रितेश देशमुखनं बायकोचं खरं नाव सांगितलं, पण ‘जिनिलिया’चा अर्थ काय?

जिनिलियाच्या वाढदिवसाचे निमित्त साधत रितेश देशमुखने खास गोष्ट चाहत्यांना सांगितली आहे. गेले अनेक वर्षे आपण ‘जेनेलिया’ या नावानं रितेशच्या बायकोला ओळखतो, मात्र आता रितेशनं एक ट्विट करत ‘माझ्या बायकोचे नाव ‘जिनिलिया’ आहे … जेनेलिया नाही.’ असं सांगितलं आहे.

रितेश देशमुखनं बायकोचं खरं नाव सांगितलं, पण 'जिनिलिया'चा अर्थ काय?
रितेश-जिनिलिया
Follow us
| Updated on: Aug 07, 2021 | 11:06 AM

मुंबई : बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीची क्युट आणि बबली अभिनेत्री जिनिलिया डिसूझा-देशमुखसाठी (Genelia D’Souza-Deshmukh) 5 ऑगस्टचा दिवस खूप खास होता. या दिवशी जिनिलियाचा वाढदिवस तर होताच, पण याच खास दिवशी तिचा पती रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याने आपल्या बायकोचं खरं नाव देखील जगजाहीर केलं. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा रितेश देशमुखसोबत जिनिलिया डिसूझाचा विवाह झाला आहे. दोघं बॉलिवूडचे क्युट कपल म्हणून ओळखले जातात.

रितेश माझ्या बायकोचं नाव जेनेलिया नाही…

जिनिलियाच्या वाढदिवसाचे निमित्त साधत रितेश देशमुखने खास गोष्ट चाहत्यांना सांगितली आहे. गेले अनेक वर्षे आपण ‘जेनेलिया’ या नावानं रितेशच्या बायकोला ओळखतो, मात्र आता रितेशनं एक ट्विट करत ‘माझ्या बायकोचे नाव ‘जिनिलिया’ आहे … जेनेलिया नाही.’ असं सांगितलं आहे. त्यानं जिनिलियाच्या वाढदिवशी म्हणजेच 5 ऑगस्ट रोही हे ट्विट केले होते.

चाहत्यांना पडलाय प्रश्न!

इतकी वर्ष सगळेच चाहते तिला जेनेलिया या नावानेच ओळखत आहे. लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्रीचे खरे नाव जाणून, आता चाहते मात्र बुचकळ्यात पडले आहेत. मात्र, त्याचवेळी अनेकांना ‘जिनिलिया’ या नावाचा नेमका अर्थ काय हे शोधण्याचा प्रयत्न केला. यावेळी अनेकांनी, What’s the meaning of Genelia Name, जिनिलिया नाम का अर्थ क्या है?, जिनिलिया या नावाचा अर्थ काय?, असे प्रश्न गुगलवर सर्च केले आहेत.

‘जिनिलिया’ नावाचा अर्थ तरी काय?

जिनिलिया नावाचा अर्थ “आकर्षक” असा आहे. जिनिलिया हे एक अतिशय सुंदर आणि सुंदर नाव आहे, जे बऱ्याच लोकांना आवडते. आपण देखील आपल्या लेकीचे नाव जिनिलिया देखील ठेवू शकता, कारण हे खूप छान नाव आहे आणि त्याचे खूप महत्त्व देखील आहे. आपण या नावाच्या व्यक्तीच्या स्वभावात नावाच्या अर्थाचा प्रभाव पाहू शकता. जिनिलिया नावाचा अर्थच “आकर्षक”  (Attractive) आहे आणि त्याचा प्रभाव या नावाच्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वात देखील दिसून येतो. जिनिलिया नावाचे लोक प्रत्येक गोष्टींचा खूप खोलवर विचार करतात आणि त्यांना गांभीर्याने घेतात. जिनिलिया नावाच्या व्यक्ती वास्तवात स्वप्नांच्या दुनियेपासून दूर राहतात आणि व्यावहारिक जीवन जगतात, असे जोतिष्यशास्त्र सांगते.

जिनिलिया डिसूझा-देशमुखबद्दल…

जिनिलिया डिसूझाचा जन्म मुंबईतील एका कॅथलिक कुटुंबात झाला. घरात जेनेलियाला जीनू नावाने हाक मारली जाते. तिनं प्रामुख्याने हिंदी, तेलगू, कन्नड, तामिळ आणि मल्याळम भाषेतील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. जिनिलिया पहिल्यांदा अमिताभ बच्चनसोबत ‘पार्कर पेन’च्या जाहिरातीत झळकली होती. या जाहिरातीत तिला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला, त्यानंतर तिने ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटानं आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटात जिनिलियासोबत रितेश देशमुख मुख्य भूमिकेत होता. याआधी जिनिलियाला रितेश फारसा आवडला नव्हता. पण नंतर रितेशने जिनिलियाला प्रेमात पाडलंच आणि दोघांनी 10 वर्षे एकमेकांना डेट केलं, त्यानंतर त्यांनी लग्न केले. ‘जाने तू या जाने ना’ हा जिनिलियाच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक मानला जातो, ज्यात जेनेलियाने ‘अदिती’ची भूमिका साकारली होती.

(Know The Meaning of Actor Riteish Deshmukh’s Wife Genelia’s name)

हेही वाचा :

जेनेलियाच्या क्युटनेसच्या प्रेमात पडला रितेश देशमुख, आधी दिला नकार मग जुळलं सूत!

Anushka Sharma : आ देखे जरा किसमे कितना है दम… अनुष्काची ही अमिताभ स्टाईल पाहिली का?

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.