“नाटकी कलाकारांची झुंडशाही, स्वयंघोषित स्टार…”, ‘ती’ पोस्ट झुंडबाबत नव्हती, महेश टिळेकरांचं स्पष्टीकरण

| Updated on: Mar 08, 2022 | 11:18 AM

'झुंड' या सिनेमाचा सध्या सगळीकडेच बोलबाला आहे. दिग्दर्शक आणि निर्माते महेश टिळेकर यांनी या सिनेमावर टीका केल्याची चर्चा आहे. यावर टिळेकरांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

नाटकी कलाकारांची झुंडशाही, स्वयंघोषित स्टार..., ती पोस्ट झुंडबाबत नव्हती,  महेश टिळेकरांचं स्पष्टीकरण
महेश टिळेकर, नागराज मंजुळे आणि अमिताभ बच्चन
Follow us on

मुंबई : ‘झुंड’ (Jhund) या सिनेमाचा सध्या सगळीकडेच बोलबाला आहे. नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित झुंड सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. सगळीकडे याच सिनेमाविषयी बोललं जातंय. महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachhan) यांचा अभिनय, सिनेमाची कथा याबद्दल सर्वत्र बोललं जातंय. हिंदीतील टॉप दिग्दर्शकांनी या सिनेमाचं तोंड भरून कौतुक केलं.”भारताकडून हा सिनेमा ऑस्करसाठी नॉमिनेट झाला पाहिजे”, असं एका दिग्दर्शकाने म्हटलंय. इतकंच काय आमिर खानही (Amir Khan) या सिनेमाबद्दल भरभरून बोलला. अश्यात या सिनेमावर दिग्दर्शक आणि निर्माते महेश टिळेकर (Mahesh Tilekar) यांनी या सिनेमावर टीका केली असल्याची चर्चा होती. यावर महेश टिळेकरांनी स्पष्टीकरण दिलं आहे.  “लिहिलेली पोस्ट नक्की कुणा विषयी आहे हे समजून न घेता काहींनी सणसणीत बातमी देण्यासाठी आपल्या सोयीप्रमाणे आपल्याला पाहिजे तसा अर्थ काढत झुंड सिनेमा विरोधी माझी पोस्ट आहे असा गैरसमज लोकांमध्ये निर्माण करून दिला त्यामुळे काहींना आनंदाच्या उकळ्या फुटल्या आणि त्यात भर म्हणून बातमी देणाऱ्यांनी झुंड सिनेमाचे पोस्टर आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा फोटो वापरून आपले अती कलाकौशल्य दाखवून दिले ते पाहून काहींनी माझी पोस्ट न वाचताच शिमग्याच्या आधी बोंबा मारायला सुरुवात केली. त्यामुळे शिक्षणाचा अभाव, अर्धवट ज्ञान असणाऱ्यांची संख्या समाजात किती जास्त आहे ते मला समजले”, असं महेश टिळेकर म्हणाले आहेत.

महेश टिळेकरांचं स्पष्टीकरण

फेसबुक पोस्टची जोरदार चर्चा झाल्यानंतर महेश टिळेकरांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “लिहिलेली पोस्ट नक्की कुणा विषयी आहे हे समजून न घेता काहींनी सणसणीत बातमी देण्यासाठी आपल्या सोयीप्रमाणे आपल्याला पाहिजे तसा अर्थ काढत झुंड सिनेमा विरोधी माझी पोस्ट आहे असा गैरसमज लोकांमध्ये निर्माण करून दिला त्यामुळे काहींना आनंदाच्या उकळ्या फुटल्या आणि त्यात भर म्हणून बातमी देणाऱ्यांनी झुंड सिनेमाचे पोस्टर आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा फोटो वापरून आपले अती कलाकौशल्य दाखवून दिले ते पाहून काहींनी माझी पोस्ट न वाचताच शिमग्याच्या आधी बोंबा मारायला सुरुवात केली. त्यामुळे शिक्षणाचा अभाव, अर्धवट ज्ञान असणाऱ्यांची संख्या समाजात किती जास्त आहे ते मला समजले”, असं महेश टिळेकर म्हणाले आहेत.

महेश टिळेकरांची चर्चित फेसबुक पोस्ट

महेश टिळेकरांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे ही फेसबुक पोस्ट सध्या चर्चेत आहे. ” नाटकी कलाकारांची झुंडशाही
तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू स्तुती सुमनांच्या माळा असं म्हणत फक्त आपल्याच so called स्वयंघोषित स्टार कलाकारांची वाहवा, वारेमाप स्तुती करणारे काही ग्रुप,टोळी मराठी चित्रपट सृष्टीतही आहे. अभिनय आणि सिनेमा कोळून पिल्यासारखे फक्त आपल्याच स्टार कलाकारांच्या सिनेमावर भरभरून बोलणारी ही मंडळी नवीन कुणाचा , म्हणजे बाहेरून नवीन आलेला कलाकार असेल, दिग्दर्शक असेल तर त्याच्या सिनेमाकडे ढुंकूनही बघत नाहीत.स्वतः ला स्टार सुपरस्टार समजणारे हे काही ठराविक लोक पृथ्वी जशी शेष नागाच्या डोक्यावर तरलेली आहे तशी मराठी चित्रपटसृष्टी यांच्यामुळे आणि यांच्या चित्रपटांमुळेच तग धरून आहे याची जाणीव बोलताना इतरांना करून देताना स्वतःची अक्कल पाजळत असतात”, असं महेश टिळेकर म्हणाले आहेत.

“आपल्याच ग्रुप,कंपू मधील कलाकार, दिग्दर्शकांच्या सिनेमाचे पोस्टर, ट्रेलर स्वतः च्या इन्स्टा,फेसबुक वर शेअर करणारे हे काही कलाकार एखाद्या नवीन किंवा ग्रुप बाहेरील कलाकार,दिग्दर्शकाचे पोस्टर ट्रेलर शेअर करायला हात आखडता का घेतात? स्वतःचे ग्रुप सोडून बाहेरील कुणाच्या सिनेमावर, अभिनयावर बोलताना तोंडं का बंद होतात यांची??? मराठी म्हणून अभिमानानं मराठी भाषा दिनानिमित्त इस्टा, फेसबुकवर फोटो पोस्ट करणारे हे काही स्टार कलाकार आपापले ग्रुप सोडून इतरांचे मराठी सिनेमे थिएटर मध्ये जाऊन का पाहत नाहीत? का आपलं ते बाळ आणि दुसऱ्याचं ते कार्ट?”, असा सवालही त्यांनी विचारला आहे. तसंच “वरील माझे मत सरसकट चित्रपट सृष्टीतील सर्वच कलाकारांच्या बाबतीत नाही”, अशी टीपही त्यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

Jhund: नागराजच्या झुंडवर कोर्टात निर्णय, निर्मात्याला 10 लाखाचा दंड, सिनेमा स्थगितीचीही मागणी

महिला दिन विशेष : आई-वडील नव्हे तर ‘या’ व्यक्तीमुळे प्रियांका चोप्रा झाली मिस वर्ल्ड, जाणून घ्या कोण आहे ‘ही’ व्यक्ती…

Jhund Video: अच्छा फिल्ममेकर नहीं, पागल भी है, नीडर भी, नागराजच्या प्रेमात अनुराग कश्यप जेव्हा हसतो-रडतो…