AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Katrina Kaif- Vicky Kaushal Wedding | ठरलं! राजस्थानच्या शाही किल्ल्यात आयोजित होणार विकी कौशल-कतरिनाचा लग्नसोहळा!

लवकरच बॉलिवूडच्या कॉरिडॉरमध्ये लग्नातील सनईचे सूर ऐकायला मिळणार आहे. बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि चर्चित अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या अफेअरच्या चर्चांनंतर आता ते लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

Katrina Kaif- Vicky Kaushal Wedding | ठरलं! राजस्थानच्या शाही किल्ल्यात आयोजित होणार विकी कौशल-कतरिनाचा लग्नसोहळा!
Vicky-Katrina
| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Oct 28, 2021 | 1:44 PM
Share

मुंबई : लवकरच बॉलिवूडच्या कॉरिडॉरमध्ये लग्नातील सनईचे सूर ऐकायला मिळणार आहे. बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि चर्चित अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या अफेअरच्या चर्चांनंतर आता ते लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. कतरिना आणि विकी कौशलचे ग्रँड वेडिंग केव्हा आणि कुठे होणार, हेही नव्या रिपोर्ट्समध्ये समोर आले आहे.

ETimes मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, कतरिना आणि विकी कौशल यांच्या लग्नाचे ठिकाण आता निश्चित झाले आहे. रिपोर्टनुसार, कतरिना आणि विकीचे लग्न राजस्थान मधील रणथंबोर नॅशनल पार्कपासून अवघ्या 30 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या सवाई माधोपूर येथील एका किल्ल्यात होणार आहे, ज्याचे नाव ‘सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा’ असे आहे.

शाही विवाहसोहळा!

रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, कतरिना आणि विकीचे लग्न डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. ‘सिक्स सेन्सेस फोर्ट बरवारा’ हा 14 व्या शतकातील किल्ला आहे, जो सिक्स सेन्स सेंच्युरी आणि वेलनेस स्पा मध्ये रूपांतरित करण्यात आला आहे.

कसा आहे हा किल्ला?

कतरिना आणि विकीच्या लग्नाची चर्चा असलेला किल्ला नक्कीच एका भव्य राजवाड्याची अनुभूती देतो. यामध्ये प्रसिद्ध स्थानिक खाद्यपदार्थ आणि आंतरराष्ट्रीय क्युझिन, तसेच कॉकटेल आणि व्हिस्कीची सेवा देणारी तीन रेस्टॉरंट्स आहेत. किल्ल्यामध्ये एक स्पा देखील आहे, जो राणी पॅलेस आणि आजूबाजूच्या मंदिरांच्या मधोमध वसलेला आहे. सिक्स सेन्स फोर्ट बरवाराचे सेंट्रल प्रांगण पारंपारिक बागेत रूपांतरित केले गेले आहे, ज्यामध्ये अनेक प्रकारची झाडे आणि रोपे लावण्यात आली आहेत.

लग्नाची जोरदार तयारी!

रिपोर्टनुसार, कतरिना आणि विकीनेही त्यांच्या लग्नाची तयारी सुरू केली आहे. कतरिना आणि विकीच्या लग्नाचे कपडे प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची यांनी केले आहेत. ते सध्या कपड्यांसाठी फॅब्रिक निवडत आहेत, असे एका सूत्राने सांगितले. सूत्रांनी पुढे सांगितले की, कतरिनाने रॉ सिल्क फॅब्रिक निवडले आहे. कतरिना आणि विकीचे लग्न डिसेंबरमध्ये होणार आहे, ज्यामध्ये अभिनेत्री सब्यसाची डिझायनर लेहेंगा परिधान करणार आहे.   कतरिना आणि विकीच्या लग्नाची बातमी समोर आल्यानंतर दोघांचे चाहते खूप उत्सुक आणि आनंदी आहेत आणि आता त्यांच्या आवडत्या जोडप्याच्या भव्य लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

कतरिना कैफ आणि विक्की कौशल दोघेही आपापल्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये खूप व्यस्त आहेत. विकी कौशलकडे सध्या आदित्य धरचा ‘अश्वत्थामा’ आहे, तर कतरिना कैफ सलमान खानसोबत टायगर 3च्या शूटिंगसाठी रशियाला जात आहे.

हेही वाचा :

परेश रावल म्हणतायत ‘बाबूराव गणपतराव आपटे’ आता नको रे बाबा! ‘हेराफेरी 2’बाबत केले मोठे वक्तव्य…

‘इर्शाद’ नव्हे ‘काव्य पहाट’, ‘No Bindi No Business’नंतर आता शेफाली वैद्यंचा मोर्चा संदीप खरे-वैभव जोशींच्या कार्यक्रमाकडे!

Follow Us
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?