्टायलिश युथ आयडॉलचा पुरस्कार मिळाला. यावेळी ‘भुल भुलैय्या 2’ आणि ‘लुका छुप्पी’ या चित्रपटांमधील कार्तिकचे सहकलाकार कियारा अडवाणी आणि क्रिती सनॉनसुद्धा उपस्थित होते. कार्तिकच्या ‘भुल भुलैय्या 2’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगलं यश मिळालं. या चित्रपटाने आतापर्यंत 175 कोटींचा गल्ला जमवला आहे. यामध्ये त्याच्यासोबत कियारा, तब्बू आणि राजपाल यादव यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.