KK Death : हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना केके शुद्धीत होता, डोळेही सताड उघडे होते! Video देखील समोर

कोलकातामध्ये केकेच्या लाईव्ह कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या कॉर्न्सर्टदरम्यान केके तासभर गायला होता.

KK Death : हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना केके शुद्धीत होता, डोळेही सताड उघडे होते! Video देखील समोर
केकेला रुग्णालयात नेताना..
Image Credit source: Twitter
| Updated on: Jun 01, 2022 | 8:06 AM

मुंबई : प्रसिद्ध गायक केकेच्या मृत्यूनं (Singer KK Death) संपूर्ण संगीतसृष्टीवर (Music Industry) शोककळा पसरली आहे. हृदयविकाराच्या झटक्याने (Singer KK Death Last Video) केकेचं निधन झाल्याचं सांगितलं जातंय. कॉन्सर्टदरम्यान, केकेची प्रकृती खालावली. म्हणून त्याला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. ज्या ऑडिटोरीअमध्ये केकेच्या कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं, त्या कॉन्सर्टमधून केकेला रुग्णालयात नेतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. छातीत दुखतंय, असं केके म्हणाला. त्यानंतर त्याला लगेचच रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं होतं. यावेळी सुरक्षा रक्षकांच्या मदतीनं चाहत्यांच्या गर्दीतून वाट काढत केके याला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं होतं. केके तेव्हा शुद्धीत होता. त्याचे डोळे सताड उघडे होते. आपल्या पायावर चालत केके ऑडिटोरीअममधून बाहेर पडला होता. ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालीय.

पाहा व्हिडीओ :

रुग्णालयात नेताच मृत घोषित

केकेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण तिथल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. केकेच्या मृत्यूचं वृत्त ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता.

कोलकातामध्ये केकेच्या लाईव्ह कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या कॉर्न्सर्टदरम्यान केके तासभर गायला होता. मोठ्या उत्साहात आणि चाहत्यांनी खचाखच भरलेल्या ऑडिटोरीअमझ्ये केकेचा कॉन्सर्ट सुरु होता. पण अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांनी आपल्या सोबतच्या सहकाऱ्यांना सांगितलं.

केकेच्या छातीत दुखू लागलं होतं. म्हणून त्याला तातडीनं रुग्णालयात घेऊन जाण्याचा निर्णय झाला. यावेळी रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी केकेच्या हाताला धरुन सुरक्षारक्षकांनी त्याला बाहेर आणलं होतं. दरम्यान, याआधी केकेचा कॉन्सर्टमधील व्हिडीओदेखील समोर आला होता.

मृत्यूने खळबळ

ऑडिटोरीअममधून निघताना जिवंत असणारा, स्वतःच्या पायावर चालून जाणारा व्यक्ती रुग्णालयात जाईपर्यंत दगावल्यानं केकेसोबत असलेल्या कॉन्सर्टमधील सहकाऱ्यांनाही मोठा धक्का बसलाय. केकेच्या मृत्यूनं सर्व चाहते पूर्णपणे बिथरले असून वयाच्या 53 व्या वर्षी केकेनं अखेरचा श्वास घेतलाय.