तनुश्री दत्ताला नानांनी चुकीचा स्पर्श केला? त्या प्रकरणावर मल्हार पाटेकर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, माझे वडील…

नाना पाटेकर यांच्यावरील तनुश्री दत्तांच्या टीकेला पुत्र मल्हार पाटेकर यांनी पहिल्यांदाच उत्तर दिले. हे प्रकरण न्यायालयाने आधीच निकाली काढले आहे, असे ते म्हणाले. वडिलांची बदनामी करणाऱ्यांना उद्देशून मल्हार म्हणाले की सत्यच टिकेल. संकटात कसे उभे राहायचे याची शिकवण आई-वडिलांकडून मिळाल्याचे सांगत, कुटुंबाची भावनिक एकजूट महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

तनुश्री दत्ताला नानांनी चुकीचा स्पर्श केला? त्या प्रकरणावर मल्हार पाटेकर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, माझे वडील...
nana patekar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 15, 2026 | 3:11 PM

अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन झाल्याने देशभरात हळहळ व्यक्त केलं जात आहे. नानांच्या फिल्मी आणि सामाजिक योगदानावर भरभरून बोललं जात आहे. नाना पाटेकर यांच्या स्वभावावरही भाष्य केलं जात आहे. मात्र, अभिनेत्री तनुश्री दत्ताने राक्षसाचा मृत्यू म्हणून नाना पाटेकर यांच्यावर टीका केली आहे. तनुश्री रोजच नानांबाबत काहीबाही बरळत आहे. त्यामुळे नानांच्या चाहत्यांकडून तिचा समाचार घेतला जात आहे. आता या प्रकरणावर नाना पाटेकर यांचे चिरंजीव मल्हार पाटेकर यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. मल्हार यांनी तनुश्री यांच्या आरोपांचा समाचार घेतला आहे.

लोक काय म्हणतात ते मला माहीत नाही. मी कुणाचं नाव घेत नाही. ज्या प्रकरणावर लोक वारंवार बोलत आहेत. ते प्रकरण कधीच संपलेलं आहे. न्यायालयाने हे प्रकरण निकाली काढलं आहे. हे प्रकरण आधीच संपलं आहे. तरीही लोक त्यावर भाष्य करत आहेत, असं मल्हार पाटेकर यांनी स्पष्ट केलं आहे. मल्हार यांनी पहिल्यांदाच या प्रकरणावर भाष्य केलं आहे. जे लोक माझ्या वडिलांची बदनामी करत आहेत. त्यांना सागतो, जे सत्य आहे, तेच कायम राहिल. देव तुमचं भलं करो. एवढंच मी त्यांना सांगू इच्छितो, असं मल्हार यांनी म्हटलं आहे. हिंदुस्थान टाइम्सने घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी हे भाष्य केलंय.

Loading...

संकटाचा सामना करण्याची शिकवण

यावेळी मल्हार यांनी नाना पाटेकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. संकटात कसं उभं राहायचं हे मला माझ्या आईवडिलांकडून शिकायला मिळालं आहे. त्यांच्या या स्वभावानेच मला ताकत मिळाली आहे, असं मल्हार यांनी म्हटलं आहे. लहानपणापासूनच मला आईवडिलांकडून संकटावर मात करण्याची शिकवण मिळाली. बाहेरच्या लोकांना काय दिसतंय त्याने मला काही फरक पडत नाही. वास्तवात आमचं कुटुंब भावनिकरित्या एकरुप आहे. आम्ही एकमेकांशी भावनिकरित्या जोडलेलो आहोत. माझे काका आणि चुलत भाऊ हे आमच्या या भावनिक नात्याशी एकरूप आहेत. मला नेहमीच सर्वांचं प्रेम मिळालं. माझ्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, असंही मल्हार म्हणाला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us