Katrina Kaif | पापाराझींना पाहून कतरिना कैफचा चढला पारा, म्हणाली कॅमेरे….

हा व्हिडीओ पाहून लोकांनी जया बच्चनविरोधात संपात व्यक्त केला होता. त्याचे कारणही तसेच होते.

Katrina Kaif | पापाराझींना पाहून कतरिना कैफचा चढला पारा, म्हणाली कॅमेरे....
| Updated on: Nov 19, 2022 | 7:59 PM

मुंबई : काही दिवसांपूर्वी जया बच्चन यांचा विमानतळावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पाहून लोकांनी जया बच्चनविरोधात संपात व्यक्त केला होता. त्याचे कारणही तसेच होते, विमानतळावर जया बच्चन यांचे फोटो आणि व्हिडीओ घेत असताना एका पापाराझीचा पाय अडकल्यामुळे तो पडता पडता वाचला. मात्र, हे सर्व पाहून जया बच्चन म्हणाल्या होत्या की, तू अजून चार वेळा पडायला हवे. या व्हिडीओनंतर जया बच्चन यांच्यावर टीकाही करण्यात आली होती. मात्र, नेहमी शांत असणारी बाॅलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिचा देखील पापाराझीला पाहून चांगलाच पारा चढल्याचे दिसत आहे.

कतरिना कैफ जिमच्या बाहेर दिसताच तिच्याजवळ धावत सर्व पापाराझी पोहचतात. मात्र, हे कतरिनाला अजिबात आवडलेले दिसत नाही. कतरिना पापाराझीवर राग व्यक्त करताना दिसत आहे. मात्र, कतरिनाचा असा चेहरा यापूर्वी कधीच दिसला नव्हता.

कतरिना पापाराझींना कॅमेरा खाली ठेवण्यास सांगते. तुम्ही लोक असे कराल तर… कॅमेरा खाली ठेवा नाहीतर…म्हणत पापाराझींना ती कॅमेरा खाली करायला सांगते. आम्ही लोक इथे जिमला येतो आणि तुम्ही…असे कतरिना म्हणताना दिसत आहे.

नेहमी पापाराझीसोबत बोलणारी कतरिना नेमकी का चिडली हे काही कळू शकले नाहीये. पापाराझीने साॅरी साॅरी म्हणत कॅमेरे खाली केले. मात्र, गाडीमध्ये बसलेली कतरिना रागात खाली उतरते आणि कॅमेरे बंद करण्यास सांगते आणि पुन्हा रागात निघून जाते, हे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

आता कतरिनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी कतरिनाचा फोन भूत हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला प्रेक्षकांचा अजिबातच प्रतिसाद मिळाला नाही. हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला आहे.